Diwali Holidays
Diwali Holidays
Dipavali Sutti
Diwali Holiday
Revised circular issued regarding planning of government work and holidays for the year 2025-26
दिनांक :- ०८/१०/२०२५
शुध्दीपत्रक
विषय : शासकीय कामकाज व सुटटयांचे नियोजन सन २०२५-२६ बाबत सुधारीत परित्रक निर्गमीत करणे बाबत.
संदर्भ :
१. शिक्षण समिती सभा दिनांक ४/८/२०२५.
२. शिक्षक संवर्गाच्या विविध संघटनांच्या मागणी नुसार.
उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, या कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक जिपवा/ शिविप्रा/आस्था/१८३५/२०२५ दि.२०/८/२०२५ अन्वये सन २०२५-२०२६ या मधील दिवाळीच्या सुट्टी दिनांक १७/१०/२०२५ ते २९/१०/२०२५ अशी जाहीर करण्यात आली होती.
हे ही वाचाल Public Holidays 2025 Declared सार्वजनिक सुट्ट्या २०२५ या ओळीला स्पर्श करून
सदर परिपत्रकामध्ये शिक्षक सवंर्गाच्या विविध संघटनेनी केल्या मागणी नुसार या परिपत्रकाव्दारे बदल करण्यात येऊन पुढील प्रमाणे दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. दिनांक १८/१०/२०२५हा कार्यदिन राहील दिनांक१९/१०/२०२५ रोजी रविवारआहे.
राज्यातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुट्टी जाहीर
दिनांक २०/१०/२०२५ ते ०१/११/२०२५ पर्यन्त दिवाळी सुट्टी राहील. दिनांक०२/११/२०२५ रोजी रविवार असल्याने दिनांक ०३/११/२०२५ पासुन शाळा सुरू होतील असे या आदेशान्वये जाहीर करण्यात येत आहे. इतर सुट्टी मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही याची नोंद घ्यावी.
सबब आपण आपल्या अधिनस्त दिवाळीच्या सुट्टी मध्ये झालेल्या बदला बाबत सर्व मुख्याध्यापकांना अवगत करावे तसा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा.
परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक
वाचा : या कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक जिपवा/ शिविप्रा/आस्था/१८३५/२०२५ दि.२०/८/२०२५.
2380 जाक्र/जिपवा/शिविप्रा/आस्था//२०२५
कार्यालय शिक्षण विभाग जि.प.वाशिम
प्रती,
१) गट शिक्षण अधिकारी पंचायत समीती जिल्हा परिषद वाशिम. (सर्व)
२) मुख्याध्यापक/प्रचार्य खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा वाशिम जिल्हा.