Census 2021
Census 2021
Census 2021,जनगणना २०२१,
एक जानेवारी २०२५ पासून जनगणना प्रक्रिया सुरु
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय, मुंबई
क्रमांक : जनग-१२२०/८६/प्र.क्र.१८/कार्या-५
नांक :- ११ नोव्हेंबर, २०२४.
प्रति,
१) जिल्हाधिकारी (सर्व)
२) महानगरपालिका आयुक्त (सर्व)
विषय: जनगणना २०२१
सर्व जिल्हे/तहसिल/शहरे/गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक ०१ जानेवारी, २०२५ पासून गोठविण्याबाबत.
संदर्भ : क्रमांकः जनग १२२०/८६/प्र.क्र.१८/५, दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२४.
महोदय/ महोदया,
उपरोक्त विषयाधावत संदर्भाधिन दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२५ ची अधिसूचना आवश्यक कार्यवाहीस्तव सोबत जोडली आहे. सदर अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाच्या संकेतत्त्थळावर उपलब्ध आहे. सदर अधिसूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व संबंधित कार्यालयांच्या निदर्शनास आणण्यात यावी, ही विनंती.
सहपत्र- वरीलप्रमाणे
सोबतः- वरीलप्रमाणे. सर्व परिपत्रके पीडीएफमध्ये उपलब्ध लिंक
आपली,
(उर्मिला सावंत)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ वर्ष १०, अंक ११४]
बुधवार, नोव्हेंबर ६, २०२४/कार्तिक १५, शके १९४६
असाधारण क्रमांक २३२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल’यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ नोव्हेंबर, २०२४.
“शुध्दिपत्रक”
जनगणनेकरिता प्रशासकीय सीमा गोठविण्याची सामान्य प्रशासन विभागाची दि.२७ फेब्रुवारी, २०२४ रोजी प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेमध्ये महारजिस्ट्रार कार्यालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. ९-७-२०१९-CD (Cen), दिनांक ८ ऑक्टोवर, २०२४ नुसार खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
वाचा यांना मिळते जनगणना कामातून सवलत / सूट वाचा सविस्तर या ओळीला स्पर्श करून
“सर्व जिल्हे/तहसील/शहरे/गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक ०१ जुलै, २०२४ ऐवजी दिनांक ०१ जानेवारी, २०२५ पासून गोठविण्यात येतील.”
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
The census process will start from January 1, 2025
उर्मिला सावंत, शासनाचे अवर सचिव.
जा.क्र.2024/ जनगणना /कावि-499
दिनांक-21/11/2024
प्रति,
सर्व चार्ज अधिकारी तथा तहसिलदार सर्व चार्ज अधिकारी तथा मनपा / मुख्याधिकारी नगर परिषद / नगरपंचायत-
विषय: जनगणना 2021
सर्व जिल्हे / तहसिल / शहरे / गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनणनेकरिता दिनांक 01 जानेवारी 2025 पासुन गोठविण्याबाबत…
संदर्भ :- 1. मा.अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक: जनग-1220/86/प्र.क.18/ कार्या-5, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र 14 मार्च 2024
- या कार्यालयाचे समक्रमाकीत पत्र दि.8/4/2024
- मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक जनग-1220/86/प्र.क.18/ कार्या-5, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र 11 नोव्हेंबर 2024
उपरोक्त विषयी संदर्भिय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, संदर्भ क्र. 3 अन्वये सामान्य प्रशासन विभाग अधिसुचना दिनांक 06 नोव्हेंबर 2024 मध्ये जनगणनेकरिता प्रशासकीय सीमा गोठविण्याची सामान्य प्रशासन विभागाची दि.27 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या अधिसुचनेमध्ये महारजिस्ट्रार कार्यालय, भारत सरकार नवी दिल्ली यांचे पत्र क्र. 9.7.2019 CD (CEN) दि.8 ऑक्टोंबर 2024 नुमार सुधारणात करण्यात येत असून “सर्व जिल्हे / तहसिल /शहरे / गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक 01 जानेवारी 2025 पासुन गोठविण्यात येतील” असे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने, सदर अधिसुचना आपल्या अधिपत्याखालील सर्व संवधीत कार्यालयाच्या निदर्शनास आणण्याबाबत कळविण्यात आले आहे.
तरी उक्त नमुद अधिसुचनेची प्रत यासोवत संलग्नीत करण्यात आली असून सदर अधिसुचनेमध्ये नमुद केलेनुसार कार्यवाही अनुसरावी व त्यावायतचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा.
सोबतः- वरीलप्रमाणे.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल जनगणना अधिकारी, लातूर