राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे” आयोजन करणेबाबत Ganit Utsav 2024

Ganit Utsav 2024

IMG 20241219 210056
Ganit Utsav 2024

Ganit Utsav 2024

Ganit Utsav 2024 is a celebration of National Mathematics Day

Ganitotsav 2025

organizing “Ganitotsav” on the occasion of National Mathematics Day

Ganit Utsav 2025

जा.क्र. राशैसंप्रपम/गवि/गणित दिन/२०२४-२५/06137

दिनांक : १७ डिसेंबर २०२४

विषय :- राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे” आयोजन करणेबाबत…

संदर्भ :- १. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२०

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० मध्ये गणित विषयाचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित करण्यात आले आहे. शालेय स्तरापासूनच गणित विषयाची गोडी लागावी यासाठी विविध प्रयत्न करणे आवश्यक आहे. गणित विषयाचे पूर्व प्राथमिक स्तरापासून कृती आधारित व आनंदायी पद्धतीनेअध्यापन व्हावे यासाठी या स्तरापासूनच खेळ आधारित अध्यापन शास्त्र, गणितीय खेळ, कोडी, परिसरातील गणित यांचा समावेश दैनंदिन गणित अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत करावा याविषयी धोरणामध्ये सूचना देण्यात आल्या आहेत.

Ganitotsav 2025
Mathematician Srinivasa Ramanujan Quiz गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जिवनावर आधारित प्रश्न मंजुषा

तसेच, गणित विषयाची ध्येये ज्यामध्ये पायाभूत स्तरावर प्रारंभिक संख्याज्ञान संपादन ते परिसरातील अनुभवांशी गणिताची जोड, व्यवहारात सहजतेने वापर ते उच्च विचार प्रक्रियांचे विकसन , गणितीय तर्क करणे, गणितीय मर्मदृष्टी (Mathematical Intuition) ते विचारांचे गणितीकरण यांचा समावेश आहे. भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी प्रत्येक वर्षी २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो.

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सव-२०२५” चे आयोजन दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी आयोजन राज्यातील पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्येवअंगणवाडीमध्ये करण्यात यावे. यावर्षीच्या” गणितोत्सव” ची प्रमुख संकल्पना (Theme) “नवनिर्मिती आणि प्रगती साठी गणित : एक दुवा” (Mathematics : The Bridge to Innovation and Progress) ही निश्चित करण्यात येत आहे.

सदर संकल्पनेवर आधारित “गणित्तोत्सव-२०२५” मध्ये खालील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. सदर नियोजन करत असताना विद्यार्थी, शाळा, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालक यांचा सक्रीय व उत्स्फूर्त सहभाग घेण्यात यावा.

पायाभूत स्तर ते उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करावयाचे उपक्रम संकल्पना (Theme) “नवनिर्मिती आणि प्रगती साठी गणित : एक दुवा ” (Mathematics: The Bridge to Innovation and Progress)

अ.
कार्यक्रमाचे नाव
विषय
क्र.
१ गणितीय परिपाठ
गणित तज्ञांच्या रंजक गोष्टी, पारंपरिक गोष्टीतील गणित, परिसरातील गणित, प्रत्येकासाठी गणित गणिती कोडी/ कूटप्रश्न, गणित विषयक गाणी/ बडबड गीते, इत्यादी
२ गणित गप्पा (Math’s Talk)/ निबंध स्पर्धा
भारतीय गणिताचा इतिहास, भारतातील आणि महाराष्ट्रातील गणिततज्ञ, भारतीय गणिताचे जगाला योगदान, भारताच्या विकासात गणिताचे योगदान

३ गणितातील सौंदर्य (Beauty in Mathematics)
गणितीय फोटो स्पर्धा व प्रदर्शन, भौमितिक आकार, आकृतिबंध, गणित तज्ञ रेखाचित्र व इतर सर्जनशील संकल्पना.
४ प्रश्नमंजूषा स्पर्धा / पोस्टर स्पर्धा
बौद्धिक कोडी निर्मिती व सोडविणे स्पर्धा, गणितीय पहेली, कूटप्रश्न, परिसरातील/व्यवहारातील गणित, खेळातील गणित.

५ गणित जत्रा/ गणित मेळावा / गणितीय शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन
शिक्षक साहित्य निर्मिती, विद्यार्थी साहित्य निर्मिती, गणित खेळ, गणित पेटीतील साहित्य, इ. परिसरातील गणित Mathematical concept short video, /Hackathon/क्षेत्रभेट उपरोक्त सर्व उपक्रमामध्ये आपण, सर्व क्षेत्रीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, गणित प्रेमी यांनी प्रदर्शनास भेटी द्याव्यात. उपरोक्तप्रमाणेविद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा / कार्यक्रमाचार ते ३ मिनिटाचा व्हिडीओ व फोटो, समाज संपर्क माध्यमांवर (उदा. इंस्टाग्राम, फेसबुक व इतर) #Nationaleducationpolicy२०२०,

Mathematicsday२०२५, #Ganitotsa २०२५#SCERTMAHARASHTRA या HASHTAG (#) चा वापर करून आपल्या व्हिडीओ, फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड करण्यात यावी व प्रस्तुत कार्यालयाचे अधिकृत फेसबुक पेज SCERT, MAHARASHTRA ला टॅग करावे.

“गणित्तोत्सव-२०२५”चे आयोजन उत्साहाने व नाविन्यपूर्ण पद्धतीने व्हावे याकरिता आपले स्तरावरून प्रयत्न करावेत तसेच आपण व क्षेत्रीय अधिकारी यांनी भेट द्यावी.

CIRCULAR pdf copy link

(डॉ. कमलादेवी आवटे)
उपसंचालक (समन्वय) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Leave a Comment

error: Content is protected !!