Formation Of Committee For Samagra Shiksha Yojana Employees समग्र शिक्षा योजनेंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत

Formation Of Committee For Samagra Shiksha Yojana Employees

image 3
Formation Of Committee For Samagra Shiksha Yojana Employees

Formation Of Committee For Samagra Shiksha Yojana Employees

Regarding the formation of a committee to make recommendations regarding the issues of employees working on a contractual basis under the Samagra Shiksha Yojana.

समग्र शिक्षा योजनेंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.

दिनांक : ०४ जुन २०२५.

वाचा:-शासन निर्णय, समक्रमांक, दि. २२.०८.२०२४, दि. १४.१०.२०२४ व दि. ०४.०३.२०२५.

प्रस्तावना:-
समग्र शिक्षा योजनेंतर्गत कार्यरत करार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि. २२.७.२०२४ रोजी सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये मा. मुख्यमंत्री महोदयांनी या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार, समिती गठीत करण्याबाबत दि.०४.०३.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये दि. १४.१०.२०२४ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करून समितीची पुर्नरचना करण्यात आली होती. सदर समितीचे प्रशासकीय कारणास्तव पुनर्विलोकन करून समग्र शिक्षा योजनेंतर्गत कार्यरत करार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी सुधारीत समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-
संदर्भाधिन दि.०४.०३.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समग्र शिक्षा योजनेंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेली समिती या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे.
२. समग्र शिक्षा योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी खालीलप्रमाणे समितीची पुनर्रचना करण्यात येत आहे.

image 5
Formation Of Committee For Samagra Shiksha Yojana Employees

२. सदर समितीने या करार कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत समायोजन व अन्य प्रश्नाबाबत अन्य राज्यांमध्ये या योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मानधन व अन्य सेवाशर्ती याबाबत अभ्यास करून शासनास तीन महिन्याच्या आत अहवाल सादर करावा.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०६०४१५२०२८४६२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

उप सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः बैठक-२०२४/प्र. क्र. ९०/एसडी-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई

Leave a Comment

error: Content is protected !!