Employees Exemption from Census Duty
Employees Exemption from Census Duty
Employees Exempted In Janganana Duty
महाराष्ट्र शासन
क्र. : संकीर्ण २०१०/मुमंस २०३/प्र.क्र.३३७/५
सामान्य प्रशासन विभाग,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : 29 सप्टेंबर, २०१०.
प्रति,
सर्व महानगरपालिका आयुक्त तथा महानगरपालिका क्षेत्राचे मुख्य जनगणना अधिकारी तथा मुख्य जनगणना अधिकारी,
सर्व जिल्हाधिकारी.
विषय : शासन सेवेतील अपंग व्यक्तींना जनगणनेचे काम न देण्याबाबत.
एक जानेवारी २०२५ पासून जनगणना वाचा सविस्तर या ओळीला स्पर्श करून
राज्यातील शासकीय/निमशासकीय व इतर कार्यालयात कार्यरत असणा-या अपंग कर्मचा-यांना निवडणुकीची कामे न देण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वी दिल्या आहेत. याच धर्तीवर अपंग कर्मचा-यांना जनगणनेची कामेही न देण्याबाबत महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/अधिकारी संघटना, मुंबई यांनी शासनाकडे विनंती केली आहे.
उपरोक्त विनंतीबाबत शासन स्तरावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येऊन असे निर्देश देण्यात येत आहेत की, शासकीय/निमशासकीय व इतर कार्यालयात कार्यरत असणा-या अपंग कर्मचा-यांना यापुढे जनगणनेची कामे देण्यात येऊ नयेत. ही बाब सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून जनगणनेच्या कामांसाठी यापुढे नियुक्त्या करतांना सदर बाबीचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी.
(सि. मं. इनामदार)
उप सचिव, महाराष्ट्र शासन.