Largest online photo album of Handwritten Notes in 24 hours Upload Selfie with CM

Largest online photo album of Handwritten Notes in 24 hours

CM

Maharashtra State Board Exam 2024 Marathi Question Paper with Answers

Mazi Shala Sundar Shala Abhiyan Upkram Upload Selfie with CM Letter

महाराष्ट्र शासन

शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य,

मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे

क्रमांक : शिआका/२०२४/ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा/ १४०४

दिनांक : २४/२५.०२.२०२४

वाचा : १) शासन निर्णय दि. ३०.११.२०२३

२) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. १८६. दि.०७.०१.२०२४

३) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र.१२५३. दि.१६.०२.२०२४

परिपत्रक

राज्यामध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १.०३.३३३ शाळांनी अभियानात सहभाग नोंदविला असून शाळा, विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. सदर अभियानांतर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील 2 कोटी 11 लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या अभियानाचा प्रारंभ केलेला आहे.

राज्य शासनाने या अभियानांतर्गत mahacmletter हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रातील मजकूर व शिक्षण विषयक अभिप्राय हस्ताक्षरात लिहून त्याचा फोटो उपरोक्त नमूद संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे. यामधून प्राप्त अभिप्रायांचा विचार राज्याच्या शैक्षणिक धोरण निश्चितीकरणात केला जाणार आहे. शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याच्या प्रक्रीयेत सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.

उपक्रमाचे नाव : Largest online photo album of “Handwritten Notes in 24 hours”.
कार्यपध्दती :
१) पालकांनी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे.
२) हे पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोटया वहीचे एक पान व एक बॉलपेन घ्यायचे आहे.
३) या पानावर मुलांनी बॉलपेनाने स्वतःच्या हस्ताक्षरात या पत्राविषयी त्यांचा शिक्षण विषयक अभिप्राय नमूद करणे
अपेक्षित आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल. ज्या पालकांना लेखन करता येत नाही त्यांच्या वतीने अन्य व्यक्तींकडून लेखन करुन घेता येईल.
) हा अभिप्राय ५ ते ६ ओळीमध्ये असावा.
४ ५) अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात काढायचा आहे.
६) त्यानंतर शिक्षण विभागाच्या संकेतस्थळाला जोडले जाण्यासाठी या ओळीला स्पर्श करा वेबसाईटवर जाऊन स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे.
७) त्यानंतर हस्ताक्षरातला अभिप्रायाचा फोटो अपलोड करावयाचा आहे.
याबाबत करावयाच्या कृतीबाबत फ्लोचार्ट सोबत जोडलेला असून त्याप्रमाणे सर्व शाळास्तरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सूचना पोहोच होतील याची दक्षता घेण्यात यावी. सदर उपक्रमाचा दि. २६.०२.२०२४ वेळ सकाळी ०९.०० ते दि. २७.०२.२०२४
सकाळी ०८.५९ आहे. सदर दिवशी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो अपलोड करावयाचा आहे. त्यानुसार उपरोक्त सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

आयुक्त शिक्षण
सूरज मांदरै आ.प्र.से.
महाराष्ट्र राज्य, पुणे

SAVE 20240225 204606

दि १६ फेब्रुवारी २०२४

मा आयुक्तांचे(शिक्षण)                

अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पुढील प्रकारे सहभाग नोंदवायचा आहे

१.शैक्षणिक घोषवाक्य अभियानाचा एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे विदयाथ्यांच्या स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करणे.

२.मा.मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी

३.’वाचन सवय प्रतिज्ञा’ मुलांनी घ्यावयाची आहे.

https://www.dnyanyatritantrasnehi.com/2024/02/mazi-shala-sundar-shala-student-selfie.html

1680269441151

73 thoughts on “Largest online photo album of Handwritten Notes in 24 hours Upload Selfie with CM”

 1. My school is so beautiful.

  My school all teacher is supportive and teach very well.

  My school friends is very intelligent

  Reply
 2. मुख्यमंत्री महोदय
  आम्हाला तुमची कामगिरी फार आवडलेली आहे
  तुम्ही सुरू केलेले महाराष्ट्र गीत ऐकताना खूप अभिमान वाटतो
  तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून शाळे मध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत माझी एक विनंती आहे सगळ्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत केले जावे

  Reply
 3. We want clean washrooms and we want water jar/cooler for drinking. In summers water is not available in our school by which we face some problem. I request you to help us in this…

  Reply
 4. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
  या अभियाना अंतर्गत शाळेचा परिसर स्वच्छ झाला. विद्यार्थ्यांप्रती स्वच्छतेची आवड निर्माण झाली. शिक्षण क्षेत्रामध्ये नाविन्यता आली. प्रत्येक वर्षी हे अभियान व्हायला पाहिजे. या अभियानाचे हार्दिक अभिनंदन.

