Divyanga Vishesh Sahayya Yojana GR
Divyanga Vishesh Sahayya Yojana GR
Special Assistance Scheme for the Divyanga
Special assistance schemes implemented by the Department of Empowerment of the Disabled
दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना १) संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना २) श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजना ३) इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या योजनेच्या क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणीबाबत
दिनांक : ०४ मे, २०२६
संदर्भ :
१. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय, क्रमांक विसयो-२०२६/प्र.क्र.०६/विसयो, दिनांक २४ फेब्रुवारी, २०२६
२. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा शासन निर्णय क्र. दिव्यांग-२०२६/प्र.क्र.२३/कार्यासन ६, दिनांक २३ मार्च, २०२६
३. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा शासन निर्णय क्र. दिव्यांग-२०२६/प्र.क्र.२३/कार्यासन ६, दिनांक ०६ एप्रिल, २०२६
प्रस्तावना
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक २४.२.२०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आलेले आहेत. सबब १ एप्रिल, २०२६ पासून ही योजना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून राबवण्यात येत आहे.
त्यास अनुसरून शासन निर्णय, दिनांक २३.०३.२०२६ अन्वये दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना १) संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना २) श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजना ३) इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना करिता आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी आणि सहाय्यक संचालक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकरिता पदनिर्मिती आणि अनुषंगिक पदभरती करण्याची कार्यवाही सुरू आहे. योजनेची अंमलबजावणी वेळेत व सुरळीत होण्यासाठी स्थानिक पातळीवरील सक्षम यंत्रणा अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने, सदर विशेष सहाय्य योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विद्यमान यंत्रणेमार्फत म्हणजे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तहसिलदार-विशेष सहाय्य योजना व विद्यमान पोर्टलमार्फत चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक
दिव्यांग सक्षमीकरण विभागाची विशेष सहाय्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत पूर्वीप्रमाणेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विद्यमान यंत्रणेमार्फत म्हणजे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तहसिलदार-विशेष सहाय्य योजना व विद्यमान पोर्टलमार्फत चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. विशेष सहाय्य योजने अंतर्गत सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचे वैश्विक ओळखपत्र (UDID) पोर्टलवर नोंदणी/अद्यावतीकरण करण्याची कार्यवाही सर्व तहसीलदार-विशेष सहाय्य योजना यांनी करावी. तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल याची जबाबदारी तहसिलदार यांची राहील.
३. सदर शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्याचा संगणक सांकेतांक २०२६०५०४१४५३५८५०३५ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नांवाने व आदेशानुसार,
शासन परिपत्रक पीडीएफ
(सा. द. मुकदाडवार) अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग, शासन परिपत्रक, क्रमांक: दिव्यांग-२०२६/प्र.क्र.२८/E-१६१९९४३/कार्यासन-६ मंत्रालय, मुंबई
प्रत :
१. मा. मंत्री (दिव्यांग सक्षमीकरण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई
४. प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
५. सचिव, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक.
६. सचिव (लेखा व कोषागारे), नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालय, मुंबई
७. आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे
