World Environment Day Campaign ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून सर्व विभागांमध्ये एकल वापराच्या प्लास्टिकसह प्लास्टिक वापराचे प्रमाण कमी करणे व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्विकार करण्यासाठी मोहिम राबविण्याबाबत शासन निर्णय

World Environment Day Campaign

IMG 20250603 164426
World Environment Day Campaign

World Environment Day Campaign

Jagtik Paryavaran Din

On the occasion of World Environment Day (June 5), a campaign will be launched in all departments to reduce the use of plastic, including single-use plastic, and to adopt an eco-friendly lifestyle.

  • ०५ जून” जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून सर्व विभागांमध्ये एकल वापराच्या प्लास्टिकसह प्लास्टिक वापराचे प्रमाण कमी करणे व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्विकार करण्यासाठी मोहिम राबविण्याबाबत.

दिनांक: ०३ जून, २०२५

शासन परिपत्रक :-

पर्यावरण व वातावरणीय बदलाचे महत्व लक्षात घेता, पर्यावरण विभागाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग” असा नामबदल करण्यात आला आहे. निसर्गाशी असलेली कटिबध्दता निश्चित करण्यासाठी पुथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे.

०२. वातावरणातील गंभीर बदल आपण सर्वजण मागील काही वर्षात अनुभवत आहोत. वैश्विक पातळीवर या बदलांना अटकाव करण्यासाठी आणि आपली पृथ्वी वाचवण्यासाठी व्यक्तीगत व सामुहिकपणे पर्यावरण संर्वधनासाठी व रक्षणाकरीता आपण सर्वांनी मिळून संकल्प व प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे.

०३. “जागतिक पर्यावरण दिन” :

दिनांक ०५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. या वर्षाची पर्यावरण दिवसाची थीम” जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करणे” (Ending Plastic Pollution Globally) ही ठेवली आहे. सदर थीम केंद्र शासनाने स्विकारलेल्या मिशन लाईफ शी संलग्न आहे. मिशन लाईफ मध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्विकार करण्यात आला आहे. त्यामध्ये एकल वापराच्या प्लास्टिकला नकार देणे व प्लास्टिकचा कचरा कमी करणे या बाबींचा समावेश आहे. पर्यावरणास सर्वात जास्त धोका हा प्लास्टिक मुळे होणाऱ्या प्रदुषणाचा आहे.

०४. देशभरात दिनांक २२ मे २०२५ ते ५ जून, २०२५ या कालावधीत जनजागृती मोहिम राबवून एकल वापराच्या प्लास्टिकसह प्लास्टिक वापराचे प्रमाण कमी करणे व यासाठी शाश्वत पर्याय विकसित करण्याबाबतच्या सूचना केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व इतर यंत्रणामध्ये अंमलबजावणी करण्यासंदर्भात सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.

०५. एकल वापराच्या प्लास्टिकसह प्लास्टिक वापराचे प्रमाण कमी करण्याच्या या मोहिमेची राज्य शासनाचे सर्वोच्च कार्यालयालापासून म्हणजे मंत्रालया” पासून सुरवात करणे आवश्यक आहे. यास्तव,

शासन परिपत्रक क्रमांका ईएनव्ही-२०२५/प्र.क्र.८३/तां.क. १

“एकल वापराच्या प्लास्टिकसह प्लास्टिक वापराचे प्रमाण कमी करणे व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्विकार करण्यासाठी मंत्रालयातील सर्व विभागांनी आप-आपल्या विभागात जनजागृती मोहिम राबवावी. या मोहिमेच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-

१) मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी / कर्मचारी यांनी सदर अभियानात सहभागी होऊन आपल्या प्रशासकीय विभागात असणारे एकल प्लास्टिक एकत्रित करुन त्रिमुर्ती प्रांगण येथे जमा करावे.

२) ज्यामध्ये कार्यालयात न वापरले जाणारे (निरुपयोगी) प्लास्टिक फोल्डर, पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या तसेच, कर्मचारी यांनी आपल्या दैनंदिन उपयोगात आणले जाणारे एकल प्लास्टिक स्वयंप्रेरणेने एकत्रित करुन एकल प्लास्टिक विरोधातील अभियानामध्ये सहभागी व्हावे.

३) कार्यालयामध्ये काम करीत असतांना पर्यावरण पुरक कार्यालयाची संकल्पना राविण्यात यावी.

०६. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०६०३१५०९३७७१०४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

या ओळीला स्पर्श करून शासन निर्णय पीडीएफ मध्ये प्राप्त करा

(शा. श्रे. २ तथा अवर सचिव

महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग शासन परिपत्रक क्रमांकः ईएनव्ही-२०२५/प्र.क्र.८३/तां.क. १, मंत्रालय, मुंबई

Environment Department
On the occasion of World Environment Day, June 05, a campaign is being launched to reduce the use of plastic, including single-use plastic, in all departments and to adopt an eco-friendly lifestyle.

Ministry of Environment, Forest and Climate Change launches campaign to mark World Environment Day 2025 (WED 2025) celebrations

Ahead of World Environment Day, campaign on ‘One Nation, One Mission: End Plastic Pollution’ begins

Nationwide Activities to Promote Eco-friendly Alternatives to Single-Use Plastic

  • On the occasion of World Environment Day (June 5), a campaign will be launched in all departments to reduce the use of plastic, including single-use plastic, and to adopt an eco-friendly lifestyle.

IMG 20250603 162057
World Environment Day Campaign

Leave a Comment

error: Content is protected !!