  Reply
 5. नाविन्याची कास सोबत घेऊन विविध गुणांचा विकास होण्यासाठी तसेच शिक्षण आनंददायी मनोरंजनातून ज्ञान प्राप्त होण्यासाठी भविष्यावेधी शिक्षण देऊन त्यातून सुजाण नागरिक बनण्यास संस्काराची शिदोरी सोबत घेऊन व्यवसायाभिमुख शिक्षण देणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन एकनाथ शिंदे यांनी आखलेली विचारांची दिशा या मुख्यमंत्री पत्रातून दिसते.

  Reply
 6. माझी शाळा सुंदर शाळा हा महाराष्ट्र सरकारने राबवलेला उपक्रम हा अतिशय उत्तम होता.या उपक्रमामुळे आम्हा विद्यार्थ्यांना व्यवस्थापणा व टापटीपपणाची सवय व महत्व कळाले शाळेचा व वर्गाचा परिसर स्वच्छ असल्याने शिकण्याबद्दलची आपुलकी अधिक वाढली.एकत्रीतपणे मिळून कोणतेही काम करने शक्य आहे.ही भावना मनामध्ये पक्की झाली.

  Reply
 7. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आमच्या उज्वल भविष्यासाठी विविध स्तरावरुन् प्रयत्न सुरु आहेत.निश्चितपणे महाराष्ट्र शासन आम्हा विद्याथ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहे त्यातलाच एक उपक्रम म्हणजे माझी शाळा सुंदर शाळा

  Reply
 8. आपल्या दैनिक जीवनातला थोडा वेळ आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी देण आणि त्यातून शाळेला स्वच्छ व सूंदर बनवणे ही संकल्पना सर्व विद्यार्थ्यांना स्वछते बद्दल स्फूर्ती देणारी आहे

  Reply
 9. शाळेबरोबरच माझ्या घराचा परिसर,गाव स्वच्छ ठेवणे याही गोष्टी हळूहळू आमच्यातून घडतील.

  Reply
 10. मला स्वच्छता करताना खूप छान वाट‌ले मी घरात जशी स्वच्छता करते तशीच शाळेतही करते

  * मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा क

  मला स्वच्छता करताना खूप चांगले वाटले., मी घरात जशी स्वच्छता करते, तशी, शाळेतही करते आम्ही सर्वांनी मिळून स्वच्छता केली.” वर्गामध्ये स्वच्छता करताना आणि माझ्या मैत्तिवी -नी सुद्धा स्वच्छता केली ही योजना मला खूप आवडली

  Reply
 11. मला स्वच्छता करताना खूप छान वाट‌ले मी घरात जशी स्वच्छता करते तशीच शाळेतही करते

  * मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा क

  मला स्वच्छता करताना खूप चांगले वाटले., मी घरात जशी स्वच्छता करते, तशी, शाळेतही करते आम्ही सर्वांनी मिळून स्वच्छता केली.” वर्गामध्ये स्वच्छता करताना आणि माझ्या मैत्तिवी -नी सुद्धा स्वच्छता केली ही योजना मला खूप आवडली

  Reply
 12. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. या उपक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय निर्माण होते. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला उपक्रम आहे.

  Reply
 13. माझी शाळा खुप सुंदर आहे मी त्या शाळेत शिकली आणि मला चागली शीकवन मिळाली आमच्या शाळेत चागले शिशक होते ते आमाला चागले शीकवत होते

  Reply
 14. Mazi shala khup sundr aahe. Mi tya shalet. Shikli. Aani mla cagli shikvn. Milali aamcya shalet. Cagl shekvt shikshk hote. Te. Aamala cagle. Sagt. Hote aamci shala khop caan aahe

  Reply
 15. माननीय मुख्यमंत्री साहेब,
  1) आम्हा विद्यार्थ्यांना आमच्या गावामध्ये म्हणजे ग्रामीण भागात उत्तम शिकायची सोय करून द्यावी
  2) प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून असावे
  3) दप्तराचे ओझे कमी हवे
  4) आठवड्यातून एक दिवस दप्तर मुक्त शाळा असावी
  5) कृती कौशल्यावर जास्त भर द्यावा
  6) शालेय शिक्षणाबरोबर सामाजिक ज्ञान मिळावे

  Reply
 16. 1. Sukh Samriddhicha zara Shikshan hach marg khara.
  2. Shiknyatch aahe Khari Pragati.
  3. Shala shikal tar pudhe vachal.
  4. Nar aso va nari chadha shikshanachi payari.
  5. Dnyanjyot lavu ghari dur karu niraksharta saari.
  6.Mata hoeel shikshit tar kutumb rahil surakshit.
  7. Ekane shikvu ekala saksahr karu janatela.
  Jai Bhavani Jai Shivray.
  Jai Hind Jai Maharashtra.

  Reply
 17. Mi मी सोहम सुखदेव माळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काडगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मी तुमचे माझी शाळा सुंदर शाळा आपला देश घडविणाऱ्या विचारवंतांना अभिवादन करत आहे भारत देशाचे भवितव्य मुलांच्या हाती आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी महावाचन तसेच शेतीविषयक आवड निर्माण करण्यासाठी माझी शाळा माझ्या माझी माझी उपक्रम सबला स्वच्छता पाठक दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपक्रम गणवेश विद्यार्थ्या घडवण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले विद्यार्थी सर्वांगीण विकास घडविले बद्दल धन्यवाद आपला विद्यार्थी सोहम

  Reply
 18. माझी शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे आणि हे मंदिर कायम स्वच्छ असते परंतु या उपक्रमा मुळे आता इतर देखिल स्वच्छ आणि सुंदर बनुन मंदिर बनतील .
  मुख्यमंत्री सरानां खुप खुप धन्यवाद!

