Age of Child Fixed For RTE Admission
Age of Child Fixed For RTE Admission
Regarding determination of age of child for RTE 25% online admission in academic session 2025-26
विषय :- सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत.
संदर्भ :-
१. शासन निर्णय क्र. आरटीई-२०१९/प्र.क्र.११९/एस.डी.-१, दि. २५-०७-२०१९
२. शासन निर्णय क्र. आरटीई-२०१८/प्र.क्र.१८०/एस.डी.-१, दि. १८-०९-२०२०.
उपरोक्त संदर्भ क्र. ०१ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दि. १८-०९-२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानवीन दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे. संदर्भीय शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता १ली मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालीलप्रमाणे निश्चत करण्यात येत आहे.
अ.क्र. प्रवेशाचा वर्ग किमान वय वर्ष वयाबाबत मानीव दिनांक
प्ले ग्रुप / नर्सरी (इ. १ली पूर्वीच्या ३ रा वर्ग)
३+
३१ डिसेंबर
इयत्ता १ ली
६+
३१ डिसेंबर
शासन निर्णय दि. २५-०७-२०१९ नुसार शाळा प्रवेशासाठीचे किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता देण्यात आलेली आहे. तरी उपरोक्त प्रमाणे आरटीई २५ टक्के सन २०२५-२६ च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी.
CIRCULAR PDF COPY LINK
(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे