Change Update Records Of Teachers In Shalarth System For Senior Selection Grade Training
Change Update Records Of Teachers In Shalarth System For Senior Selection Grade Training
Change Update Personal Information Records Of Teaching Staff In Shalarth System for senior and selected Grade Training
Regarding informing teachers to make corrections in shalarth under senior and selection Grade Training
To change/update the personal information records of teaching staff in the Shalarth Pranali varishth V Nivad Shreni Prashikshan
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणांतर्गत शालार्थमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शिक्षकांना कळविणेबाबत
शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल करणे/नव्याने नोंद (अपडेट) करणे.
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
जा.क्र : शिसंमा / शिक्षक-शिक्षकेत्तर/शालार्थ प्रणाली/२०२५/१४३२
दि.२४/०३/२०२५
विषयः- शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल करणे/नव्याने नोंद (अपडेट) करणे.
संदर्भः-
मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (एसबीटीई) २०२५-२६/०१४८२ दि. १५/०३/२०२५.
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, शिक्षकांच्या वरिष्ठ/निवडश्रेणी प्रशिक्षणाकरीता शिक्षकांची माहिती शालार्थ प्रणालीवरून घेण्यात येणार आहे. तथापि, शालार्थ प्रणालीवरील शिक्षकांच्या वैयक्तिक नोंदी जसे की, मोबाईल नं., ई-मेल आयडी, शाळेचे नाव, पत्ता, इत्यादी माहिती अपूर्ण अथवा नोंदविलेल्या नाहीत. करीता आपणांस सूचित करण्यात येते की, आपले जिल्हयातील सर्व शिक्षकांच्या शालार्थ प्रणालीवरील वैयक्तिक नोंदी दिनांक ३१/०३/२०२५ रोजीपर्यंत अद्ययावत (Update) करणेबाबत मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे. तसेच सदरील नोंदी शाळास्तरावरुन अद्ययावत झाल्यानंतर सदरील नोंदी संबंधित अधीक्षक, वेतन व भनिनि पथक यांनी शालार्थ प्रणालीवर मान्य (Approve) कराव्यात.
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणा बद्दल अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करा
करीता सदरील कामकाज प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे.
(मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.)
शिक्षण उपसंचालक (अंदाज व नियोजन) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र.राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२५-२६/०/५४२
दि. १५/०३/२०२५
विषय :- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणांतर्गत शालार्थमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शिक्षकांना कळविणेबाबत…
संदर्भ :- संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयाकडून प्राप्त शालार्थ API नुसार
उपरोक्त संदर्भाकित विषयात नमूद केल्यानुसार आपल्या कार्यालयाकडून दि.११/०३/२०२५ रोजी शालार्थ API प्राप्त झालेला आहे. या डेटाची तपासणी केली असता शिक्षकांची माहिती (उदा. मराठीतून नाव, Email ID) अपूर्ण असल्याचे निर्देशास आले आहे. तसेच काही शिक्षकांचे मोबाईल नंबर, शाळा यात बदल झालेला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ही माहिती शालार्थमध्ये update होणे गरजेचे आहे.
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी प्रशिक्षणार्थीची ऑनलाईन नोंदणी होणार आहे. ज्या शिक्षकांना शालार्थ आयडी प्राप्त आहे. अशा शिक्षकांची शालार्थ मधील माहिती वरिष्ठ व निवड श्रेणी पोर्टलवर दिसणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या माहितीत काही दुरुस्ती असल्यास ती update करणेबाबत सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.
संचालक
प्रति,संचालक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय,पुणे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे