Ananddayi Shanivar Upkram

Ananddayi Shanivar Upkram
Sarv shalanmadhye “ananddayi shanivar” upkramachya anmalbajavanibabat
Subject: Regarding the implementation of the “Happy Saturday” initiative in all schools.
जा.क्र. राशैसंप्रपम/VGPG / आनंददायी शनिवार / २०२६-२७ स्वाक्षरीचा दिनांक
प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)
विषय : सर्व शाळांमध्ये “आनंददायी शनिवार” उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत…
संदर्भ :
१) शासन परिपत्रक दि १४ मार्च २०२४
२) प्रस्तुत कार्यालयामार्फत जुलै २०२४ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली कृतिपुस्तिका
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये नमूद केल्यानुसार २१ व्या शतकातील कौशल्ये, व्यावहारिक कौशल्ये, चांगल्या सवयी संपादन करून एक सुजाण व उत्पादक नागरिक घडविण्यासाठी शालेय शिक्षणात आनंददायी शनिवार या उपक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे. दिनांक १४ मार्च २०२४ च्या शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार इयत्ता १ ली ते ८ वी च्या शासनमान्य सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने शिक्षकांना शाळा स्तरावर उपक्रमाची अंमलबजावणी करणे सुलभ होण्याकरिता मार्गदर्शक म्हणून आनंददायी शनिवार कृतिपुस्तिका विकसित करण्यात आलेली आहे. ही कृतिपुस्तिका परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
संदर्भ क्र.१ नुसार शासन परिपत्रक दिनांक १४ मार्च २०२४ निर्देशानुसार व शिक्षकांसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तीकेनुसार प्रत्येक शनिवारी “आनंददायी शनिवार” हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची भूमिका व उद्देश विशेषत्वाने खालील प्रमाणे नमूद करण्यात आले आहे.
आनंददायी शनिवार कृती पुस्तिका पीडीएफ साठी या ओळीला स्पर्श कराल
उपक्रमाची भूमिका व उपक्रमाचा उद्देश-
१. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ उत्तम राखणे.
२. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे
३. शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे
४. विद्यार्थ्यामध्ये व्यावसायिक व संभाषण कौशल्य विकसित करणे.
५. विद्यार्थांमध्ये आत्मविश्वास व नैराश्येवर मात करण्याची क्षमता निर्माण करणे.
६. विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे.
७ विविध सण व उत्सवांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची जोपासना करणे
या उपक्रमाची भूमिका व उद्देश साध्य करण्यासाठी आनंददायी शनिवार कृतिपुस्तिकेत अनेक मार्गदर्शक कृती देण्यात आलेल्या आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून खाली दिलेल्या नियोजनानुसार शालेय स्तरावर इयत्ता १ ते ८ च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खालील उपक्रमाचे आयोजन करण्यास सूचित करण्यात येत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हस्तकला, स्थानिक कौशल्य, पर्यावरणस्नेही दृष्टीकोन तसेच राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक मूल्यांची जाणीव करून देण्यात यावी.

करिता संबधित उपक्रमाचे आपल्या अधिनस्त सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना देऊन सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे. तसेच राबविण्यात आलेल्या उपक्रमांची छायाचित्रे व अहवाल याबाबत प्रस्तुत परिषदेस मेल करावा. सदर उपक्रमांना समाज माध्यमाद्वारे व स्थानिक वृत्तपत्रामार्फत व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी देण्यात यावी.
Digitally signed by
Hemant Sharachchandra Vasekar
Date: 20-08-2026 18:48:03
(डॉ हेमंत वसेकर भाप्रसे)
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे