Class 10th History Internal Assessment
Class 10th History Internal Assessment
History Political Science Internal Assessment Evaluation with Answer pdf
Class 10th History Chapter Notes Question Answer
Iytta Dahavi Itihas Rajyashastr Antargat Mulyamapan Pratm Satra Dvitiy Satra Bahuparyayi Chachni
इतिहास राज्यशास्त्र अंतर्गत मूल्यमापन (सुधारित)
इयत्ता : दहावी विषय : इतिहास राज्यशास्त्र शाळेचे नाव : विद्यार्थ्याचे नाव : परीक्षा क्र. :
प्रथम सत्र स्वाध्याय आणि गृहपाठ गुण-०५ + द्वितीय सत्र स्वाध्याय आणि गृहपाठ गुण-०५ + बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (MCQs) गुण-१०
प्रथम सत्र स्वाध्याय आणि गृहपाठ गुण-०५
१. मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला ‘ज्ञानाचे पुरातत्त्व’ म्हटले आहे.
उत्तर :
(i) मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरविली
(ii) मायकेल फुकोच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे, म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो.
(iii) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला ‘ज्ञानाचे पुरातत्त्व” असे म्हटले आहे.
२. ‘बखर’ हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे.
उत्तर :
(i) ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्याद साधनांबरोबर ऐतिहासिक साहित्यात बखरींचाही समावेश होतो.
(ii) बखरीत शूर वीरांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धाची वर्णने असतात.
(iii) थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात.
(iv) तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात; म्हणून ‘बखर’ हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
३. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते.
उत्तर :
उत्तर :
(i) पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असतो.
(ii) त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते.
(iii) हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे गरजेचे असते.
(iv) काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी ‘युनेस्को’ या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते.
इयत्ता १० वि इतिहास व राज्य शास्त्र प्रश्न पत्रिका उत्तरासह उपलब्ध फक्त या ओळीला स्पर्श करा
४. प्रसारमाध्यमांद्वारे मिळणा-या माहितीचे चिकित्सक आकलन करुन घ्यावे लागते.
(i) प्रसारमाध्यमांद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते.
(ii) ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते.
(ii) प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हे ही त्या माहितीत दडलेले असतात.
(iv) जर्मनीतील ‘स्टर्न’ साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिश्या प्रसिद्ध केल्या. पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले. म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.
५. मतदाराचे वय २१ वर्षावरुन १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले ?
(i) युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले.
(ii) आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला.
(iii) यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वांत मोठी लोकशाही बनली.
iv) या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. युवा वर्गाच्या राजकीय जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली.
द्वितीय सत्र स्वाध्याय आणि गृहपाठ गुण-०५
१. खेळांतून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात ?
२. आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.
i) जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रांत झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे.
ii) विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यांमुळे जग अधिक जवळ आले आहे.
iii) अभ्यास, व्यवसाय, चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या विविध कारणांनी लोक परदेशात जातात.
iv) खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात. त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे.
३. पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?
उत्तर : आधुनिक काळात पर्यटन ही रोजगाराभिमुख आणि देशाच्या विकासाला मदत करणारी बाब ठरली आहे. म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे –
i) पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षिन वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे.
ii) पर्यटकांना उत्तम दर्जाची निवासव्यवस्था, प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत.
iii) ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजेत.
iv) पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहितीपुस्तिका, नकाशे, मार्गदर्शिका, गाईड, दुभाषे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. दिव्यांगांच्या पर्यटनातील गरजांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे
४. प्रत्येक भाषिक समाजात कोशवाङ् मय निर्माण होण्याची गरज असते.
५. भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरुप स्पष्ट करा.
बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (MCQs) गुण-१०
१. हिस्टरी हा शब्द भाषेतील आहे.
१. ग्रीक
२. जर्मन
३. रशियन
४. स्पॅनिश
२. भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक हे होत.
१. सर विल्यम जोन्स
२. सर अलेक्झांडर कनिंग हॅम
३. सर जॉन मार्शल
४. जेम्स मिल
३. ‘द राईज ऑफ द मराठा पॉवर’ या ग्रंथात यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली.
१. वि. का. राजवाडे
२. लोकमान्य टिळक
३. महात्मा फुले
४. न्या. महादेव गोविंद रानडे
४. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार येथे आहे.
१. दिल्ली
२. कोलकाता
३. मुंबई
४. चेन्नई
५. इंडियन म्युझियची स्थापना सन मध्ये झाली.
१. १९१४
२. १८१४
३. १९४७
४. १८५०
६. भारतात आगमन झाल्यावर मुद्रणकला, वर्तमानपत्रे सुरू झाली.
१. फ्रेंचाचे
२. पोर्तुगीजांचे
३. इंग्रजांचे
४. डचांचे
७. सातारा जिल्हयातील समाविष्ट आहे या पश्चिम घाटारांगांमधील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत
१. आंबोली घाट
२. कास पठार
३. मेळघाट
४. मसाई पठार
८. जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवाशी म्हणून प्रसिध्द आहे
१. मार्को पोलो
२. कोलंबस
३. वास्को-द-गामा
४. बेंजामिन ट्युडेला
९. पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे ?
१. माहितीचा अधिकार कायदा
२. हुंडाप्रतिबंधक कायदा
३. अन्नसुरक्षा कायदा
४. यापैकी कोणतेही नाही.
१०. चित्राशी संबंध योग्य विधान ओळखा :
१. हे पहिले शिक्षण आयुक्त होत.
२. स्वतंत्र भारतातील दुसरे निवडणूक आयुक्त होत
३. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त
४. हे भारतातील पहिले मतदार होत.