Krantijyoti Savitribai Phule Balsangopan yojana
Krantijyoti Savitribai Phule Child Care Scheme
Krantijyoti Savitribai Phule Balsangopan yojana Apply link
Providing benefits to children under the Krantijyoti Savitribai Phule Child Care Scheme.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना
एकल पालकांच्या मुलांना महिन्याला २,२५० रुपये
ज्या मुलांना आई किंवा वडील हयात नसतील व ज्या मुलांना आई व वडील दोन्हीही हयात नसतील अशा बालकांना या योजनेचा लाभ मिळतो.
० ते १८ वयोगटातील बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो. एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना ही लाभ दिला जातो.
एका मुलांसाठी २२५० रु प्रतिमहिना (एका वर्षाला २७०००/- रु मिळतात.) वय १८ पुर्ण होईपर्यंत दर महिन्याला रक्कम मिळते.
हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बाल कल्याण समितीकडे सादर केला जातो व ती समिती अर्ज मंजुर करते.
जिल्हा परिषद शाळेत व महाविदयालय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला बोनाफाईड आत्ताच शाळेतून काढून ठेवावा
या योजनेचा लाभ १८ वयोगटातील कुटुंबातील दोन बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो.
या योजनेच्या माहितीसाठी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका अथवा आपल्या तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प कार्यालय पंचायत समिती येथे संपर्क साधावा
बालसंगोपन योजनेतून करा अर्ज; प्रतिवर्षी नूतनीकरण आवश्यक
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून एकल पालक असणान्या मुलांना आला २ हजार ५०० रुपये मिळतात. या योजनेत पूर्वी १ हजार १०० रुपये मिळत होते, त्यामध्ये वाद करण्यात आली आहे. विधवा, घटस्फोटित महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर तपासून प्यावा व जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर मुलांना समक्ष नेऊन फॉर्म जमा करणे आवश्यक आहे. कोरोनानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत बाढ झाली असून सध्या प्रत्येक जिल्ह्यात अनेक लाभार्ती या योजनेचा लाभ घेत आहेत.
दरम्यान, या योजनेत सुरवातीला अर्जदारांची गृहचौकशी करण्यात येते. पालकाचे उत्पत्र एक लाख रुपयेपर्यंत असणे आवश्यक आहे. खरोखर गरजू असणार्यास लाभ दिला जातो.
नियम व अटी
एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले / मयात आहेत, अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा एचआयव्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना ही योजना मिळते.
अशा शलकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी २ हजार २५० रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.
घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांनाही हा लाभ मिळतो. फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रांसह अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत, त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकान्यांच्या सहीचे पत्र सादर करावे.
आवश्यक कागदपत्रे
१) योजनेसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज
२) पालकाचे व बालकाने आधारकार्ड झेरॉक्स
३) मुलांचे शाळेचे बोनामाईट सर्टिफिकेट
४) तहसीलदार यांचा उत्पनाचा दाखला
५) पालकांचे मृत्यू असल्यास मृत्यूचा दाखला
६) पालकांचा रहिवासी दाखला. (ग्रामपंचायत/नगरपालिका यांचा)
७) मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व ते नसल्यास पालकांचे बँक पासबुक
८) मृत्यूचा अहवाल (कोविडने जर मूत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल)
९) रेशनकार्ड झेरॉक्स,
१०) घरामसमोर पालकांमोकांचा फोटो ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड आकाराचा रंगीत फोटो (दोन मुले असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकांचा स्वतंत्र फोटो)
१०) मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो
