Divyang Officers Employees Exempt From Transfer दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ मधील तरतूदीच्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांच्या बदलीसंदर्भात सूचना निर्गमित

Divyang Officers Employees Exempt From Transfer

Divyang Officers Employees Exempt From Transfer

Officers/employees in service who are themselves disabled or whose dependent son/daughter/parent/marital partner/sibling are exempted from transfer

Notification issued regarding transfer of Divyang Officers/Employees in accordance with the provisions of the Rights of Persons with Disabilities Act, 2016

दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ मधील तरतूदीच्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी / कर्मचारी यांच्या बदलीसंदर्भात सूचना निर्गमित करण्याबाबत…

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः मविआ २०२३/प्र.क्र.६०/का.१२,मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२

तारीखः २६ ऑगस्ट, २०२५

वाचा :-

१. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६.

२. भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे दि.०८.१०.२०१८ चे कार्यालयीन ज्ञापन

प्रस्तावना :-

दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ च्या कलम २० (५) अन्वये असे विहित करण्यात आले आहे की, शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्यांबाबत सुयोग्य शासन धोरण आखू शकेल. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ च्या परिशिष्टामध्ये “निर्दिष्ट दिव्यांगत्व” याची व्याख्या करण्यात आली आहे, त्यानुसार भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या दि.०८.१०.२०१८ च्या कार्यालयीन ज्ञापनाव्दारे ज्या कर्मचाऱ्यांचे अवलंबित कुटुंब सदस्य निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत, अशा काळजीवाहक कर्मचाऱ्यांना प्रशासकीय सोयीनुसार बदलीतून सूट देण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याच धर्तीवर राज्य शासकीय सेवेतील दिव्यांग प्रवर्गात मोडणारे शासकीय अधिकारी/कर्मचारी व ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील अवलंबित सदस्य असे निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत, अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात सूचना देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती.

 शासन परिपत्रक

राज्य शासकीय सेवेतील जे अधिकारी/कर्मचारी हे स्वतः किंवा त्यांच्यावर संगोपनासाठी अवलंबून असणारे मुलगा/मुलगी/आई-वडील/वैवाहिक जोडीदार/भाऊ बहिण हे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ च्या परिशिष्टामध्ये नमूद केलेले निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत व ज्यांच्याकडे त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र आहे, त्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना संबंधित बदली करणारे सक्षम प्राधिकारी प्रशासनाची सोय आणि पदाची रिक्तता या बाबींचा सारासार विचार करुन सर्वसाधारण बदलीतून सूट देण्याबाबत विचार करतील.

♿ दिव्यांग कर्मचाऱ्यांना मिळणार दुप्पट वाहतूक भत्ता वाचा या ओळीला स्पर्श करून

२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०८२६१४५२०६४२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

उप सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन

IMG 20250826 212241
Divyang Officers Employees Exempt From Transfer

Leave a Comment

error: Content is protected !!