Establishment Of VANARTI
Establishment Of VANARTI
Regarding the establishment of an autonomous institution, Vasantrao Naik Research and Training Institute (VANARTI)
वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्याबाबत…
दिनांक :- १४.११.२०२५
संदर्भ :
१) शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्र. महाज्यो-२०२३/प्र.क्र.३८/ संस्था, दिनांक ८/१०/२०२४.
शुध्दीपत्रक
संदर्भ क्र. १ येथे नमूद दि. ०८.१०.२०२४ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. १ व परिच्छेद क्र. २(१) मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
शुध्दीपत्रक
संदर्भ क्र. १ येथे नमूद दि. ०८.१०.२०२४ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. १ व परिच्छेद क्र.२(१) मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
परिच्छेद क्र. १) गोर बंजारा जमातीसह अन्य विमुक्त जाती-अ, भटक्या जमाती-ब, भटक्या जमाती-क व
भटक्या जमाती-ड या मागासलेल्या जमातीच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याने प्रामुख्याने या जमातींचे संशोधन व अभ्यास करण्यासाठी तसेच, त्यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकडे प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी व या घटकांतील विद्यार्थी, युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध कार्यक्रम / उपक्रम राबविण्यासाठी कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत नियम ८ अन्वये, “वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी)” ही स्वायत्त संस्था मुंबई येथे स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
परिच्छेद क्र.२) १. प्रामुख्याने गोर बंजारा जमातीसह अन्य विमुक्त जाती-अ, भटक्या जमाती-ब, भटक्या जमाती-क व भटक्या जमाती-ड या प्रवर्गातील इतर वंचित आणि उपेक्षित वर्गातील सदस्य / कुटुंबांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा अभ्यास करणे आणि समजून घेणे, सदर घटकांसाठी सरकारला विविध उपाययोजना सुचवणे.
सदर शासन शुध्दिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक क्र. २०२५१११४१२५३३४५७३४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शुध्दीपत्रक पीडीएफ प्रत लिंक
सह सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन शुध्दीपत्रक क्रमांक: महाज्यो२०२३/प्र.क्र.३८/ संस्था मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
