Intelligence and Aptitude Quiz

Intelligence and Aptitude Quiz

GENERAL INTELLIGENCE बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता Intelligence and aptitude सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त बहुपर्यायी प्रश्न मंजुषा Useful multiple choice question (MCQs) paper for all competitive exams

IQ
1. विजया तिच्या घरापासून चालायला सुरुवात करते आणि पश्चिमेकडे 85 मी. जाते. मग ती डावीकडे वळते आणि 50 मी. चालते. त्यानंतर ती उजवीकडे वळते आणि 34 मी. चालते. नंतर ती उजवीकडे वळते आणि 50 मी. चालते. तर आता ती उजवीकडे वळली आणि 45 मी. चालून बँकेत पोहोचली. तर विजयाच्या घरापासून बँक किती अंतरावर आणि कोणत्या
दिशेला आहे ?
A 74 मी. पश्चिम
C. 70 मी. पूर्व
B. 74 मी. पूर्व
D. 70 मी. पश्चिम
2. A, B, C, D, E, F आणि G या सात व्यक्ती उत्तरेकडे तोंड करुन एका सरळ रेषेत बसलेल्या आहेत. C आणि E यांच्या दरम्यान फक्त दोन व्यक्ती वसल्या आहेत. G हा एका टोकाला वसलेला आहे. B हा D च्या डावीकडे दुसरा आहे. F हा A च्या डावीकडे दुसरा आहे. F आणि D यांच्यादरम्यान तीनपेक्षा अधिक व्यक्ती वसल्या आहेत. G हा D च्या लगत उजवीकडे आहे. F हा E च्या लगत शेजारी बसलेला नाही. तर खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
A. E हा F च्या उजवीकडे चौथा आहे..
B. C हा D च्या डावीकडे दुसरा आहे.
C. G हा A च्या उजवीकडे तिसरा आहे.
D. E हा G च्या डावीकडे तिसरा आहे.
3. सोमवारी सुरु होऊन रविवारी संपणाऱ्या एका आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी K, L, M, N, O, P आणि s यांपैकी प्रत्येकाची परीक्षा आहे. L ची परीक्षा बुधवारी आहे. S च्या आधी तीनपेक्षा जास्त जणांच्या परीक्षा आहेत. N नंतर लगतच्या पुढल्या दिवशी M ची परीक्षा आहे. K आणि N यांच्या परीक्षेच्या दिवसांदरम्यान फक्त एका व्यक्तीची परीक्षा आहे. P ची परीक्षा, O च्या परीक्षेच्या लगत आधीच्या दिवशी आहे. M नंतर कोणाचीही परीक्षा नाही. तर खालीलपैकी कोणत्या दिवशी o ची परीक्षा असेल ?
A. शनिवार
B. सोमवार
C. गुरुवार
D. मंगळवार
4. दिलेल्या विधानाचा विचार करा आणि दिलेल्यांपैकी कोणती गृहीतक/के विधानात अंतर्भूत आहे / आहेत ते ठरवा.
विधान : हवामानातील बदल म्हणजे मुख्यतः उष्ण तापमान हो असे, बऱ्याच लोकांना वाटते. परंतु तापमानवाढ ही केवळ सुरुवात आहे. कारण पृथ्वी ही सर्वकाही एकमेकांशी जोडलेले असणारी एक प्रणाली आहे. हवामान बदलाच्या परिणामांमध्ये दुष्काळ, पाण्याची कमतरता, समुद्राची वाढती पातळी इत्यादींचा समावेश होतो.
गृहीतके :
I. पृथ्वीवर, एका क्षेत्रात झालेले हवामानातील बदल हे इतर क्षेत्रातील बदलांवर प्रभाव टाकू शकतात.
II. वातावरणातील बदलामुळे उध्दवणारे अत्यंत उष्ण तापमान
पृथ्वीवरील प्रणाली टिकवून ठेवण्यासाठी एक इष्ट बाब आहे.
III. पृथ्वीवरील प्रणाली राखली जाण्यात केवळ हवामानातील बदल कारणीभूत आहेत.
A. फक्त गृहीतक III अंतर्भूत आहे.
B. फक्त गृहीतक I अंतर्भूत आहे.
C. फक्त I आणि III ही गृहीतक अंतर्भूत आहेत.
D. फक्त I आणि II ही गृहीतक अंतर्भूत आहेत.
Intelligence and Aptitude Quiz
5. ‘FLOATING’ या शब्दामध्ये अक्षरांच्या अशा किती जोड्या आहेत, ज्यांच्यादरम्यान तितकीच अक्षरे आहेत, जितकी प्रमाणित इंग्रजी वर्णमालाक्रमात त्यांच्यादरम्यान आहेत ? ( पुढील आणि मागील या दोन्ही दिशेने केलेल्या मोजणीला विचारात घ्या.)
A 1
B. 2
C. 3
D. एकही नाही
6. दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी ज्याप्रमाणे संबंधित आहे, त्याच प्रकारे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असणारा पर्याय निवडा. त्रिपोली : लिब्या :: पोर्ट लुईस ?
A. केप टाउन
B. कॅमेरुन
C. व्हिक्टोरिया
D. मॉरिशस
7. 22 जून 2004 रोजी मंगळवार असल्यास, 15 जुलै 2017 रोजी कोणता वार असेल ?
A. शनिवार
B. रविवार
C. सोमवार
D. शुक्रवार
8. K, L, M, N, O आणि P या सहा व्यक्ती उत्तरेकडे तोंड करुन एका सरळ रेषेत बसल्या आहेत. K हा M च्या लगत डावीकडे बसला आहे. L हा N च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. N हा P च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. M हा O च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. तर L च्या लगतच्या उजवीकडे कोण बसले आहे ?
A. K
B.O
C. M
D. P
Intelligence and Aptitude Quiz
9. P, Q, R, S, T, U, V आणि W या आठ मुली एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करुन बसल्या आहेत, परंतु याच क्रमाने बसल्या असतील असे नाही. W ही I च्या डावीकडे तिसरी आहे. आणि I यांच्यादरम्यान फक्त R बसलेली T आहे. Q ही T च्या उजवीकडे चौथी आहे. S ही R च्या उजवीकडे दुसरी आहे. W ही s च्या उजवीकडे दुसरी आहे. P हीच्या लगत डावीकडे आहे. ए ही W च्या लगत शेजारी बसलेली नाही. तर W च्या लगत उजवीकडे कोण बसले
आहे ?
A. P
B. Q
C. V
D. R
10. संख्या, अक्षर, चिन्ह यांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या.
(डावे) KN M 64 RT 3 % 7 # F @VZ 2 9 K P 6 & F @ H % & N % M # & U@PUY6% 7S @ % K & P (उजवे)
वरील मालिकेतील सर्व संख्या गाळल्या, तर उर्वरित मालिकेत डावीकडील टोकाकडून 11 वे अक्षर / चिन्ह कोणते असेल ?
A. V
B. Z
C. P
D. &
योग्य उत्तर बघण्यासाठी खालील बहुपर्यायी प्रश्न मंजुषा सोडवा
बहुपर्यायी प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी 👉 फक्त या ओळीला स्पर्श करा
Intelligence and Aptitude Quiz
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३
प्रसिध्दी निवेदन वाचण्यासाठी 👉 फक्त या ओळीला स्पर्श करा

Leave a Comment

error: Content is protected !!