  Reply
 19. माझी शाळा खूप चांगली आहे माझी शाळा नेहमी स्वच्छ राहते आम्हाला आठ विषयात सर्व सर चांगले शिकवतात फक्त माझे एवढे विनंती आहे आमच्या शाळेत खूप खेळ व खेळण्यासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा समान उपलब्ध करून द्यावे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जरी अभ्यासाप्रमाणे आवड नाही तरी ते खेळांमध्ये राज्यस्तरावर कोणी जिल्हास्तरावर गेले आहेत शाळेतील अभ्यासक्रम मला आवडते सुद्धा व समजते आमच्या शाळेमध्ये पुस्तकालय सुद्धा आहे आम्हाला पोषकार सुद्धा मिळते माझ्या शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.

  Reply
 20. श्री आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ ची शिंदे साहेब यांनी राबवलेल्या उपक्रमाबाबत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा यांचा अभिप्राय मी देत आहे तरी दिले पत्र मी वाचले व त्याचे सर्व बाबी कळून मी तुमच्या आभार मानते की तुम्ही आमच्याबद्दल तुम्ही करता तुम्ही विचार करता सोचता व वेगवेगळे उपक्रम राबवत मी तुमची खूप आभार मानते धन्यवाद.

  Reply
 21. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही राबवलेल्या उपक्रमाबाबत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शाळा व त्याबाबत असलेली अनेक माहिती व आम्ही तुम्हीच वाद दिलेले पत्र वाचले व बाबत आम्ही सर्व करून आम्ही त्यांचा अभिप्राय देत आहोत तरी तुमचा खूप खूप आभार धन्यवाद.

  Reply
 22. माझी शाळा खूप चांगली आहे माझी शाळा आणि मी स्वच्छ राहते आम्हाला आठवीचे आहेत सर्व सर चांगले जेवतात फक्त माझी एवढी विनंती आहे आमच्या शाळेत खेळवा खेळण्यासाठी लागते किंवा सामान उपलब्ध करून द्यावे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जरी अभ्यासामध्ये आवड नाही तरी ते खेळांमध्ये राजस्थानवर कोणी जिल्हास्तरावर गेले आहेत शाळेतील अभ्यासक्रमाला आवडते व समजते सुद्धा आमच्या शाळेमध्ये पुस्तकालय सुद्धा आहे माझ्या शाळेत वेगळे उपक्रम राबवले जातात
  धन्यवाद व तुमचे खूप खूप आभार तुम्ही राबवलेल्या या उपक्रमाबाबत माझी शाळा सुंदर शाळा खूप खूप आभार आम्ही यांचा अभिप्राय अवश्य देऊ धन्यवाद.

  Reply
 23. प्रतीक्षा दशरथ धोंडेकर वरवट व विष्य मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा शाळेचे नाव यशवंतराव चव्हाण विद्यालय आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब यांना नि राबवलेल्या यांनी राबवलेल्या उपक्रमाबाबत माझी शाळा सुंदर शाळा व यांनी याबाबत दिलेले पत्र मी वाचले व पत्रातील सर्व गोष्टी समजून मी अभिप्राय देत आहे धन्यवाद.

  Reply
 24. Hi P.M sir I am sushant Shinde how are you im learning 9th STD my school name is yashwant vidyalaya pandharpur ni am also fine thank you p.m sir you are a legend man of the earth

  Reply
 25. माननीय मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून शालेय शिक्षणामधून नवनवीत उपक्रम राबवण्यात येत आहेत जेणेकरून आम्हा विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल . भविष्याच्या दृष्टीकोनातून आम्हा विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची अद्यावत शिक्षणाद्वारे रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील . जेणेकरून आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर होऊन भारत देशाचे नाव जागतिक पातळीवर कोरले जाईल ,
  धन्यवाद .
  Name:- Aboli Chandrashekhar Kumbhar .
  School Name:- s.p.m primary school.

  Reply
 26. माझी शाळा खुप सुदर आहे माझ्या शाळेत खुप मोठे मैदान आहे माझ्या शाळेचे नाव => श्री शिवाजी विद्यायल रिसोड असे आहे माझ्या शाळेला छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव दिले आहे

  Reply
 27. माझी शाळा खुप सुदर आहे माझ्या शाळेत खुप मोठे मैदान आहे माझ्या शाळेचे नाव => श्री शिवाजी विद्यायल रिसोड असे आहे माझ्या शाळेला छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव दिले आहे माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम मुख्यमंत्री यांनी राबवीला आहे

  Reply

Leave a Comment

error: Content is protected !!