इ १० व १२ वी गुणपत्रक व प्रमाणपत्रावर नाव / आईचे नांव / वडिलांचे नाव विद्यार्थ्यांची जन्मतारीख /जन्मस्थळ दुरुस्तीकरीता आवश्यक कार्यपध्दती व कागदपत्रे Changes Or Correction In School Record Of Students

Changes Or Correction In School Record Of Students

Changes Or Correction In School Record Of Students

Students Name Surname Fathers Mothers Guardians Name Caste Sub caste Date Of Birth Place Of Birth Correction Application pdf Required Documents

Student’s name/surname/father’s/mother’s guardian’s name, caste, sub-caste, date of birth, place of birth, correction application and necessary required documents

APPLICATION FOR CHANGE IN NAME / SUR-NAME
Regarding the documents to be submitted for the approval of corrections in the caste, date of birth, name, place of birth, etc. of the students.

Regarding changes or corrections in date of birth, name, surname, caste, etc. recorded in the General Register.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2026:BHC-AUG:33803-DB

1

CNR No: HCBM030259472026

32.doc

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY BENCH AT AURANGABAD

32 WRIT PETITION NO. 8739 OF 2026

SAYYAD SUHANA MUBIN

       VERSUS

THE STATE OF MAHARASHTRA THROUGH ITS SECRETARY AND OTHERS

Advocate for the Petitioner: Mr. Pathade Vishweshwar Haribhau

AGP for Respondent/State: Mr. N.D. Batule

CORAM: NITIN B. SURYAWANSHI AND ABASAHEB D. SHINDE, JJ.

DATE :
04.08.2026

PER COURT:

This petition challenges the order dated 04.05.2026 passed by respondent No.2/Education Officer, thereby rejecting the request of the petitioner to carry out correction in her birth date on the ground that the petitioner has left respondent No.3/School.

2. This Court has consistently taken a view that merely because the student is no more taking education in the school cannot be a ground to deny a request like one made by the petitioner.

3. The case of the petitioner is squarely covered by the Full Bench decision in Janabal Himmatrao Thakur vs The State of Maharashtra and Others, AIR OnLine 2019 Bombay 1055. The relevant direction reads thus:

“(c) Thus, in light of the above, an application for change in the name, surname or caste, either due to reasons/cause unnoticed before or even occurring subsequently, being errors which fall within the category of ‘obvious mistakes, can be made, even after the student has left school in light of the language of Clause 26.3 in the manner as indicated by Appendix Six in the forms as prescribed in the S.S. Code.”

4. It is necessary to mention here that Co-ordinate Bench of this Court in order dated 26.11.2025 passed in Writ Petition No. 14175 of 2025 has made following pertinent observations:

“5. Time and again it has come to our notice that in spite of there being a judgment of the Full Bench of this Court in Janabai Thakur (supra) and also several orders thereafter passed by this Court, the officers are repeatedly passing the orders contrary to the said judgment which leads to several litigations being filed in the High Court. We, therefore, feel it appropriate to direct the Principal Secretary of School Education and Sports Department, Mantralaya, Mumbai, to issue appropriate orders there by circulating the above mentioned judgment to all its officers in the department with a clear direction to follow the order in its true letter and spirit. Henceforth, any disobedience of the order is observed or brought to our notice will attract the provisions of Contempt of Courts Act and the Erring Officers will be held in contempt under the said Act.”

5. In the light of above observations, in fact contempt action needs to be initiated against respondent No. 2. However, by way of indulgence we give one more chance to respondent No. 2 to mend his ways and correct his mistake.

6.

In the result, writ petition is allowed.

7. Impugned communication/order dated 04.05.2026 issued by respondent No. 2 is quashed and set aside.

8. The matter is remanded back to respondent No. 2, who shall direct to carry out correction sought by the petitioner by keeping in mind decision in the case of Janabai Thakur (supra) and directions given by this Court in Writ Petition No. 14175 of 2025, within a period of eight (08) weeks from the date of receipt of copy of this order.

(ABASAHEB D. SHINDE, J.)

(NITIN B. SURYAWANSHI, J.)

iyatta 10 vi v iyatta 12 vi gunpatrak v pramanpatravar naav / aaiche nanv / vadilanche naav vidyarthyanchi janmtarikh /janmasthal durustikarita aavashyak karyapaddhati v kagadapatre

Procedure and documents required for correction of name/mother’s name/father’s name and date of birth/place of birth of students on class 10th and class 12th marksheet and certificate

इ. १० वी गुणपत्रक व प्रमाणपत्रावर नाव / आईचे नांव / वडिलांचे नाव विद्यार्थ्यांची जन्मतारीख /जन्मस्थळ दुरुस्तीकरीता आवश्यक कार्यपध्दती व कागदपत्रे

विद्यार्थी / विद्यार्थ्यांनी च्या नावात आईचे नांव वडिलांचे नाव विद्यार्थ्यांची जन्मतारीख /जन्मस्थळ दुरूस्तीसाठीच्या प्रस्तावासोबत खालील प्रमाणे कागदपत्र प्रमाणित करून सादर करणे अनिवार्य आहे. तसेच मुळ जनरल रजिष्टर पडताळणीकरीता मंडळ कार्यालयात आणणे बंधनकारक आहे.

इ. १० वी करीता प्रस्तावा सोबतची कागदपत्रे

१. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचे दुरूस्ती बाबतचे मुळ पत्र. (शाळेच्या लेटरहेड वर)

२. फॉर्म नं. २ वर शिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीची मुळ प्रत व मान्यतेचे पत्र

३. शाळेचे मुळ जनरल रजिस्टर समक्ष पडताळणीसाठी विभागीय मंडळ कार्यालयात सोबत आणणे.

४. जनरल रजिस्टरची प्रमाणीत छायाप्रत.

५. इ. १०वी मुळ गुणपत्रक व मुळ प्रमाणपत्र.

६. इ. १० वी शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रमाणीत छायाप्रत,

७ इ. १० वी गुणपत्रक व प्रमाणपत्राची प्रमाणीत छायाप्रत.

८. जनरल रजिस्टर मराठी मध्ये असल्यास विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची छायाप्रत

९. विद्यार्थ्यांच्या जन्म तारखेत दुरूस्ती असल्या किंवा जनरल रजिस्टर मध्ये खाडाखोड असल्यास जन्म दाखला, इ.४थी इ.७वी

इ.१० वी चा शाळा सोडल्याची छायाकिंत प्रत.

१० आईच्या नावात दुरूस्ती असल्यास आईचे आधार कार्डची छायाप्रत

जर मुळ जनरल रजिष्टर वर नाव/नावाचे स्पेलिंग/जन्मतारीख इ. मध्ये बदल असल्यास बदल करण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाचे मान्यतेचे पत्र तसेच त्यानुसार मुळ जनरल रजिष्टर दुरुस्त करुन दुरुस्तीच्या समोर विद्यमान मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व शिक्का घेणे आवश्यक आहे. सदर दुरुस्त जनरल रजिष्टरची छायांकित प्रत प्रस्तावा सोबत जोडणे अनिवार्य आहे.

सूचना: विद्यार्थी / पालक यांना मंडळ कार्यालयात प्रस्ताव न देता परस्पर मंडळ कार्यालयात पाठवू नये. दुरुस्ती बाबतचा प्रस्ताव तयार करुन मुळ जनरल रजिष्टर सह शाळेचा प्रतिनिधीस मंडळ कार्यालयात प्रस्ताव जमा करण्यास पाठविण्यात यावे.

इ. १२ वी गुणपत्रक व प्रमाणपत्रावर नाव / आईचे नांव / वडिलांचे नाव / विद्यार्थ्यांची जन्मतारीख /जन्मस्थळ दुरुस्तीकरीता आवश्यक कार्यपध्दती व कागदपत्रे

विद्यार्थी / विद्यार्थ्यांनी च्या नावात आईचे नांव वडिलांचे नाव विद्यार्थ्यांची जन्मतारीख /जन्मस्थळ दुरूस्तीसाठीच्या प्रस्तावासोबत खालील प्रमाणे कागदपत्र प्रमाणित करून सादर करणे अनिवार्य आहे. तसेच मुळ जनरल रजिष्टर पडताळणीकरीता मंडळ कार्यालयात आणणे बंधनकारक आहे.

१. इ. १२ वी करीता प्रस्तावा सोबतची कागदपत्रे

२. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापकांचे दुरूस्ती बाबतचे मुळ पत्र. (लेटरहेड वर)

३. फॉर्म नं. १ वर शिक्षण उपसंचालकांचे स्वाक्षरीची मुळ प्रत व मान्यतेचे पत्र

४. कनिष्ठ महाविद्यालयाचे मुळ जनरल रजिस्टर समक्ष पडताळणीसाठी विभागीय मंडळ कार्यालयात सोवत आणणे

४ जनरल रजिस्टरची प्रमाणीत छायाप्रत.

५ इ. १२वी मूळ गुणपत्रक व मूळ प्रमाणपत्र.

६. इ. १२वी शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रमाणीत छायाप्रत

७ इ. १२वी गुणपत्रक व प्रमाणपत्राची प्रमाणीत छायाप्रत.

जनरल रजिस्टर मराठी मध्ये असल्यास विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची छायाप्रत

आईच्या नावात दुरूस्ती असल्यास आईचे आधार कार्डची छायाप्रत

१० विद्यार्थ्यांच्या जन्म तारखेत दुरूस्ती असल्या किंवा जनरल रजिस्टर मध्ये खाडाखोड असल्यास जन्म दाखला, इ.४थी, इ.७वी, इ.१०वी चा शाळा सोडल्याची छायाकिंत प्रत.

जर मुळ जनरल रजिष्टर वर नाव/नावाचे स्पेलिंग/जन्मतारीख है. मध्ये बदल असल्यास बदल करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे मान्यतेचे पत्र तसेच त्यानुसार मुळ जनरल रजिष्टर दुरुस्त करुन दुरुस्तीच्या समोर विद्यमान मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व शिक्का घेणे आवश्यक आहे. सदर दुरुस्त जनरल रजिष्टरची छायांकित प्रत प्रस्तावा सोबत जोडणे अनिवार्य आहे.

सूचना: विद्यार्थी / पालक यांना मंडळ कार्यालयात प्रस्ताव न देता परस्पर मंडळ कार्यालयात पाठवू नये. दुरुस्ती बाबतचा प्रस्ताव तयार करुन मुळ जनरल रजिष्टर सह कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधीस मंडळ कार्यालयात प्रस्ताव जमा करण्यास पाठविण्यात यावे.

ALSO READ 👇

विदयार्थ्याची जात, जन्मतारिख, नाव, जन्मठिकाण इत्यादी यांच्यामध्ये दुरुस्ती मान्यता आदेशकामी सादर करावयाच्या कागदपत्राबाबत..

सर्वसाधारण नोंदवहीतील (जनरल रजिस्टर) नोंदवलेली जन्मदिनांक, नाव आडनाव, जात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत

विदयार्थ्यांचा नाव/आडनाव/वडिलांचे/आईचे नाव दुरुस्ती बाबत.

विदयार्थ्यांचा जातीत दुरुस्ती बाबत.

३. विदयार्थ्यांची जन्मतारिख/जन्मठिकाण दुरुस्ती बाबत.

विदयार्थ्यांच्या पालकांचे नाव व आडनाव बदल बाबत (दत्तक विधानानुसार अथवा आईचे पुर्नविवाह नुसार)

विदयार्थ्यांच्या पालकांचे नावा ऐवजी आईचे नाव लावणे बाबत

जन्मदिनाक बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.

नाव व आडनावातील बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.

जातीत व पोटजातीत बदल बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.

विदयार्थ्यांचा नाव/आडनाव/वडिलांचे/आईचे नाव / जातीत / पोटजातीत / जन्मतारिख / जन्मठिकाण / पालकांचे नाव व आडनाव / पालकांचे नावा ऐवजी आईचे नाव / जन्मदिनाक बदल / दुरुस्ती बाबत.

माध्यमिक शाळा संहिता नियम २६.४ नुसार सर्वसाधारण नोंदवहीतील (जनरल रजिस्टर) नोंदवलेली जन्मदिनांक, नांव आडनाव, जात-पोटजात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याकडुन किंवा त्याच्या वतीने (पालकांकडून) आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे. त्याच्या किंवा त्याच्या वतीने केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

वाचाः-१. महाराष्ट्र खाजगी शाळा संहिता नियम १९८६ चे नियम २६.४ अन्वये
२. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासननिर्णय क्र. एसएसएन/१००९ (४०६/०९)/माशि-२ दि.२४/०२/२०१०
३. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ कलम ३(१) अन्वये लोकसेवा घोषित

विषयांकीत प्रकरणी उक्त संदर्भिय पत्रानुसार या परिपत्रकान्वये कळविणेत येते की, शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद अहमदनगर विभागाच्या अधिनस्त सर्व अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा मधील विदयार्थ्यांचा जात, जन्मतारिख, नाव, जन्मठिकाण इ. यांच्यामध्ये दुरुस्ती मान्यता आदेश मिळणेकामी प्रस्ताव या कार्यालयास सादर केले जातात. त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत याबाबत परिपत्रक निर्गमित करणे संदर्भ क्र. ०३ नुसार गरजेचे आहेत. प्रस्तावसोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.

१. विदयार्थ्यांचा नाव/आडनाव/वडिलांचे/आईचे नाव दुरुस्ती बाबत.
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०२ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) जे नाव दुरुस्त करुन पाहिजेत त्या नावाचे विदयार्थ्यांचा आधारकार्ड, आईचे, व पालकांचे आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, विदयार्थ्यांचा जन्मदाखला अथवा महाराष्ट्र शासन राजपत्र

२. विदयार्थ्यांचा जातीत दुरुस्ती बाबत.
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०३ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) उपविभागिय अधिकारी यांचेकडिल विदयार्थ्यांचा जातीचा दाखला (६) उपविभागिय अधिकारी यांचेकडिल पालकांचा जातीचा दाखला

३. विदयार्थ्यांची जन्मतारिख/जन्मठिकाण दुरुस्ती बाबत.
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०१ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) विदयार्थ्यांचा नावासहीत जन्मदाखला
(६) विदयार्थ्यांचा इ.१ ली, ४ थी व ७ वी चे निर्गम उतारा

४. विदयार्थ्यांच्या पालकांचे नाव व आडनाव बदल बाबत (दत्तक विधानानुसार अथवा आईचे पुर्नविवाह नुसार)
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०२ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) विदयार्थ्यांचा नाव बदल बाबतचे महाराष्ट्र शासन राजपत्र (६) दुय्यम निंबधक कार्यालयाकडील दत्तकविधानपत्र (७) आईचे मा. न्यायालयाकडिल घटस्फोट निकाल (८) आईचे पुर्नविवाह नोंदणी प्रमाणपत्र (९) विदयार्थ्यांच्या नावासहीत रेशनकार्ड

