Human Metapneumovirus HMPV Do Or Donts
Human Metapneumovirus HMPV Do Or Donts
Human Metapneumovirus HMPV
Do Or Don’t
virus in China
हे करा हे करू नका
Regarding the epidemic outbreak of HMPV virus in China
HMPV VISHANU SATHROG CHIN
एचएमपीव्ही या विषाणूच्या चीन देशामधील साथरोग उद्रेकाबाबत
विषय – एचएमपीव्ही या विषाणूच्या चीन देशामधील साथरोग उद्रेकाबाबत
संदर्भ – डीजीएचएस आणि संचालक, एन सी डी सी, दिल्ली यांचे निवेदन दिनांक ३ जानेवारी २०२५
वरील संदर्भिय विषयानुसार, सध्या चीनमध्ये Human Metapneumovirus (HPMV) उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस मध्ये २००१ मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास
(सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो. या अनुषंगाने डीजीएचएस आणि संचालक, एन सी डी सी, दिल्ली यांनी दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी एक निवेदन प्रसिध्द केले आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापी खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
हे करा :
➤ जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
➤ साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
➤ साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
➤ ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
➤ भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
➤ संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
हे करू नये :
➤ हस्तांदोलन टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
➤ आजारी लोकांशी जवळचा संपर्क
➤ डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
➤ सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
➤ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.
चीनमधून आलेल्या नवीन विषाणू Human Metapneumovirus(HMPV) अहवालांबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. तथापी या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी- खोकला अर्थात आय एल आय/ सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत.
संचालक आरोग्य सेवा, पुणे
प्रत कार्यवाहीस्तव :- सहसंचालक आरोग्य सेवा, (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य आजार), पुणे
प्रत माहितीस्तव सादरः-
१) मा. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
२) मा.आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
प्रति,उपसंचालक, आरोग्य मंडळ, … ( सर्व) जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषस, … (सर्व) जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय,… (सर्व)