Yoga Olympiad Competition Organized by NCERT New Delhi Guidelines Link

Yoga Olympiad Competition Organized by NCERT New Delhi Guidelines Link

image 2
Yoga Olympiad Competition Organized by NCERT New Delhi Guidelines Link

दु.क्र.०२०-२४४७६९३८ Email- arts.sportsdept@maa.ac.in

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे – ४११०३०.

जा.क्र.राशैसंप्रप/कलाक्रीडा/योगा ऑलिम्पियाड /२४२०७१/०२४८६

दि.१६/०५/२०२४

प्रति.

उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

विषय– NCERT, नवी दिल्ली यांचेमार्फत आयोजित योगा ऑलिम्पियाड स्पर्धेबाबत.
Regarding the Yoga Olympiad competition organized by NCERT, New Delhi.
संदर्भ – F.No. 2-1/2024-25/DESS/IDY-24/111 NCERT, नवी दिल्ली कार्यालयाकडील दि. १५/०५/२०२४ चे पत्र

उपरोक्त संदर्भीय NCERT. नवी दिल्ली यांचेकडील पत्रानुसार दि. २१ जून या आंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सन २०१६ पासून राष्ट्रीय योगा ऑलीम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तसेच सन २०२४-२५ मध्ये दि. १८ ते २० जून २०२४ या कालावधीत Regional Institute of Education, म्हैसूर, कर्नाटक येथे राष्ट्रीय योगा ऑलीम्पियाड स्पर्धेचे आयोजन आरोग्य, सुसंवाद आणि शांतता ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेउन करण्यात येत आहे. सदर स्पर्धेचे आयोजन उच्च प्राथमिक स्तर इयत्ता ६वी ते ८वी आणि माध्यमिक स्तर इयत्ता ९वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी केलेले आहे. त्यासाठी परिषदेकडून उच्च प्राथमिक स्तरावरील ४ विद्यार्थी व ४ विद्यार्थिनी तसेच माध्यमिक स्तरावरील ४ विद्यार्थी व ४ विद्यार्थिनी आणि साथीदार २ शिक्षक (त्यापैकी १ महिला शिक्षिका) यांचे नामांकन करावयाचे आहे.

आंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित प्रश्न मंजुषा नाकी सोडवा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

जिल्हास्तरावरील स्पर्धांचे आयोजन उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आणि प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी ऑनलाईन करावयाचे आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील शाळांकडून विद्यार्थ्यांचे योगा प्रात्यक्षिकाचे व्हिडीओ एका लिंकवर मागवून घ्यावेत. आणि डाएट स्तरावर ३ परीक्षकांची एक समिती नेमून या व्हिडीओंचे परीक्षण करून घेण्यात यावे. परीक्षक हे योगासनांच्या क्षेत्रातील प्राविण्य असणारे असावेत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचेसाठी वेगवेगळे मूल्यमापन करण्यात यावे. स्पर्धांच्या मूल्यमापनाच्या मुद्द्यांसाठी सोबत जोडलेल्या NCERT, नवी दिल्ली यांचेकडील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा. उच्च प्राथमिक स्तरावरील ४ विद्यार्थी व ४ विद्यार्थीनी तसेच माध्यमिक स्तरावरील ४ विद्यार्थी व ४ विद्यार्थिनी आणि साथीदार २ शिक्षक (त्यापैकी १ महिला शिक्षिका) यांची नामांकने व व्हिडीओ सोबत दिलेल्या एक्सेल शीटच्या नमुन्यामध्ये इंग्रजीमध्ये भरून कला क्रीडा विभागाच्या 📧 स्पर्श करा या ईमेल आय डी वर दि २६/०५/२०२३ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पर्यंत पाठवावेत. ४ विद्यार्थी आणि विद्याथी याची नावे त्यांच्या फोतील कमांकानुसार पाठवावीत. जसे प्रथम क्र. पहिले नाव. याप्रमाणे व्यानंतर परिषद स्तरावर ३ परीक्षकांची एक समिती नेमून सदर व्हिडीओमधून परीक्षण करून प्रथम आलेल्या २ संघांना (१ उच्च प्राथमिक व माध्यमिक) राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण करण्यासाठी पाठविण्यात येईल.

राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धासाठी पुढील मुद्धांवर गुणांकन केले जाईल.

Also Read 👇

🧘‍♂️🧘‍♀️🧘🕉️
दि २१ जून २०२४ हा दिवस दहावा आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करणे बाबत परिपत्रक वाचण्यासाठी फक्त या वडीला स्पर्श करा

सहसंचालक,महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

१. क्रिया

२. आसने

३. प्राणायाम

४. ध्यान (Meditation) (मूल्यमापन नाही)

५. बंध आणि मुद्रा (फक्त माध्यमिक साठी)

जिल्हास्तरावरील स्पर्धासाठीही उपरोक्त ५ मुद्द्यांच्या आधारे गुणांकन करण्यात यावे. सोबत जोडलेल्या NCERT, नवी दिल्ली यांचेकडील मार्गदर्शक सूचनांमध्ये योगा ऑलीम्पियाडचा अभ्यासक्रम दिलेला आहे. त्याचे अवलोकन करावे व तसे आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय व शासकीय अनुदानित व CBSE शाळांनाही कळयाये, तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी सदर स्पर्धेमध्ये सहभागी होतील यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. तसेच त्यानंतर दि. ३०/०५/२०२४ या

तारखेपर्यंत पुढील मुद्द्यांच्या आधारे जिल्हास्तर स्पर्धाचा अहवाल कलाक्रीडा विभागाच्या मेलवर

पाठवावा.

१. जिल्हास्तरावर सहभागी शाळांची यादी.

. सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची संख्या (वेगवेगळी)

२ ३. सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची शहरी व ग्रामीण याप्रमाणे वर्गवारी

४. परीक्षकांची नावे, पदनाम, तज्ञत्व / अनुभव

स्थानिक पातळीवर योगा स्पर्धाच्या वेळेच्या सूचना ह्या कोणत्याही भाषेत असू शकतील परंतू राष्ट्रीय स्पर्धाच्या वेळेस सदर सूचना ह्या फक्त हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असाव्यात. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेची बक्षिसे पुढीलप्रमाणे आहेत.

१. प्रथम क्र. सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र

२. द्वितीय क्र. रौप्य पदक आणि प्रमाणपत्र

३. तृतीय क. कास्य पदक आणि प्रमाणपत्र

४. उर्वरित सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी सोबत जाणाऱ्या २ शिक्षकांपैकी एक महिला शिक्षिका असणे अनिवार्य आहे. राष्ट्रीय योगा ऑलीम्पियाड स्पर्धा या दि. १८ ते २० जून २०२४ या कालावधीत

असल्याने निवड झालेल्या संघांनी दि. १७ जून २०२४ रोजी Regional Institute of Education, म्हैसूर, कर्नाटकच्या गेस्ट हाउस मध्ये पोहोचणे आवश्यक आहे. दि. १८ जून २०२४ रोजी सकाळी स्पर्धांची सुरुवात होईल. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रवासभत्ता हा NCERT, नवी दिल्ली या कार्यालयाकडून मिळेल. म्हैसूर, कर्नाटक येथे जाणे व येणे यासाठी रेल्वेचे ३rd AC चे प्रवासभाडे मंजूर केले जाईल. सहभागी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेस जाताना सोबत आपल्या किंवा पालकांच्या बँक खात्याचे विवरण आणि रेल्वे तिकिटांची छायांकित प्रत बरोबर नेणे बंधनकारक आहे. सदर स्पर्धा आयोजनासाठी परिषदेकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद उपलब्ध

होणार नाही.

सोबत – १. NCERT, नवी दिल्ली यांचेकडील पत्र व मार्गदर्शक सूचना

२. नमुना एक्सेल शीट

प्रत माहितीस्तव सविनय सादरः

मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

17.5.24

(डॉ. माधुरी सावरकर)

उपसंचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषद महाराष्ट्र, पुणे ३०

मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.

मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे १

Leave a Comment

error: Content is protected !!