Submission of Information Children Of Single Mothers Studying In Class 1st to 12th
Submission of Information Children Of Single Mothers Studying In Class 1st to 12th
Regarding immediate submission of information on children of single mothers studying in grades 1 to 12 in the state in Google Sheet.
विषय – राज्यातील इ.१ ली ते १२ वी मध्ये शिकणा-या एकल मातांच्या मुलांची माहिती Google Sheet मध्ये भरुन तात्काळ सादर करणेबाबत.
संदर्भ :-
१) शासनाचे पत्र क्र. संकीर्ण-३८२५/प्र.क्र. ०१/एसडी-२, दि.१३ ऑक्टोबर, २०२५ (सहपत्रांसह)
२) शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आशिका-२०२५/आस्था-क-माध्यमिक, दि.३१/१०/२०२५
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भिय पत्रांचे अवलोकन करावे. (प्रती संलग्न)
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये महाराष्ट्रातील एकल मातांची आर्थिक व सामाजिक स्थिती अत्यंत दयनीय आहे. सदर महिला या मजुरी करुन जगतात व त्यांच्या मुला मुलींची शिक्षण करतांना त्यांना खुप कठीण जाते. त्यामुळे अनेकदा या महिला त्यांच्या मुला-मुलींना शाळेतून काढून घेतात. त्यामुळे शिक्षण विभागातील या मुला-मुलींची संख्या संकलित करुन या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
करीता आपल्या स्तरावरुन इ. १ ली ते १२ वी पर्यंतच्या मुला मुलींची संख्या मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या निर्देशानुसार संकलित करुन सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार शासनास करावयाची आहे. तरी राज्यातील इ.१ ली ते १२ वी मध्ये शिकणा-या एकल मातांच्या मुलांची माहिती सोबत देण्यात आलेल्या Google Sheet मध्ये भरुन (Soft Copy) तसेच Hard Copy स्वाक्षरीसह विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तात्काळ संचालनालयास सादर करावी. माहिती भरण्यासाठी Google Sheet ची Link खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
सहपत्र – संदर्भिय पत्र Google Sheet च्या लिंकसह वाचा या ओळीला स्पर्श करून
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे

