भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिनांक ०१ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीमध्ये जनजाती गौरव पंधरवडा व दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी जनजाती गौरव दिवस साजरा करण्याबाबत Bhagwan Birsa Munda Janjatiya Gaurav Divas Pakhwara

Bhagwan Birsa Munda Janjatiya Gaurav Divas Pakhwara

Bhagwan Birsa Munda Janjatiya Gaurav Divas Pakhwara

Janjatiya Gaurav Divas

क्र. शिसंमा/संकीर्ण/जनजाती गौरव दिवस/विद्या शाखा/अ-२/२०२५-२६/५१५५ महत्वाचे / कालमर्यादित/ई-मेल व्दारे

दिनांक ०४/११/२०२५

विषय : भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिनांक ०१ ते १५ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीमध्ये “जनजाती गौरव पंधरवडा” व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी “जनजाती गौरव दिवस” साजरा करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करणेबाबत तसेच Tracker मध्ये माहिती भरण्याबाबत.

संदर्भ :

१. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे अ. शा. पत्र क्र. १५-७/२०२५-.IS.७, दिनांक २८ ऑक्टोबर, २०२५.

२. मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक २९ ऑक्टोबर, २०२५ रोजी प्राप्त पत्र.

३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.४४४/एस.डी.४, दिनांक २९ ऑक्टोबर, २०२५.

४. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/संकीर्ण/जनजाती गौरव दिवस/विद्या शाखा/अ-२/२०२५-२६/५१०७दिनांक ३०/१०/२०२५.

उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक ४ अन्वये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी “जनजाती गौरव दिन” सर्वत्र उत्साहात साजरा करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.

दिनांक ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर, २०२५ हा कालावधी शाळांमध्ये ‘जनजाती गौरव पंधरवडा’ म्हणून साजरा करण्याबाबत व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी ‘जनजाती गौरव दिवस’ साजरा करण्याबाबत विभागीय स्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी नोडल अधिकारी तसेच जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षण निरीक्षक (उत्तर/ दक्षिण/पश्चिम) यांनी नोडल अधिकारी म्हणून कामकाज करण्यात यावे. आपल्या अधिनस्त कार्यालयांना/शाळांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा प्रत्येक दिवशीचा आपल्या जिल्हयाचा एकत्रित अहवाल
https://docs.google.com/spreadsheets/d/1z7PcYCZCWcUv9PNPBgrVvNdGoT-gJz4t/edit?usp=sharing&uid=103030212171255545632&rtpof=true&sd=true

या लिंकवर भरण्यात यावा. तसेच सोशल मिडीयावर एक्स, फेसबुक, खालील लिंकला प्रतिसाद देऊन लाईक व शेअर करण्यासंबंधी सूचित करावे.

X:
https://x.com/EduMinOfIndia/status/1985677817586344217

FB:
https://www.facebook.com/share/17X6ffohBJ/

IG:
https://www.instagram.com/p/DQoj154jQrw/?utm source=ig web copy link

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

Bhagwan Birsa Munda Janjatiya Gaurav Divas Pakhwara
Bhagwan Birsa Munda Janjatiya Gaurav Divas Pakhwara

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषदा सर्व,
३) शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)

प्रत: माहितीस्तव सविनय सादर-

१. मा.आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१.

२. अ.अ. कुलकर्णी, अवर सचिव, (एस.डी. ४), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई ४०० ०३२.

ALSO READ 👇

Bhagwan Birsa Munda Janjatiya Gaurav Divas Pakhwara
Bhagwan Birsa Munda Janjatiya Gaurav Divas Pakhwara

Janjatiya Gaurav Divas
Janjatiya Gaurav Pakhwara

Janjatiya Gaurav Varsh 2024-25
Celebrating Bhagwan Birsa Munda’150th Birth Anniversary Year

क्र. शिसंमा/संकीर्ण/जनजाती गौरव दिवस/विद्या शाखा/अ-२/२०२५-२६/५१०७
दिनांक ३०/१०/२०२५

विषय : भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिनांक ०१ ते १५ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीमध्ये “जनजाती गौरव पंधरवडा” व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी “जनजाती गौरव दिवस” साजरा करण्याबाबत.


संदर्भ :
१. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे अ. शा. पत्र क्र.
१५-७/२०२५-.IS.७, दिनांक २८ ऑक्टोबर, २०२५.
२. मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक २९ ऑक्टोबर, २०२५ रोजी प्राप्त पत्र.
३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.४४४/एस.डी.४, दिनांक २९ ऑक्टोबर, २०२५.

