DigiPin Generate Link
DigiPin Generate Link
DigiPin CreatLink
DIGIPIN – Digital Address of your location
Digital Postal Index Number
Indian post office services DGPIN new address tracking system
डिजिपिन : पत्ता शोधणारी नवी प्रणाली
पत्ता लिहिताना आपण पिनकोड लिहितो तो ६ नंबरचा आकडा असतो, भारतातील कुठल्याही क्षेत्राला डाक विभागाद्वारे दिलेली ती ओळख असते. तरीसुद्धा एखादे कुरिअर अचूक पत्त्यावर पोहचत नाही, त्यासाठी भारतीय डाक विभागाने आता पत्ता शोधणारी नवीन प्रणाली निर्माण केली आहे. त्याला डिजिपिन (Digipin) नाव देण्यात आले आहे. यामुळे देशातील कुठलाही भाग किंवा कोपऱ्याचा पत्ता डिजिटल पणे मिळू शकतो.
डाक विभागाने IIT हैदराबाद आणि ISRO सोबत मिळून ही प्रणाली विकसित केली आहे. या सिस्टम अंतर्गत देशाला ४ मीटर बाय ४ मीटर आकाराच्या छोट्या छोट्या भागात विभाजन केले आहे. प्रत्येक भागाला एक यूनिक आयडी देण्यात आला आहे. हा आयडी १० आकडी अक्षरांचा एक कोड असेल, त्याला डिजिपिन म्हटलं जातं. हा कोड कुठल्याही जागेचा Latitude आणि Longitude वर आधारित असेल. यामुळे एखाद्या गल्लीबोळातील कुठलेही ठिकाणी सहज अचूक मिळू शकते. आता कुठल्याही कुरिअरवाल्याला किंवा व्यक्तीला एखादे पार्सल तुमच्या पर्यंत पोहचवण्यात अडथळा किंवा समस्या येणार नाही.
खूप मोठा परिसर दर्शवणाऱ्या ६ अंकी पिनकोड ऐवजी अचूक स्थान दर्शवणाऱ्या १० आकड्यांचा किंवा अक्षरांचा डिजिपीन कोड लवकरच वापरात येईल.
तुम्हाला तुमचा डिजिपिन हवा असेल, तर Digipin च्या अधिकृत वेबसाइटवर गेल्यानंतर, तुम्ही तुमचा पूर्ण पत्ता किंवा जीपीएस लोकेशन तिथे नोंदवू शकता. त्यानंतर सिस्टम तुम्हाला तुमच्या लोकेशन नुसार १० अक्षरी युनिक कोड देईल. हा तुमच्या पत्त्याचा डिजिपिन असेल. हा कोड अचूक लोकेशन दर्शवितो.
भविष्यात पोस्टल सेवा, ऑनलाइन डिलिव्हरी आणि सरकारी यंत्रणा देखील या डिजिपिनचा वापर करतील.
भारतीय डाक / टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
आपत्कालीन मदत असो, की ऑनलाइन डिलिव्हरी या सेवा अचूक आणि वेगाने मिळाव्या यासाठी टपाल विभागाने आता दहा अंकी डिजिपीन प्रणाली सुरू केली आहे. यामुळे एखाद्या ठिकाणाची अचूक ओळख करता येणार आहे. देशातील प्रत्येक ठिकाणाचा या १० अंकी पिनमुळे आता अचूक पत्ता मिळेल. यूझरला अधिकृत संकेतस्थळावरून हा क्रमांक मिळवता येणार आहे.
या प्रणालीमुळे टपाल विभाग गाव, जंगल किंवा समुद्रकिनाऱ्यापर्यंतही अचूक ठिकाणी पोहोचू शकतो. ही संकल्पना संपूर्ण देशाच्या क्षेत्राला ४ बाय ४ मीटर आकारात विभागते.
नेमके काय होणार फायदे?
१ रुग्णवाहिका, अग्निशमन दलास पत्ता अचूक शोधता येईल. लॉजिस्टिक्स, कुरिअर डिलिव्हरी, कॅब बुकसाठी वापर. ग्रामीण आणि दुर्गम भागातील वितरण सेवा आणखी सुलभहोईल.
२ डिजिपीनमुळे चुका कमी होऊन कार्यक्षमता आणि सेवांचा वेग वाढण्यात मदत होईल. पोस्टल डिलिव्हरी अधिक अचूक, जलद आणि कार्यक्षम करण्यात फायदा होईल.
पिन कोड, डिजिपीनमधील फरक काय?
सहा अंकी पारंपरिक पिन कोड एका मोठ्या भौगोलिक क्षेत्रासाठी वापरला जातो. डिजिपीन मात्र, विशिष्ट घर किंवा स्थळाच्या नेमक्या ठिकाणासाठी वापरला जाणार आहे.
Create a 10-digit DigiPin
How to create a 10-digit DigiPin
Know Your DIGIPIN
Find My DIGIPIN By India Post
कसा आणि कुठे जनरेट करावा डिजिपीन ?
नकाशावरील आपले अचूक स्थान सांगणारा डिजिटल पिन स्वतः जनरेट करता येईल.
https://dac.indiapost.gov.in/mydigipin/home
या संकेतस्थळाला भेट द्या.
येथे तुमच्या डिव्हाइसचे लोकेशन अॅक्सेस देऊन १० अंकी डिजिपीन तयार होईल.