Kaushal Melava Upkram
Kaushal Melava Upkram
Kaushal Melava 2026-2027′ madhye aayojit
Organized in Skill Fair 2026-2027
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र.राशैसंप्रपम/VGPG/कौशल मेळावा/२०२६-२०२७/
प्रति.
१) उपसंचालक, प्रादेशिक विद्याप्राधिकरण (सर्व)
२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३) शिक्षणाधिकारी, (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व)
४) प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी महानगरपालिका (सर्व)
विषय : ‘कौशल मेळावा २०२६-२०२७’ मध्ये आयोजित करण्याबाबत.
संदर्भ :
१. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे दिनांक ३०/०६/२०२६ रोजीचे पत्र.
२. मा. आयुक्त, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०४/०९/२०२६ रोजी झालेली बैठक.
उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रान्वये, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. महाराष्ट्र, पुणे येथील व्यवसाय शिक्षण व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये राज्यातील इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय कौशल मेळावा २०२६-२७’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. व्यवसाय शिक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३ व राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ मध्ये इ ६ वी ते ८ वी या पुर्व माध्यमिक स्तरावर प्रत्येक इयत्तेच्या शैक्षणिक वर्षात कौशल मेळाव्याचे आयोजन करण्यास मार्गदर्शीत केले आहे. २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षापासून इ ६ वी साठी व्यवसायिक शिक्षण या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शाळेमध्ये ही अंमलबजवणी होण्यासाठी प्रेरणा मिळण्यास राज्यस्तर कौशल मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
कौशल मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित विविध संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, तसेच त्यांच्यामध्ये करिअरविषयक जागरूकता, २१व्या शतकातील कौशल्ये, सर्जनशीलता, चिकित्सक विचार, सहकार्यभावना व उद्योजकीय दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनेचे प्रकल्पामध्ये रूपांतर करून त्याचे सादरीकरण करण्याची संधी या उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘Code to Enhance Learning (CEL)‘ या संस्थेमार्फत तांत्रिक व शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.