HISTORY & POLITICAL SCIENCE MARCH 2023 ANSWER SHEET

SOCIAL SCIENCES HISTORY & POLITICAL SCIENCE-PAPER-I Maharashtra State Board Examination Feb/Mar 2023 Solved Question Paper

His Ans
आदर्श उत्तरे –
प्रश्न १. (अ)

March 2023
SOCIAL SCIENCES (73)  HISTORY & POLITICAL SCIENCE-PAPER-I(M)
वेळ – २ तास
सामाजिक शास्त्रे
(७३) इतिहास व राज्यशास्त्र – पेपर- १ (म)
(REVISED COURSE)
Total Marks : 40
एकूण गुण ४०
सूचना :-
(1) सर्व कृती / प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
(2) उजवीकडील अंक प्रश्नांचे/कृतींचे पूर्ण गुण दर्शवितात.
(3) प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्न / कृती इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 प्रश्न / कृती
राज्यशास्त्र या विषयांवरील आहे.
(4) प्रश्न क्रमांक 1 (अ) आणि 6 मध्ये संपूर्ण विधान लिहिणे आवश्यक
आहे.
(5) प्रश्न क्रमांक 2 (अ) आणि 8 (ब) मधील संकल्पनाचित्रे/कृती त्याच नमुना आराखड्यात पेनाने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे.
(6) प्रश्न 1ला (अ), (ब) व प्रश्न 6वा या प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळा लिहिलेले असेल तर प्रथम लिहिलेले उत्तर हे गुणांसाठी गृहीत धरले जाईल.
एस.एस.सी. मार्च परीक्षा २०२३
वेळ २.०० तास
इयत्ता १० वी, विषय- सामाजिक शास्त्रे (७३) इतिहास व राज्यशास्त्र
गुण – ४०
प्रश्न 1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा : (बरोबर उत्तरास १ गुण )
(1) लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ………………… या चित्राचा समावेश लुव्र
संग्रहालयात आहे.
(अ) नेपोलियन
(ब) मोनालिसा
(क) हॅन्स स्लोअन
(ड) दुसरा जॉर्ज
योग्य उत्तर आहे – ब) मोनालिसा
(1) लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसाया चित्राचा समावेश लुव्र
(2) थॉमस कुकने ……………… विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरु केला.
(अ) हस्तकौशल्याच्या वस्तू
(ब) खेळणी
(क) खाद्यवस्तू
(ड) पर्यटन तिकिटे
योग्य उत्तर आहे – (ड) पर्यटन तिकिटे
थॉमस कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरु केला.
(3) एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ……………….. यांचे नाव अग्रणी आहे.
 
(अ) ताराबाई शिंदे
(ब) पंडिता रमाबाई
(क) मीरा कोसंबी
(ड) शर्मिला रेगे
योग्य उत्तर आहे – अ) ताराबाई शिंदे
एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे.
प्रश्न 1. (ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा : गुण 3
( बरोबर उत्तरास १ गुण)
(1) शहरेग्रंथालय
(i) कोलकातानॅशनल लायब्ररी
(ii) दिल्लीनेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी
(iii) हैद्राबादस्टेट सेंट्रल लायब्ररी
(iv) पुणेलायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी
योग्य उत्तर आहे -चुकीची जोडी (iv) पुणे – लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी
विचारवंतदेश
(i) कार्ल मार्क्सइंग्लंड
(ii) मायकेल फुको फ्रान्सफ्रांस
(iii) लिओपॉल्ड व्हॉन रांकेजर्मनी
(iv) हिरोडोटसग्रीस
योग्य उत्तर आहे -चुकीची जोडी – (i) कार्ल मार्क्स – इंग्लंड
नियतकालिकेकालावधी
(i) साप्ताहिकसात दिवस
(ii) पाक्षिकपंधरा दिवस
(iii) मासिकएक महिना
(iv) त्रैमासिकदोन महिने
योग्य उत्तर आहे – चुकीची जोडी (iv) त्रैमासिक-दोन महिने
प्रश्न 2. (अ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही दोन ) :
(प्रत्येक संकल्पना चित्रास २ गुण यामध्ये चौकटीतील प्रत्येक बरोबर उत्तरास १/२ गुण द्यावा )
(१) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


युरोपातील महत्त्वाचे विचारवंत


योग्य उत्तर आहे –
युरोपातील महत्त्वाचे विचारवंत –
मायकेल फुको
लिओपोल्ड
कार्ल मार्क्स
रेने देकार्त
व्हॉल्टेअर
जॉर्ज विल्हेम
फ्रेडरिक हेगेल
(२) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


भारतातील गुहाचित्रे असलेली राज्ये


योग्य उत्तर आहे –
युरोपातील महत्त्वाचे विचारवंत –
आंध्र प्रदेश
उत्तर प्रदेश
मध्यप्रदेश
बिहार
उत्तराखंड
कर्नाटक
तेलंगणा
(३) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


स्वातंत्र्यपूर्व काळातील वृतपत्रे


योग्य उत्तर आहे –
युरोपातील महत्त्वाचे विचारवंत –
मराठा
ज्ञानोदय
दर्पण
प्रभाकर
बेंगॉल गॅझेट
दीनबंधु
प्रश्न 2. (ब) थोडक्यात टिपा लिहा. (कोणत्याही दोन ) :
(बरोबर टीपेला २ गुण उत्तरातील योग्य मुदयास प्रत्येकी २ गुण )
(१) द्वंद्ववाद
योग्य उत्तर आहे – (१) द्वंद्ववाद
उत्तर –
१. जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांत करावी लागते.
२. वर्गवारी केल्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही.
३. जसे – खरे-खोटे, चांगले-वाईट यालाच द्वंद्ववाद ( डायलेक्टिक्स) म्हटले जाते.
४. या पद्धतीत प्रथम एक सिद्धान्त मांडला जातो. त्यानंतर त्या सिद्धान्ताला छेद देणारा प्रतिसिद्धान्त मांडला जातो.
५. या दोन्ही सिद्धान्ताच्या तर्काधिष्ठित ऊहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धान्ताची समन्वयात्मक मांडणी केली जाते
(२) जनासाठी इतिहास
योग्य उत्तर आहे – (२) जनासाठी इतिहास
उत्तर
१. उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी ‘जनांसाठी इतिहास’ (पब्लिक हिस्टरी) असा पर्यायी शब्दप्रयोग केला जातो.
२. भूतकाळातील घटनांसंबंधाचे जे ज्ञान इतिहासद्वारे प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्वां कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो.
३. गतकाळातील घटनांचे विश्लेषणावरुन वर्तमानातील सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेता येतात. यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते.
४. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात तज्ज्ञ व्यक्ती, सर्वसामान्य लोक, पर्यटक यांचा सहभाग महत्त्वाचा असतो.
10th_12th Exam New Education Policy महाराष्ट्र राज्या मध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत नवीन शैक्षणिक धोरणानुसार घेण्यात येणार आहेत
(३) मराठी रंगभूमी
(३) मराठी रंगभूमी
उत्तर –
१. ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी होय.
२. नाटयसंहिता,नाटयदिग्दर्शक, कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य, प्रकाशयोजना, प्रेक्षक व समीक्षक असे घटक रंगभूमीशी संबंधित असतात.
३. विष्णूदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. सीतास्वयंवर हे त्यांनी रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक होय.
४. सुरुवातीस नाटकांच्या संहिता लिखित स्वरुपात नसत. त्यातील गीते लिहिलेली असली तरी गदय संवाद उत्स्फुर्त स्वरुपाचे असत.
५. मुद्रित स्वरुपात संहिता असलेले पहिले नाटक वि. ज. कीर्तने यानी १८६१ साली ‘थोरले माधवराव पेशवे’ हे लिहिले.
६. मराठी रंगभूमीत आचार्य अत्रे, वसंत कानेटकर, विजय तेंडूलकर, विश्राम बेडेकर, वि. वा. शिरवाडकर यांची नव्या धर्तीची नाटके प्रसिद्ध आहेत.
७. मराठी रंगभूमीत नाटय कलावंत म्हणून गणपतराव जोशी, बालगंधर्व, केशवराव भोसले, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस यांच्याआविष्कारामुळे मराठी रंगभूमी समृद्ध झाली.
प्रश्न 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन ) : एकूण गुण ०४
प्रत्येक बरोबर विधानाच्या सकारणास २ गुण कोणतेही दोन मुद्दे, प्रत्येक योग्य मुद्दयास १ गुण
(1) सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
सकारण-
१. दूरदर्शन हे दृक-श्राव्य माध्यम असल्याने ऐकणे व पहाणे दोन्ही क्रिया घडतात त्यामुळे सर्व प्रसारमाध्यमात ती लोकप्रिय आहेत.
२. जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनवर घरबसल्या पाहायला मिळतात.
३. सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ, आरोग्य याविषयी माहिती मिळते.
४. दूरदर्शनवर ऐतिहासिक स्थळांचे माहितीपट पाहायला मिळतात.
५. अनेक मालिकांमुळे सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
(२) महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
सकारण-
१. संत एकनाथांनी भारुडामधून मानवताधर्माचा प्रचार व प्रसार केला.
२. संत एकनाथांनी तत्कालीन समाजाच्या व्यथा, वेदना, आचार-विचार, राग, लोभ समाजासमोर मांडले.
३. भारुडातून लोकशिक्षण देण्याचे कार्य संत एकनाथांनी केले .
४. संत एकनाथांच्या भारुडात विविधता, नाटयात्मता, विनोद आणि गेयता आहे. म्हणून संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
(३) आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.
सकारण-
1. भारतातील वैद्यकीय सेवा व सुविधा पाश्चात्त्यांच्या मते स्वस्त व दर्जेदार आहेत.
2. या कारणास्तव परदेशी लोक भारतात येऊ लागले आहेत.
3. भारतात मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्याचा लाभ घेण्यासाठी कितीतरी लोक भारतात येतात.
4. योगशिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.
(४) मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणतात.
सकारण-
१. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते.
२. मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले.
३. १९२८ आणि १९३२ मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती तेंव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून
खेळले होते
४. हॉकीतील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना हॉकीचे जादूगार म्हणतात.
प्रश्न ४. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा : एकूण ०४
          खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासून आहे. खेळांना नियमित व सुसंघटीत स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरु केले.प्राचीन ऑलिंपिक ही खेळाची स्पर्धा ऑलिंपिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते.
(१) प्राचीन ऑलिंपिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जात असे? (योग्य उत्तरास १ गुण)
उत्तर- प्राचीन ऑलिंपिक खेळाची स्पर्धा ऑलिंपिया या ग्रीक शहरात घेतली जात असे.
(२) खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासूनचे आहे? (योग्य उत्तरास १ गुण )
उत्तर – खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे.
(३) ऑलिंपिक स्पर्धाविषयी आपले मत मांडा. (योग्य उत्तरास २ गुण )
उत्तर –
१. प्राचीन ऑलिंपिक ही खेळाची स्पर्धा ऑलिंपिया या ग्रीक शहरात घेतली जात असे.
२. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते.
३. ऑलिंपिक स्पर्धा दर चार वर्षांनी घेतल्या जातात.
४. दर ऑलिंपिकला नवीन देशाला यजमान पद दिलेले असते.
५. ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण, रजत आणि कास्य अशी तीन पडले असतात.
६. ऑलिंपिक स्पर्धेत अनेक खेळांचा समावेश असतो.

1 thought on “HISTORY & POLITICAL SCIENCE MARCH 2023 ANSWER SHEET”

Leave a Comment

error: Content is protected !!