Due to summer all schools in morning session

Due to summer all schools in morning session

IMG 20250328 205111
Due to summer all schools in morning session

Due to summer all schools in morning session

Due to summer all schools in morning session

Due to summer, all schools in the state are in the morning session

महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे

क्रमांक: प्राशिसं ८०२/शाळावेळ/२०२५/02003

दिनांक २८.०३.२०२५

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक)/शिक्षण निरीक्षक/शिक्षण प्रमुख/प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद/महानगरपालिका / नगरपालिका, नगरपरिषद (सर्व)

विषय : उन्हाळयामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करणेबाबत

संदर्भ : १. माध्यमिक शाळा संहिता मधील ५४.२

२. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२४/प्र.क्र.२७/एस.डी.४. दिनांक ०८.०२.२०२४

३. महसूल व वन विभाग यांचे पत्र क्र आव्यप्र-२०२५/प्र.क्र.९९/आव्वप्र-२, दि २१.०३.२०२५

वरील विषयाबाबत संदर्भ विचारात घेता, संदर्भ क्र ३ अन्वये उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेऊन जिल्हा स्तरावरुन उष्णतेचा लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधीत प्रशसकीय विभाग, महानगरपालिका / नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करावयाच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. संदर्भ क्र ३ च्या पत्रासोबत असलेल्या मार्गदर्शक सूचनामधील अ.क्र. ४ नुसार निर्देश दिलेले आहेत.

राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्याथ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदन प्राप्त झालेली आहेत. तसेच काही जिल्हयांनी सकाळ सत्रात शाळा भरविणेबाबत आदेश निर्गमित केले आहेत. तथापि या सर्व जिल्हयांमध्ये शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये वेळापत्रक / शाळेची वेळ यामध्ये एकवाक्यता असणे आवश्यक आहे.

सदर बाब विचारात घेता, राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी ०७.०० ते ११.१५ व माध्यमिक शाळांसाठी ०७.०० ते ११.४५ अशी करण्यात यावी. (सोबत वेळापत्रक जोडले आहे.) स्थानिक परिस्थितीनुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने या कालावधीमध्ये बदल करता येईल. संदर्भ क ३ मधील उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद देण्यासाठी खाली नमूद सूचना विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्यास्तरावरुन सर्व शाळांना कळविण्यात यावे,

१. उन्हाळयात विद्यार्थ्यांनी मैदानी/शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत.

२. विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे.

३. वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे,

४. विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करुन द्यावे.

५. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे.

६. पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.

७. डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करणे.

८. उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालणे.

९. उन्हात बाहेर पडणे टाळणे

(संपत सुर्यवंशी)

शिक्षण संचालक (माध्य व उच्च माध्य) महाराष्ट्र राज्य, पुणे

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत- माहितीस्तव सविनय सादर

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

२. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे

1 thought on “Due to summer all schools in morning session”

  1. अतिशय उन्हाळा तीव्र आहे. शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. अभिनंदन

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!