Implementation Of Revised NPS And UPS For Employees Covered By NPS

Implementation Of Revised NPS And UPS For Employees Covered By NPS
Regarding the implementation of the State Government’s “Revised National Pension Scheme” and the Central Government’s “Unified Pension Scheme” (UPS) for employees covered by the National Pension System
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचा-यांना राज्य शासनाची “सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना” तसेच केंद्र शासनाची “एकीकृत निवृत्ती योजना’ (UPS) लागू करणेबाबत.
दिनांक :-१३/०३/२०२५.
क्र. शिसंमा/२०२५/टि-७/एनपीएस तसेच युपीएस/१२५३
महत्वाचे
विषय :- राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचा-यांना राज्य शासनाची “सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना” तसेच केंद्र शासनाची “एकीकृत निवृत्ती योजना’ (UPS) लागू करणेबाबत.
संदर्भ :- १) वित्त विभाग शासन निर्णय क्र. सेनिवे-२०२४/प्र.क्र.५४/सेवा-४ दि. २० सप्टेंबर, २०२४.
२) अवर सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. सेनिवे-२०२५/प्र.क्र.१२/टिएनटी-६, दि. २५ फेब्रुवारी, २०२५ रोजीचे पत्र.
३) मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाचे क्र. शिआका/लेखा-१६६/एनपीएस तसेच युपीएस /२०२५/१२३९ दि. १३ मार्च, २०२५.
उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र. १ ते ३ अन्वये आपणास कळविण्यात येते की, वित्त विभागाने संदर्भ क्र. १ शासन निर्णय निर्गमित केला आहे. संदर्भ क्र. २ व ३ नुसार शासनाने व मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाने कळविल्याप्रमाणे सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पुढीलप्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे.
“राज्यशासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा एक वेळेचा (One Time Password) विकल्प दिनांक ३१/०३/२०२५ पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांचेकडे सादर करावा.”
Also Read 👇
संदर्भ क्र. १ च्या संदर्भात सदर शासन निर्णय लागू असलेल्या आपल्या अधिनस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या बाबतीत नियमोचित कार्यवाही आपल्या स्तरावरून होणे आवश्यक आहे. त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्र. २ अन्वये शासनाने विचारणा केल्यानुसार संदर्भ क्र. १ शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर शासन निर्णय लागू असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बाबतीत कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दिनांक २५/०३/२०२५ पूर्वी संचालनालयास सादर करावा.
मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.
सोबतः वरीलप्रमाणे
CIRCULAR PDF COPY LINK
शिक्षण उपसंचालक (अंदाज व नियोजन)
शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे १.
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे
प्रति,१) विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. (सर्व)३) शिक्षणनिरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक) (सर्व)
प्रत- माहितीस्तव सविनय सादर.
१) मा. आयुक्त (शिक्षण), म.रा.पुणे-१
२) श्री. वि. र. परमार, अवर सचिव, टिएनटी-६ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तिवेतन योजना
(UPS) लागू करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
शासन निर्णय क्रमांक सेनिवे-२०२४/प्र.क्र.५४/सेवा-४ वित्त विभाग
मंत्रालय, मुंबई
दिनांक : २०.०९.२०२४.
संदर्भ : शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र.२९/सेवा-४, दि.१४.०३.२०२३.
प्रस्तावना :
संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निोिवेतन प्रणाली व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन)