Har Ghar Tiranga 2025 Campaign under Azadi Ka Amrit Mahotsav

Har Ghar Tiranga 2025 Campaign under Azadi Ka Amrit Mahotsav

Har Ghar Tiranga 2025 Campaign under Azadi Ka Amrit Mahotsav

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

जा.क्र.राशैसंप्रप/सा.शा./ह.घ.ति./२०२५/

दि. ०६/०८/२०२५

विषय : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ” हर घर तिरंगा २०२५” मोहिमेबाबत

संदर्भ : मा. उपसचिव, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे पत्र दि. ३१ जुलै, २०२५ परिपत्रक वाचा या ओळील स्पर्श करून

उपरोक्त संदर्भ विषयी सूचित करण्यात येते की, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ” हर घर तिरंगा ” मोहीम सुरु करण्यात आली होती जेणेकरून लोकांना भारताच्या स्वातंत्र्याचे दर्शन घडवण्यासाठी तिरंगा घरी आणण्यास आणि तो फडकविण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकेल. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी आणि तिरंग्याशी वैयक्तिक आणि भावनिक संबंध निर्माण करण्यसाठी प्रोत्साहित करणे आहे. या वर्षी हर घर तिरंगा मोहीम २ ते १५ ऑगस्ट, २०२५ पर्यंत खालील तीन टप्प्यात आयोजित करवयाचे आहे.

🇮🇳 १५ ऑगस्ट, २०२५ स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचालन व विविध उपक्रम घेऊन साजरा करणे बाबत शिक्षण आयुक्त सूचना वाचा या ओळीला स्पर्श करून

अ.क्र टप्पा तारीख उपक्रम
१ १ २ ते ८ ऑगस्ट २०२५

तिरंगा – प्रेरित कलाकृतीने शाळेच्या भिंती आणि फलक सजवणे.

शाळांमध्ये तिरंगा रांगोळी स्पर्धांचे आयोजन करणे.

सैनिक आणि पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या पाठविण्यास मदत करण्यासाठी टपाल विभागाच्या समन्वयाने तिरंगा
राखी बनवण्याच्या स्पर्धा आयोजित करणे.

सैनिक आणि पोलिस कर्मचाऱ्यांना पत्रे पाठवण्याची सुविधा देण्यासाठी टपाल विभागाच्या समन्वयाने विद्यार्थ्यांनी सशस्त्र दल आणि पोलिस कर्मचाऱ्यांना उद्देशून पत्रलेखन मोहीम आयोजित करणे.

MyGov पोर्टलद्वारे तिरंगा यावरील राष्ट्रीय प्रश्नमंजुषेत MeitY (MyGov) च्या समन्वयाने सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे.

सांस्कृतिक मंत्रालयाने

🌐 www.harghartiranga.com

या केलेल्या वेबसाइटच्या डाउनलोड या Tab वर जाऊन शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रदर्शन दाखवणे .

९ ते १२ ऑगस्ट २०२५

तिरंगा यात्रा / रॅलींमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेणे.

१३ ते १५ ऑगस्ट २०२५

सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित करणे.

विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून

🌐 www.harghartiranga.com

या वेबसाइटवर अपलोड करण्यास प्रोत्साहित करणे.

सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मोहिमेदरम्यान त्यांच्या घरी भारतीय राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी आणि

🌐
www.harghartiranga.com

या वेबसाईटवर तिरंग्यासोबतची सेल्फी अपलोड करण्यसाठी प्रोत्साहित करावे. भारतच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळामध्ये ध्वजारोहण आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. भारताचे राष्ट्रीय ध्वज प्रदर्शित करताना ध्वज संहिता २००२

https://www.mha.gov.in/sites/default/files/flagcodeofindia070214.pdf

चे पालन करावे. यासाठी तिरंग्यासोबत सेल्फी, प्रभातफेरी, तिरंगा रॅली (बाईक आणि सायकल रॅलीसह) तिरंगा प्रदर्शन, तसेच इतर समाज सहभाग घेण्यात यावा. सदर मोहिमेअंतर्गत हाती घेतलेले उपक्रम विविध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पाठवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल
📧
eel.section-edu@gov.in

आणि

📧 socialsciencedept@maa.ac.in

या ईमेलवर पाठवावा. सर्व विदयार्थी, शिक्षक, पर्यवेक्षीय यंत्रणा आणि समाजाच्या सक्रिय सहभागामुळे हर घर तिरंगा २०२५ मोहीम आपल्या देशातील प्रत्येक भागात पोहोचेल, ज्यामुळे एकता आणि देशभक्तीची भावना निर्माण होईल. यासाठी सर्वांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांचा सहभाग घेण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेश निर्गमित करण्यात यावेत.

परिपत्रक पीडीएफ लींक

संचालक राज्य शैक्षिणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे-३०

प्रत माहितीस्तव सविनय सादर :

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे

प्रति,
१. विभागीय उपसंचालक, सर्व
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
४. शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, सर्व
५. प्रशासन अधिकारी मनपा/नपा
६. शिक्षण निरीक्षक मुंबई (दक्षिण, पश्चिम, पूर्व)

“एक भारत-श्रेष्ठ भारत ” योजनेअंतर्गत सर्व शाळांमध्ये उपक्रम राबविणे बाबत…SCERT परिपत्रक व लिंक या ओळीला स्पर्श करा

IMG 20250806 203144
Har Ghar Tiranga 2025 Campaign under Azadi Ka Amrit Mahotsav

Leave a Comment

error: Content is protected !!