Exemption In Property Tax मालमत्ता करातून सूट

Exemption In Property Tax

IMG 20250329 193640
Exemption In Property Tax

Exemption In Property Tax

Exemption In Property Tax to Ex-Servicemen And Soldier Widows/Wife under the Hon’ble Balasaheb Thackeray Ex-Servicemen Honor Scheme

मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेंतर्गत माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत.

दिनांक: २८/०३/२०२५.

वाचा:-
१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण २०२०/प्र.क्र. १०१/भाग-२/मासैक, दि.२३/११/२०२०

२) संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचे पत्र क्र. १८१४३/टॅक्सेस/सैकवि-१७, दि. १४/०८/२०२४.

   शासन शुद्धीपत्रक

उपरोक्त वाचा येथील संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना मालमत्ता करातून सूट देण्यात येत आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद २ अ मध्ये ” या योजनेचे लाभ मिळण्यासाठी सदर माजी सैनिक महाराष्ट्र राज्यात जन्मलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्षे सलग रहिवासी असावा.” असे नमुद केले आहे.

याऐवजी संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय परिच्छेद २ अ मधील अट खालीलप्रमाणे वाचावीः-

” या योजनेचे लाभ मिळण्यासाठी सदर माजी सैनिक महाराष्ट्र राज्याचा जन्मतः अधिवासी असावा किंवा त्यांचे आई वडील/आजी/आजोबा महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत. इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरीत झालेल्या माजी सैनिकांनी सैन्यसेवेतील निवृत्तीनंतर किमान सलग १५ वर्षे महाराष्ट्र राज्यात वास्तव्य केलेले असावे व या कालावधीमध्ये त्यांनी इतर कोणत्याही राज्यातील सैनिक कल्याण कार्यालयाचे माजी सैनिक ओळखपत्र घेतलेले नसावे.”

IMG 20250329 193649
Exemption In Property Tax

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०३२८१८१०२०५८०७ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नाजाने

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०२०/प्र.क्र.१०१/भाग-२/का-मासैक, मंत्रालय, मुंबई

Leave a Comment

error: Content is protected !!