५. विदयार्थ्यांच्या पालकांचे नावा ऐवजी आईचे नाव लावणे बाबत
(१) शाळेचे पत्र (कव्हरिंग लेटर) (२) नमुना क्र.०२ व त्यावरिल मुख्याध्यापकांची शिफारस (३) विदयार्थी शाळा शिकत असलेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (४) तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र (५) विदयार्थ्यांचा नाव बदल बाबतचे महाराष्ट्र शासन राजपत्र (६) आईचे मा. न्यायालयाकडिल घटस्फोट निकाल व निकालामध्ये सदर विदयार्थ्यांची कस्टडीयन आईकडे असणे आवश्यक आहे (७) विदयार्थ्यांच्या नावासहीत रेशनकार्ड
उपरोक्त प्रस्तावामधील सर्व कागदपत्रे शाळेचे मुख्याध्यापक यांनी पडताळणी करुन साक्षांकीत करुन जोडणे आवश्यक आहे तसेच. प्रस्तावाची एक प्रत शाळेच्या दप्तरी कायम ठेवणेत यावी. जे विदयार्थी शाळेमध्ये शिकत नसेल त्या विदयार्थ्यांचा नावात/जन्मतारिख/जात दुरुस्ती करता येत नाही याची नोंद घ्यावी. वरिल प्रमाणे परिपुर्ण प्रस्ताव या कार्यालयास सादर करुन सदरचा मंजुरी आदेश सात दिवसात या कार्यालयातुन घेवुन जाणे संदर्भ क्र.०३ नुसार आवश्यक आहे. तसेच इ.११ वी १२ च्या विदयार्थ्यांचा नावात/जन्मतारिख/जात दुरुस्ती बाबतचा प्रस्ताव मा शिक्षण उपसंचालक पुणे यांचेकडे सादर करावे. या कार्यालयास सादर करु नये. व या कार्यालयास दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव परस्पर पालकांना देवुन कोणीही पाठवु नये. याबाबत दक्षता घ्यावी. सदरचे परिपत्रक सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना लागु राहील.

जन्मदिनाक बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.

१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना २ विहित नमुन्यातील अर्ज (मुख्याध्यापक यांनी स्पष्ट शिफारस करावी.)
२. जन्म नोंदवहीतील प्रमाणित उतारा
३. लस टोचणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत
४. खिश्चनांच्या बाबतीत बाप्तिस्मा प्रमाणपत्राची प्रत
५. विद्यार्थ्याच्या ख-या जन्मतारखेबाबत वृतिधारी दंडाधिका-यासमोर विद्यार्थ्याच्या आईवडिलानी किवा पालकाने केलेले शपथपत्र .
६. नोंदवहीतील उतारा (जनरलरजिस्टर) प्रमाणित प्रत .

नाव व आडनावातील बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.
१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना २ विहित नमुन्यातील अर्ज यांनी स्पष्ट शिफारस करावी.)
(मुख्याध्यापक)
२. दत्तक विधानामुळे बदल असलेस त्याबाबत दत्तक पत्राची प्रमाणित केलेली प्रत
३. विवाहामुळे बदल झाला असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
४. आई वडीलानी (पालक) यानी वृत्तिधारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञाप्रत
५. महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूची
६. नोंदवहीतील उतारा (जनरल रजिस्टर उतारा) प्रमाणित प्रत.

जातीत व पोटजातीत बदल बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.
१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना ३ विहित नमुन्यातील अर्ज (मुख्याध्यापक यांनी स्पष्ट शिफारस करावी.)
२. जातीचा दाखला (जिल्हादंडाधिकारी किंवा त्यानी प्रधिकृत केलेले कार्यकारी दंडाधिकारी, मानवसेवा दंडाधिकारी किवा समाजकल्याण अधिकारी)
३. आईवडीलानी (पालक) यानी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञाप्रत
४. नोंदवहीतील उतारा (जनरल रजिस्टर) प्रमाणित प्रत .

नमुना क्रमाक १
वर्णलेखनातील किंवा आकडयातील दुरूस्तीसह जन्मतारखेत बदल करण्याकरीता अर्ज

Changes Or Correction In School Record Of Students
Changes Or Correction In School Record Of Students

नमुना क्रमांक २
वर्णलेखनातील दुरूस्तीसह नाव व आडनावात बदल करण्यासाठी अर्ज

Changes Or Correction In School Record Of Students
Changes Or Correction In School Record Of Students

नमुना क्रमांक ३
जातीत किंवा पोटजातीत बदल करण्याकरीता अर्ज

Changes Or Correction In School Record Of Students
Changes Or Correction In School Record Of Students

Leave a Comment

error: Content is protected !!