Celebration Of Water Awareness Week
Celebration Of Water Awareness Week
Regarding the celebration of Water Awareness Week from 16th to 22nd March, 2025.
Jal Jagruti Saptah
क्रमांक :- संकीर्ण-२०२५/प्र.क्र.९७/एसडी-४
दिनांक : १३ मार्च, २०२५
विषय :- दि. १६ ते २२ मार्च, २०२५ या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करणेबाबत.
संदर्भ :- जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. जलस-२०२५ /(प्र.क्र.४६/२५) / लाक्षेवि (आस्था), दिनाक ११.०३.२०२५
महोदय,
उपरोक्त विषयाच्या संदर्भाधीन पत्राची प्रत सोबत जोडण्यात आली आहे.
२. सदर पत्रान्वये असे कळविण्यात आले आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. १६ ते २२ मार्च, २०२५ या दरम्यान “जलजागृती सप्ताह” साजरा केला जाणार आहे.
३. जलसंपदा विभागाच्या दिनांक ११.०२.२०१६ रोजीच्या शासन निर्णयामधील सूचनांनुसार सदर सप्ताह साजरा करावयाचा आहे. सप्ताह साजरा झाल्यानंतर याबाबतच्या कार्यवाहीबाबत त्या विभागास अवगत करावयाचे आहे.
४. संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने ‘जलजागृती सप्ताह’ साजरा करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात यावा, ही विनंती.
सहपत्र : वरीलप्रमाणे
आपला,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय (विस्तार), दालन क्र. ४१५, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई
प्रति,
आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत : माहिती तथा आवश्यक त्या कार्यवाहीस्तव अग्रेषित.
१) शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे.
२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे.
३) निवडनस्ती (एस.डी. ४)
महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग, नविन प्रशासकीय भवन, १० वा मजला,मंत्रालय, मुंबई
जलस-२०२५/(प्र.क्र. ४६/२५)/लाक्षेवि, (आस्था)
दिनांक : ११/०३/२०२५
विषय: दि.१६ ते २२ मार्च, २०२५ या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करणेबाबत.
संदर्भ : शासन निर्णय.क्र. संकीर्ण-२०१६/(प्र.क्र.०७/१६) लाक्षेवि (आस्था), दि. ११/०२/२०१६.
महोदय,
कृपया संदर्भाधीन शासत्त निर्णयाचे अवलोकन व्हावे.
अआंतराष्ट्रीय स्तरावर २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. १६ ते. २२. मार्च, २०२५ या दरम्यान “जलजागृती सप्ताह” साजरा केला जाणार आहे..
३. त्या अनुषंगाने दि. १६ ते २२ मार्च, २०२५ या. दरम्यान “जुलजागृती सप्ताह साजरा करण्याबाबत
आपल्या विभागातर्फे कार्यवाही करण्याच्या सूचना आपले स्तरावरुन संबंधितांना देण्यात याव्यात. तसेच
सप्ताह साजरा झाल्यानंतर याबाबत झालेल्या एकंदरीत कार्यवाहीबाबत या विभागास अवगत करावे, ही
विनंती.
हे ही वाचा 👇
World water Day जागतिक चल दिना बद्दल अधिक जाणून घ्या त्यासाठी या ओळीला स्पर्श करा
आपला,
उपसचिव, महाराष्ट्र शासन
प्रति,१) अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव, कृषी विभाग, मंत्रालय, मुंबई२) अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई३) अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई४) अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई५) अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव, उदयोग विभाग, मंत्रालय, मुंबई६) अ.मु.स./ प्रधान सचिव/सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई७) अ.मु.स./ प्रधान सचिव/सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई८) अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई९) महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.