महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी “दक्षता समिती” चे पुनर्गठण करणेबाबत Vigilance Committee for SSC HSC Exam

Vigilance Committee for SSC HSC Exam

Vigilance Committee for SSC HSC Exam

Class 10th And Class 12th Examination Dakshta Samiti Punargathan

Regarding the re-organization of the “Vigilance Committee” for the Maharashtra State Secondary and Higher Secondary School Certificate Examination.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी “दक्षता समिती” चे पुनर्गठण करणेबाबत.

दिनांक: २४ नोव्हेंबर, २०२५.
वाचा:-
१) उप सचिव, महाराष्ट्र शासन पत्र क्र./एच.एस.सी/२००/(१९०२)/ उमाशि-१/शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई, दिनांक ०९ फेब्रुवारी, २००२.
प्रस्तावना:-

SCERT पुणे यांचेकडून करियर मार्गदर्शन मिळविणार परीक्षेला सामोरे जाताना पहा या ओळीला स्पर्श करून

महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दरवर्षी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षाचे आयोजन करण्यात येतात. परीक्षांचे आयोजन निकोप व गुणवत्तापुर्ण वातावरणात होण्यासाठी राज्यशासनामार्फत वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत असते. या परीक्षांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संदर्भ क्रमांक १ अन्वये प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “दक्षता समिती” स्थापन करण्यात आलेली आहे. दक्षता समितीच्या सभासदांनी परीक्षा कालावधीत केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. तसेच विभागीय परीक्षा मंडळानी ज्या परीक्षा केंद्राचा अंतर्भाव “उपद्रवी केंद्र” म्हणुन केला आहे, त्या केंद्रावर प्रामुख्याने प्रभावी यंत्रणेची अंमलबजावणी करणे अपेक्षीत आहे.

इयत्ता दहावी परीक्षेच्या भक्कम तयारीसाठी सर्व विषयाच्या प्रश्नमंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून

दिनांक ०३ व ०४ एप्रिल, २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या महसुल परीषदेत गठीत झालेल्या समितीने दक्षता समिती व इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षांचा अभ्यास करुन निरीक्षण केले असता असे आढळून आले की परीक्षा केंद्रावर सुकर वातावरण तयार करण्यासाठी त्या केंद्रावरील विद्युत व्यवस्था व्यवस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच समितीत परीक्षा केंद्रावर भरारी पथकाच्या माध्यमातुन नियंत्रण ठेवण्यासाठी व परीक्षा शांततेत होण्यासाठी त्या केंद्रावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सदस्यांचा समावेश करणे आवश्यक असल्यामुळे सदरची समिती पुनर्गठीत करण्याची शिफारस केली आहे. त्यान्वये “दक्षता समिती” चे पुनर्गठन करण्याची बाब शासनस्तरावर विराधीन होती.

        शासन निर्णय :-

इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षामध्ये होणारे गैरप्रकार टाळणे, सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पडतील असे सुकर वातावरण तयार करणे व सोबतच विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने “दक्षता समितीचे” पुनर्गठण करण्यात येत आहे. दिनांक ०९ फेब्रुवारी, २००२ च्या शासन पत्रान्वये स्थापन केलेल्या “दक्षता समितीत” खालील प्रमाणे

इयत्ता बारावी परीक्षे च्या भक्कम तयारीसाठी सराव प्रश्नमंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून

सुधारणा करण्यात येत आहे. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी परीक्षांसाठी दक्षता समितीची रचना खालीलप्रमाणे राहील.

दक्षता समितीः-

image 44

दक्षता समितीने जिल्हास्तरावर इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी परीक्षांसाठी परीक्षांचे प्रभावी आयोजनासाठी योग्य सहकार्य करावे. ज्या परीक्षा केंद्रावर कॉपीचे गैरप्रकार आढळून येताता अश्या केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथे योग्य व्यवस्था स्थापन करावी. तसेच इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुणवत्तापुर्ण वातावरणात होण्यासाठी दक्षता समितीने प्रभावी उपक्रम राबवावे.

इयत्ता बारावी बोर्ड प्रात्यक्षिक


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५११२४१४५२२३६७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

Vigilance Committee for SSC HSC Exam
Vigilance Committee for SSC HSC Exam

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण ३८२५/प्र.क्र.१३३/एसडी-२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२

Leave a Comment

error: Content is protected !!