Vyvsay Din Margdarshan Saptah for Students

Vyvsay Din Margdarshan Saptah for Students

image 41
Vyvsay Din Margdarshan Saptah for Students

Vyvsay Din Margdarshan Saptah for Students

Vyvsay Din Margdarshan Saptah SCERT Guidelines

विषय : व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त सप्ताह साजरा करण्याबाबत….

संदर्भ : जा क्र. रा शैसंप्रपम/व्यमावसमुवि/समुपदेशन केंद्र / २०२४-२५/०६२३९दिनांक २२/१२/२०२४


उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या विविध संधी व कोर्सेसची माहिती व्हावी म्हणून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रतिवर्षी १४ जानेवारी हा दिवस व्यवसाय मार्गदर्शन दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा म्हणून इयत्ता ९ ते १२ वीचे वर्ग असणाऱ्या संबंधित शाळांना खालील प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगून व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त सप्ताह साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना सूचित करण्यात यावे.

Maharashtra Career Guidance Portal LINK


यासाठी खालीलप्रमाणे दिवसनिहाय नियोजन करून उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे.


१ एक दिवस करिअरच्या विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मदतीने करिअर विषय मार्गदर्शन
आयोजित करावे – दि. १४ जानेवारी २०२५

विद्यार्थ्यासाठी एस सी आर टी तर्फे आयोजित केलेले करिअर मार्गदर्शन सत्र या ओळीला स्पर्श करून पाहू शकता


२ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करून मार्गदर्शन सत्राचे आयोजन करावे- दि. १५ जानेवारी २०२५


३ यशस्वी व्यावसायिकास विद्यालयात आमंत्रित करून यशस्वी व्यवसायाचा मंत्र या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करावे. दि. १६ जानेवारी २०२५


४ राज्यस्तरावर करिअर मार्गदर्शन संदर्भात प्रस्तुत परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या वेविणार मालिकेचे प्रसारण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे. शाळेत विद्यार्थ्यांना सदर प्रसारण उपलब्ध करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी- दि. १७ जानेवारी २०२५


५ विद्यालय स्तरावर जवळपास असणारे कारखाने, लघु उद्योग यांना भेट देण्यास विद्यालय स्तरावर सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसाय, उद्योग याबाबत सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगावा. दि. १८ जानेवारी २०२५

hello click here
688587d89bcaad9109cda401fed39b66


६ इयत्ता ९ वी ते १२ वीच्या पालकांसाठी पालकांची अपेक्षा, विद्यार्थ्याची आवड व त्यांची क्षमता व उपलब्ध करिअर करिअर मार्ग याबाबत शाळा व्यवस्थापन / व्यवस्थापन विकास समिती बैठकीत मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे दि. २० जानेवारी २०२५

७ येत्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होणाऱ्या १० वी व १२ वी च्या वोर्ड परीक्षांची पार्श्वभूमीनुसारमानसशास्रातील तज्ञांचे परिक्षा व ताण तणावाचे निवारण यावर सत्र आयोजित करावे.

दि.२१ जानेवारी २०२५ उपरोक्त संदर्भानुसार सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शाळांमध्ये समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

सदर सप्ताह या केंद्राच्या सहाय्याने शाळेमध्ये रावविण्यास सांगण्यात यावे. सदर सप्ताहादरम्यान आपल्या अधिनस्त पर्यवेक्षीय अधिकारी यांच्या शाळा भेटीचे नियोजन करून जिल्ह्यातील इयत्ता ९ ते १२ वीच्या जास्तीत जास्त शाळांना भेटी देण्यास सूचना देण्यात याव्यात. या भेटी दरम्यान प्रस्तुत परिषदेमार्फत प्रत्येक शुक्रवारी दुपारी ३ ते ४ या दरम्यान आयोजित करिअर मार्गदर्शक वेविणारबद्दल माहिती देण्यात यावी. सदर भेटीसंदर्भात लिंकद्वारे भेटीचा अहवाल संकलित करण्यात येणार आहे.


परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

(राहूल रेखावार भा प्र से) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे

Career Guidance Program for Students By SCERT Guidelines

Leave a Comment

error: Content is protected !!