Dr Jayant Narlikar Ganit Guruvar Science Somwar Upkram
Dr Jayant Narlikar Ganit Guruvar aani Science Somwar Upkram
Dr. Jayant Narlikar Math Thursday and Science Monday Activities
Dr Jayant Narlikar Ganit Guruvar aani Science Somwar Upkram
Dr. Jayant Narlikar Math Thursday and Science Monday Activities
Dr.jayant naralikar ganit aani vidnyan adhyayan samruddhi karyakramantargat palakanchya sahbhagasathi Dr. jayant naralikar ganit guruvar aani Dr. jayant naralikar science somwar upkram rabavinebabat
Dr. Jayant Narlikar Math and Science Study Enrichment Program for parents’ participation in Dr. Jayant Narlikar Math Thursday and Dr. Jayant Narlikar Science Monday activities
दि.८/०४/२०२६
जा.क्र. राशैसंप्रपम/STEM/२०२६-२७/प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), (सर्व)
प्रशासन अधिकारी (मनपा, नपा) (सर्व)
विषयः डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत पालकांच्या सहभागासाठी डॉ. जयंत नारळीकर गणित गुरुवार आणि डॉ. जयंत नारळीकर सायन्स सोमवार उपक्रम राबविणेबाबत...
संदर्भ:
१) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेत झालेल्या आढावा बैठकीतील निर्देश दि.२४.०७.२०२६
२) महाराष्ट्र शासन व खान अकॅडमी यांच्यामध्ये करण्यात आलेला सामंजस्य करार दि. ३० जुलै, २०२५
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून महाराष्ट्रातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांच्या गुणवत्ता वाढीसाठी डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या साहाय्याने आणि राज्याच्या अभ्यासक्रमाशी संलग्न असलेले गणित (इयत्ता १ ली ते १० वी) आणि विज्ञान (इयत्ता ६ वी ते १० वी) विषयांसाठी ई-साहित्य मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी घरी सराव करण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे आणि पालकांचा सातत्यपूर्ण सहभाग या प्रक्रियेला यशस्वी करतो. सदर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी खालील नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहेतः
१. डॉ. जयंत नारळीकर गणित गुरुवारः प्रत्येक गुरुवारी रात्री ८:०० ते १०:०० च्या दरम्यान किमान ३० मिनिटांसाठी पालकांनी त्यांच्या पाल्यांसोबत स्वतः बसावे आणि सदर कार्यक्रमांतर्गत उपलब्ध असलेल्या ‘खान अकॅडमी’ प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांचा गणित विषयाचा सराव करून घ्यावा.
२. डॉ. जयंत नारळीकर सायन्स सोमवारः प्रत्येक सोमवारी रात्री ८:०० ते १०:०० च्या दरम्यान किमान ३० मिनिटांसाठी पालकांनी त्यांच्या पाल्यांसोबत स्वतः बसावे आणि ‘खान अकॅडमी’ प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांचा सायन्स/विज्ञान या विषयाचा सराव करून घ्यावा.
अंमलबजावणीसाठी आवश्यक कार्यवाहीः
पालक सभेचे आयोजनः सर्व शाळांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ च्या पूर्वी पालक सभेचे आयोजन खात्रीपूर्वक करावे.
पालकांचे उद्बोधनः शाळांना पालक सभा घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत एक सादरीकरण (PPT) उपलब्ध करून देण्यात आले आहे.
PPT ची लिंक:
QR कोड:
डिजिटल साधनांची उपलब्धताः ज्या विद्यार्थ्यांकडे घरी डिजिटल साधने उपलब्ध नाहीत, त्यांना ती शाळेत उपलब्ध
करून दिली जावीत. तसेच, समाजातील इतर सदस्य, गावातील वडीलधारे व्यक्ती अथवा त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडून त्यांना मदत मिळेल याची शाळा व स्थानिक पातळीवर खात्री करावी; जेणेकरून सर्व विद्यार्थी स्वतःच्या गतीने या साहित्याचा लाभ घेऊ शकतील.
जिल्हास्तरीय परिपत्रके: ही माहिती सर्व शाळांपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी जिल्ह्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातून तात्काळ परिपत्रके काढावीत. तसेच, प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला प्राधान्य द्यावे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
तांत्रिक मदत व सहकार्य खान अकॅडमी प्लॅटफॉर्म वापरताना शिक्षकांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास,
शिक्षकांना पुढील हेल्पलाईनवर संपर्क करून आवश्यक मार्गदर्शन मिळवता येईलः
फोन कॉल सपोर्ट: 011-41168778 (सोमवार ते शनिवार, सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:००) व्हॉट्सअॅप सपोर्ट: 7303882661 (या क्रमांकावर “hi” असा मेसेज पाठवावा)
तरी, सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या यंत्रणेला सदर नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबत आणि पालक सभेसाठी उपलब्ध PPT बाबत सविस्तर माहिती द्यावी. तसेच सदर माहिती सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचेल आणि डॉ. जयंत नारळीकर गणित गुरुवार आणि डॉ. जयंत नारळीकर सायन्स सोमवार उपक्रम सर्व शाळांमध्ये प्रभावीपणे राबविला जाईल, याची दक्षता घ्यावी.
Digitally signed by HEMANT VASEKAR Date: 11-08-2026 18:57:22
(डॉ. हेमंत वसेकर भा.प्र.से) संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
प्रत माहितीस्तव सविनय सादर
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.