Divyang Kalyan Vibhag Divyangachya Dari Abhiyan
Divyang Kalyan Vibhag Divyangachya Dari Abhiyan
Divyang Kalyan Vibhag Divyangachya Dwari Abhiyan
“Disabled Welfare Department Disability Door Mission
To implement the campaign “Disabled Welfare Department Door to Disability” in every district.
“दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान
“दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याबाबत.
महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग
दिनांक :- २७ जानेवारी, २०२५.
१) दिव्यांग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम, १९९५
२) दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६.
३) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र. अपंग २०१३/प्र.क्र.२०१/अ.क. २. दि.२० फेब्रुवारी, २०१९,
४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांकः शासाउ-१०.१०/प्र.क्र. ९६/१०/सा.उ., दि.१३ मार्च, २०२३.
५) शासन निर्णय, दिव्यांग कल्याण विभाग, क्रमांक दिव्यांग-२०२३/प्र.क्र.५६/दि.क.२, दि.२३ मे,२०२३.
६) शासन परिपत्रक, दिव्यांग कल्याण विभाग, क्रमांक दिव्यांग-२०२३/प्र.क्र.५६/दि.क.२. अनुक्रमे दि. २८ जुलै, २०२३, दि. ०४ ऑगस्ट, २०२३, दि. ०८ ऑगस्ट, २०२३, दि. २२ ऑगस्ट, २०२३, दि. ०८ सप्टेंबर, २०२३, आणि दि. २६ ऑक्टोबर, २०२३.
शासन परिपत्रक
दिव्यांग कल्याण विभागाच्या दिनांक २३ मे २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावर शासनाचे सर्व विभागाचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यागांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करता येईल यासाठी तत्कालिन मा. मुख्यमंत्री महोदय यांचे मान्यतेने “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दिनांक २८ जुलै, २०२३ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सर्वसाधारपणे प्रमाणित कार्यपध्दती (SOP) निश्चित करण्यात आली आहे.
२. सदर अभियान राज्यात ६ जून २०२३ पासून राबविण्यात येत असून सद्यस्थितीत राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २७ जिल्ह्यांत अभियान राबविण्यात आले आहे. या शिबीरांमध्ये दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र, शेतजमिनी संबंधीची कागदपत्रे, जात प्रमाणपत्र व अन्य आवश्यक प्रमाणपत्रे तसेच दिव्यांगांना देण्यासाठी विविध विभागांमार्फत दिव्यांगांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना/सवलती यांची माहिती दिव्यांगांना देण्यासाठी विभागामार्फत स्टॉल्स लावण्यात आले होते. उर्वरित छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नागपूर, जालना, परभणी, नांदेड, रत्नागिरी व सिंधूदूर्ग या ९ जिल्ह्यांत अभियान राबविणे अद्याप प्रलंबित आहे.
३. याबाबत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेले “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” हे अभियान उर्वरित छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नागपूर, जालना, परभणी, नांदेड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये, शासनाच्या जिल्हास्तरीय सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राबविण्यात यावे”, असे निदेश दिले आहेत.
४. दिव्यांग कल्याण विभागाच्या दिनांक २३ मे, २०२३ रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद ४ मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांनी “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान” राबविण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. सबब, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नागपूर, जालना, परभणी, नांदेड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांच्या संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान” राबविण्याची खबरदारी घ्यावी.
५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २०२५०१२७१७३९३३९७३५ असा आहे. तसेच सदर शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
(रा. भा. गायकवाड) अवर सचिव, महाराष्ट्र शासन
शासन परिपत्रक क्रमांक: दिव्यांग २०२३/प्र.क्र.५६/दि.क.२ ३१/३२/३५ “ए” विंग, मित्तल टॉवर, तिसरा मजला, बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई