Celebration of National Youth Day 2026
Celebration of National Youth Day 2026
Celebration of National Youth Day 2026 01 12h January as birth anniversary of Swami Vivekananda mpsp guidelines
Vikasit Bharat Young Leadership
Rashtry Yuva Diwas
विकसित
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र. मप्राशिप/सशि/नॅशनल युथ/१/२०२५-२६/3045
दि. 9 OCT 2025
विषय: Celebration of National Youth Day, २०२६ ०१ १२h January as birth anniversary of Swami Vivekananda-reg
संदर्भ :
१) केंद्रशासनाचे पत्र क्रमांक F. N०. १२-१/२०२५-१७-४, दि. २४/०९/२०२५
२) सचिव, भारत सरकार, युवा और खेल मंत्रालय यांचे पत्र क्रमांक Do.No. १-१३०११/८/२०२५/My Bharat, दि. १८/०९/२०२५
संदर्भिय पत्राचे अवलोकन व्हावे.
विकसित भारत यंग लीडरशीप (VBYLD) -२०२५ च्या यशानंतर, राष्ट्रीय युवा दिन, २०२६ च्या उत्सवाचा एक भाग म्हणून, यावर्षी विकसित भारत युवा नेते संवाद २०२६ मोठ्या प्रमाणात आयोजित केले जाईल, असे संदर्भिय पत्र क्र. २ अन्वये युवा व क्रीडा मंत्रालयाने केंद्रशासनास कळविले आहे. या कार्यक्रमाच्या मागील आवृत्तीत देशभरातील २८ लाखांहून अधिक तरुणांनी सहभाग घेतला होता, ज्यात माननीय पंतप्रधान आणि इतर मान्यवरांसमोर सुमारे २५०० तरुण नेत्यांनी सादरीकरणे केली होती. विकसित भारत यंग लीडरशीप (VBYLD) २०२६ मध्ये डिझाइन आणि तांत्रिक आव्हानांवर लक्ष केंद्रित्त करणारे नवीन वर्टिकल सादर केले जातील. VBYLD-२०२६ च्या पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून, विकसित भारत प्रश्नमंजूषा हा कार्यक्रम १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत
My Bharat
या पोर्टलद्वारे देशभरात इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला जात आहे. या प्रश्नमंजूषाचा उद्देश राष्ट्राच्या विविध पैलूंवरील ज्ञानाची चाचणी घेणे, विकसित भारताचे स्वप्न प्रतिबिंबित करणे आहे.
या संदर्भात, आपल्या अधिनस्त सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विकसित भारत्त प्रश्नमंजुषा कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी प्रोत्सहित करणेबाबत व विकसित्त भारत प्रश्नमंजुषा या उपक्रमाची व्यापक प्रसिद्धी करणेबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेश देण्यात यावे.
उपसंचालक (प्रकल्प / प्रशासन) म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रत-
१. मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे.
२. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण
समग्र शिक्षा
निपुण भारत
आज़ादी का अमृत महोत्सव
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.
२) शिक्षण निरीक्षक उत्तर, दक्षिण व पश्चिम विभाग.
३) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका सर्व.