भगवान बिरसा मुंडा यांचे जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा माहितीपूर्ण लेख व प्रश्न मंजुषा निबंध,भाषण व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नक्की वाचा या ओळीला स्पर्श करून

उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिनांक ०१ ते १५ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीमध्ये “जनजाती गौरव पंधरवडा” व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी “जनजाती गौरव दिवस” साजरा करण्याबाबत संदर्भ क्र. १,२ व ३ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे. (सोबत प्रत संलग्न)

२. शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संदर्भ क्र.१ येथील पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, भारत सरकारने १५ नोव्हेंबर हा दिवस, देशाचे आदर्श स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस, सर्व आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यासाठी आणि स्वातंत्र्यलढ्यात आणि सांस्कृतिक वारसामध्ये त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांची प्रशंसा करण्यासाठी जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित केला आहे. दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आहे.

Also Read जागतिक आदिवासी दिन अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून World Tribal Day Learn more by touching this line.

३. आदिवासी व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Tribal Affairs) दिनांक २४.१०.२०२५ च्या पत्राद्वारे कळवले आहे की, दिनांक ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ हा कालावधी शाळांमध्ये जनजाती गौरव पंधरवडा म्हणून साजरा करावा, जनजाती गौरव दिवस (JJGD) २०२५ आणि भारतीय समाज आणि वारसामध्ये आदिवासी समुदायांचे योगदान साजरे करण्यासाठी, ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्य/केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांद्वारे हाती घेता येणाऱ्या उपक्रमांची एक उदाहरणात्मक यादी जोडली आहे (परिशिष्ट-१). राज्ये/केंद्रशासित प्रदेश सूचक यादीतील उपक्रम समाविष्ट करु शकतात आणि खालील व्यापक विषयांना समाविष्ट करण्यासाठी या उपक्रमांना आणखी व्यापक स्वरुप देऊ शकतात :-

सामाजिक आर्थिक विकास आणि जागरुकता.
शिक्षण आणि कौशल्य विकास.
उपजीविका आणि निरोगीपणा.
कला, संस्कृती आणि वारसा.
पायाभूत सुविधांचा विकास.
प्रशासन आणि संस्वात्मक बळकटीकरण,

या संदर्भात प्रत्येक राज्य / केंद्रशासित प्रदेश संघटनेकडून एक नोडल अधिकारी नियुक्त करावा आणि (is7section@gmail.com) या ई-मेलवर शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाल कळविण्यात यावे असे सदर पत्रात नमूद केले आहे. या नोडल अधिकाऱ्यांना दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ ते १५ नोव्हेंबर २०२५ या जनजाती गौरव दिवस कालावधीमध्ये कार्यक्रमांच्या आयोजनाचे समन्वय करावे लागेल. त्यांनी सदर कार्यक्रमाचे फोटोज आणि व्हिडियोज आणि कार्यक्रमांचे तपशील या बाबी विहित पोर्टलवर

https://adiprasaran.tribal.gov.in/jjgd/home.aspx

अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
४. मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य यांनी देखील त्यांच्या संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी “जनजाती गौरव दिन” सर्वत्र उत्साहात साजरा करण्याबाबत सविस्तर सूचना देण्याची विनंती केलेली आहे.


प्रस्तुत प्रकरणी शिक्षण मंत्रालयाच्या संदर्भ क्र.१ येथील पत्रामधील सूचनांनुसार दिनांक ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर, २०२५ हा कालावधी शाळांमध्ये ‘जनजाती गौरव पंधरवडा’ म्हणून व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी ‘जनजाती गौरव दिवस’ साजरा करण्यात यावा.

उपरोक्त प्रमाणे दिनांक ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर, २०२५ हा कालावधी शाळांमध्ये ‘जनजाती गौरव पंधरवडा’ म्हणून साजरा करण्याबाबत व दिनांक १५ नोव्हेंबर, २०२५ रोजी ‘जनजाती गौरव दिवस’ साजरा करण्याबाबत आपल्या अधिनस्त कार्यालयांना/शाळांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा.

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

Bhagwan Birsa Munda Janjatiya Gaurav Divas Pakhwara
Bhagwan Birsa Munda Janjatiya Gaurav Divas Pakhwara

Leave a Comment

error: Content is protected !!