BARTI Vishesh Anudan Yojana For Students

BARTI Vishesh Anudan Yojana FOR SC STUDENTS

BARTI Vishesh Anudan Yojana For Students बार्टीची विशेष अनुदान योजना एस सी विद्यार्थ्यांसाठी

Barti’s Special Grant Scheme for Schedule Cast Students

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) मुख्यालय : २८ क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे ४११००१
Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute, Pune Sponsored “Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Special Grant Scheme”

१. अर्जाचा नमुना.

२. विद्यार्थ्यांचा SSC बोर्ड (इ.१०) चे मार्कशीट. (शाक्षांकित प्रत)

३. विद्यार्थ्याचा SSC बोर्ड (इ.१०) चे शाळा सोडल्याचा दाखला. Leaving Certificate / T C (शाक्षांकित प्रत)

४. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला विद्यार्थ्यांचा / वडीलांचा जातीचा दाखला. (शाक्षांकित प्रत)

५. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा तहसीलदार तथा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला विद्यार्थ्यांच्या पालकांचा/आई-वडील यांचा उत्पन्नाचा दाखला. (मूळ प्रत)

६. विद्यार्थ्याचा रहिवासी दाखला. (शाक्षांकित प्रत)

७. विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँक खाते झेरॉक्स प्रत. (शाक्षांकित प्रत)

८. आई-वडील / पालकांचे विहित नमुन्यातील स्व घोषणापत्र.

९. विहित नमुन्यातील मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र किंवा शिफारसपत्र.

१०. कुटुंबाचे पिवळे रेशनकार्ड. (असल्यास प्राधान्य)

नियम व अटी शर्ती

BARTI Vishesh Anudan Yojana For Students डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीची विशेष अनुदान योजना या योजनेचा लाभ हा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षापासून पुढील वर्षाकरीता लागू राहील.

विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी तसेच अनुसूचित जातीतील प्रवर्गातील असणे अनिवार्य.

  • सदर प्रोत्साहनपर पुरस्कार शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थीचे आई-वडील / पालक दारिद्य रेषेखालील असणे किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न रक्कम २,५०,०००/- (अक्षरी दोन लाख पन्नास हजार रुपये) पर्यंत असणे बंधनकारक आहे.
  • सदर योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांनी पुढील व्यावसायिक शिक्षणाची (MH-CET/NEET/JEE. इत्यादी) पूर्व तयारी करणे करिता देण्यात येत असल्याने विद्यार्थ्याने इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे. पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनेकरिता पात्र विद्याथ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रथम हप्ता रु.५०,०००/- इतकी रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल.

योजनेतील उर्वरित तीन हप्ते सहा महिन्याचा कालावधी नुसार देण्यात येतील, त्याकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांस इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये होणाऱ्या सहामाही/वार्षिक परीक्षेत किमान ७५% गुण मिळविणे आवश्यक आहे. (भाषा विषयांचे गुण वगळून)

  • पालकांचा उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रक, जातीचा दाखला इ. पुराव्यांची आवश्यकता वाटल्यास चौकशी केली जाईल.

अर्जामध्ये खोटे, बनावट, दिशाभूल करणारे पुरावे / कागदपत्रे सादर केल्यास विद्यार्थ्यास सदर योजनेकरिता अपात्र ठरविण्यात येईल व योजनेचा लाभ दिला असल्यास सदर लाभ वसूल करण्यात येईल.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेसाठी च्या संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास नियामक मंडळ, बार्टी, पुणे यांच्या सल्ल्याने महासंचालक, यांना याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे पुरस्कृत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” सन -२०२१-२२ योजना अंमलबजावणी कार्यपद्धती

१. सदर योजनेकरिता पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील १० वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या गुणवत विद्यार्थी/ विद्यार्थ्यांचे पालक याचेकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

२. सदर योजनेकरिता अर्जाचा नमुना व योजनेची माहिती बार्टी कार्यालयाच्या संकेतस्थळावर PDF स्वरुपात तसेच सदर अर्जाचा नमुना व योजनेबाबतची माहिती सहा. आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे.

३. बार्टी संकेतस्थळावरील अर्जाचा नमूना Download करून अर्जदार विद्यार्थी / पालक यांनी भरून सदर अर्ज हा बार्टी मुख्य कार्यालयास खालील पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवावा. (कार्यालयाचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, २८, राणीचा बाग पुणे-४११००१)

४. अर्जासोबत आई-वडील / पालकांनी द्यावयाचे स्व घोषणापत्र व मुख्याध्यापक यांनी द्यावयाचे शिफारस पत्र सादर करणे अनिवार्य आहे.

५. स्वयं घोषणापत्र साध्या कागदावर विद्यार्थ्यांचे वडील यांनी सादर करावे. वडील हयात नसल्यास आईने सादर करावे. आई- वडील ह्यात नसल्यास विद्यार्थ्याच्या पालकांनी सादर करावे.

६. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे / पुरावे उदा. गुणपत्रक, शाळा सोडण्याचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रांच्या वाचनीय छायांकित (झेरोक्स) प्रती साक्षांकीत करून सोबत जोडाव्यात.

७. योजने अंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी बार्टी कार्यालय स्तरावरुन करण्यात येईल.

८. योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल व पुढीलप्रमाणे योजनेचा लाभ देण्यात येईल.

अ) योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रथम हप्ता रु. ५०,०००/- इतकी रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल.

आ) योजनेतील उर्वरित तीन हप्ते सहा महिन्याचा कालावधी नुसार देण्यात येतील, त्याकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांस इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये होणाऱ्या सहामाही/वार्षिक परीक्षेत किमान ७५% गुण मिळविणे आवश्यक आहे. (भाषा विषयांचे गुण वगळून)

महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे पुरस्कृत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” सन -२०२४-२५

१. विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव :-

२. शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता :-

३. मुख्याध्यापकाचे नाव

फोन नं./मोबाईल नं व ईमेल

४. पालकाचे संपूर्ण नाव -:

५. पत्रव्यहाराचा पत्ता पिन कोड सह :-

मोबाईल/दूरध्वनी क्र व ईमेल

६. विद्यार्थ्याचे इ.१० वीचे गुणांची टक्केवारी :-

वर्ष :- २०२३-२४

७. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे काय? होय / नाही –

८. विद्यार्थ्याचा/वडिलांचा जातीचा दाखला आहे काय? होय / नाही

९. पालकांचा सन २०२३-२४ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे काय? होय नाही –

१०. पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये –

११. विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत आहेत काय? होय / नाही

१२. अ) विद्यार्थ्याचे बँकचे नाव :-

आ (विद्यार्थ्याचे बँकचे खाते क्रं. Saving bank Account No –

ब) बँकेचा आय.एफ.एस.सी. कोड BANK IFCS Code –

सदर योजनेतील अटी व शर्ती मला मान्य असून वरील माहिती चुकीची, दिशाभूल करणारी आढळल्यास होणाऱ्या पुढील कायदेशीर कार्यवाहीस/दंडास मी पात्र राहील याची मला जाणीव आहे.

विद्यार्थ्याचे नाव व स्वाक्षरी

ठिकाण-

दिनांक –

आई-वडील / पालकांचे नाव स्वाक्षरी,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे पुरस्कृत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” अर्जदार विद्यार्थ्याचे आई-वडील / पालक यांनी द्यावयाचे स्व घोषणा पत्राचा नमुना.

स्व घोषणापत्र करणाऱ्याचा फोटो

मी. श्री/श्रीमती वय वर्ष, व्यवसाय आधार कार्ड क्र.-

पत्ता

येथील रहिवासी असून, आज रोजी शपथेवर खालीलप्रमाणे कथन करीत आहे कि,

१) माझा मुलगा/मुलगी / पाल्य कुमार/कुमारी – हिने / ह्याने सन २०२३-२४ या वर्षांमध्ये झालेल्या इयत्ता १० वीच्या माध्यमिक शालांत परीक्षेत (SSC) एकूण % गुण मिळविले आहेत.

२) आमच्या कुटुंबाचे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२,५०,००० /-(अक्षरी दोन लाख पन्नास हजार रुपये) पेक्षा कमी असून, आमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय/निमशासकीय सेवेत नाही.

३) सदर योजनेतील प्राप्त होणाऱ्या आर्थिक सहाय्याचा उपयोग मी अर्जा मध्ये नमूद केलेल्या माझ्या मुला-मुलीच्या / पाल्याच्या पुढील शैक्षणिक बाबीं, खर्चासाठी करील. सदर अर्थसहाय्याचा उपयोग मी, वैयक्तिक अथवा खाजगी कामाकरिता करणार नाही.

४) अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे खोटे अथवा बनावट आढळल्यास त्यास मी, जबाबदार असून त्यासाठी भारतीय दंडविधान कायद्यानुसार लागू होणाऱ्या शिक्षेस मी पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे.

वर नुमूद केलेली सर्व माहिती सत्य व खरी आहे म्हणून हे स्व घोषणापत्र करीत आहे.

स्व घोषणापत्र करणाऱ्याचे नाव व सही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे पुरस्कृत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना”

मुख्याध्यापकांनी द्यावयाचे शिफारस पत्राचा नमुना

प्रमाणित करण्यात येते की, कु./कुमारी पत्ता हा विद्यार्थी इ. १० वी मध्ये आमच्या शाळेत शिकत होता व त्यास सन २०२१-२२ या वर्षातील माध्यमिक शालांत परीक्षेस (SSC) मध्ये एकूण % गुण मिळाले असून तो अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. सदर विद्यार्थ्यास मिळालेल्या गुणांची पडताळणी त्याच्या SSC बोर्डाच्या गुणपत्रिकेमधील प्रमाणपत्र क्र. अन्वये केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे पुरस्कृत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” या योजने करिता कु./ कुमारी- हा विद्यार्थी/विद्यार्थिनी पात्र असून शिफारस करण्यात येत आहे.

मुख्याध्यापकांचे नाव व सही शाळेचा शिक्का

BARTI Vishesh Anudan Yojana FOR SC STUDENTS

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना (शैक्षणिक वर्ष मार्च २०२१ पासून लागू)

इयत्ता १० वी मध्ये ९०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी

पुरस्काराची रक्कम रु.२,००,०००/-

(पुढील दोन वर्षांसाठी प्रती वर्ष रु. १ लक्ष याप्रमाणे)

पात्र विद्यार्थ्यांनी हा गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे
👇👇👇👇
गुगल फॉर्म लिंक

गुगल फॉर्म भरण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
☝☝☝☝☝
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम विहीत नमुना अर्ज

अशाच प्रकारच्या दर्जेदार शैक्षणिक माहितीसाठी आपल्यासाठी तयार करण्यात आलेल्या समाज माध्यमां मध्ये सामील व्हा
🪀

व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

अधिक माहितीसाठी : संपर्क : ०२०-२६३३३३३०, ०२०-२६३३३३३९

बार्टीच्या संकेतस्थळावर भेट द्या संकेतस्थळाला जोडले जाण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

Leave a Comment

error: Content is protected !!