दक्षता जनजागृती सप्ताहसाजरा करण्याबाबत
Vigilance Awareness Week

Vigilance Awareness Week

Vigilance Awareness Week

Dakshta Janjagruti Saptah

दक्षता जनजागृती सप्ताह
साजरा करण्याबाबत.

दि.२७ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर, २०२५

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्रमांकः दजस-२०२५/प्र.क्र.५७/विचौ-२

मंत्रालय, मुंबई – ४०००३२

दिनांक १४ ऑक्टोबर, २०२५

पहा :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः संकीर्ण-२००१/११२८/प्र.क्र.४३/०१/११-अ,

दिनांक : २२ ऑक्टोबर, २००१

परिपत्रक

राज्यात दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह (Vigilance Awareness Week) आयोजित करण्याचा निर्णय संदर्भाधीन दि.२२ ऑक्टोबर, २००१ च्या शासन आदेशान्वये घेण्यात आला आहे. यावर्षी दि.२७ ऑक्टोबर, २०२५ ते २ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे केंद्रीय दक्षता आयोगाने जाहीर केले आहे. या सप्ताहाकरीता यावर्षी आपली सामायिक जबाबदारी” (Vigilance: Our Shared Responsibility) ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. “दक्षता-

२. त्यानुसार राज्यातदेखील यावर्षी दि.२७ ऑक्टोबर, २०२५ ते २ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे (Vigilance Awareness Week) आयोजन करावयाचे आहे. या संदर्भात पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत-

अ) राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थांमार्फत वरील कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात यावे.

ब) दि.२७ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख किंवा ज्येष्ठतम अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी / कर्मचारी प्रतिज्ञा करतील. (प्रतिज्ञेचा नमुना सोबत जोडला आहे.)

क) प्रतिज्ञा केल्यानंतर मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येईल. (संदेशांच्या प्रती सोबत जोडल्या आहेत.)

ड) या सप्ताहाच्या निमित्ताने मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांचे संदेश राज्यातील जनतेसाठी प्रसृत करण्यात यावेत.

३. या सप्ताहाच्या निमित्ताने पुढीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे –

अ) कार्यालयांच्या दर्शनी भागात व सार्वजनिक ठिकाणी (जसे, रेल्वेस्थानक, बसथांबे, विमानतळे, इत्यादि) भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक भित्तिपत्रके / कापडी फलक/साईन बोर्ड लावण्यात यावेत. व्हॉट्सअॅप, इत्यादि इलेक्ट्रॉनिक समाजमाध्यमांचा, ई-मेल्स, एस.एम.एस. यांचाही जनजागृतीसाठी वापर करावा.ब) मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांतील मोक्याच्या ठिकाणी व्हेरीएबल मेसेज सिस्टिम बोर्डाद्वारे भ्रष्टाचार निर्मुलन जनजागृतीविषयक संदेश प्रसारीत करण्यात यावेत.

क) भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी कार्यालये/शाळा/महाविद्यालयांच्या स्तरावर वादविवाद स्पर्धा/व्याख्याने / निबंधस्पर्धा / कार्यशाळा/ चर्चासत्र/मुलाखती यांचे आयोजन करावे.

ड) भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक विशेष पुस्तिकांचे प्रकाशन व वाटप करावे.

इ) राज्यातील अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था, सामान्य नागरीक यांना दक्षता जनजागृती मोहिमेत मोठया प्रमाणावर/उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याकरीता आवाहन करावे. त्याकरीता पथनाट्ये /नाटिका, काव्यवाचन, इ. नाविन्यपूर्ण व आकर्षक योजना / कार्यक्रमांची आखणी करावी.

फ) राज्य शासनाचे सर्व विभाग, विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयांत भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृतीविषयक विविध स्पर्धा/ व्याख्याने /निबंधस्पर्धा इ. उपक्रमांचे आयोजन करावे.

४. या सप्ताहाच्या आयोजनासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करुन दिला जाणार नसल्याने प्रत्येक कार्यालयाने त्यांच्याकडील उपलब्ध निधीतूनच खर्च करावयाचा आहे.

५. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या आयोजनासंबंधीची जबाबदारी महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांनी सदर सप्ताहाचे आयोजन करुन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा.

६. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांनी या सूचना त्यांच्या आधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणाव्यात.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२५१०१४११०८३०८९०७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

सह सचिव, सामान्य प्रशासन विभाग

सोबत – सहपत्रे पीडीएफ प्रत लिंक

Vigilance Awareness Week
Vigilance Awareness Week

            प्रतिज्ञा

आपल्या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा प्रमुख अडथळा आहे असे मला वाटते. भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सरकार, नागरिक आणि खाजगी क्षेत्र या सर्व घटकांनी संघटितपणे काम करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते.

प्रत्येक नागरिकाने दक्ष राहायला पाहिजे आणि सदैव प्रामाणिकपणा व सचोटी यांच्या उच्चतम मानकांप्रती वचनबध्द असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरुध्द लढा देण्यासाठी साथ दिली पाहिजे याची मला जाणीव आहे.

म्हणून मी प्रतिज्ञा घेतो की :

जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन.

लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही.

सर्व कामे प्रामाणिकपणाने आणि पारदर्शक पद्धतीने करेन.

जनहितासाठी कार्य करेन.

व्यक्तिगत वागणूकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन.

भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन.

प्रतिज्ञा पीडीएफ प्रत लिंक

Vigilance Awareness Week
Vigilance Awareness Week

   हेही वाचा

दक्षता जनजागृती सप्ताह (Vigilance Awareness Week) साजग करण्यावावत.

दि.३१ ऑक्टोबर, ते ६ नोव्हेंबर

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२००१/११२८/प्र.क्र. ४३/०१/११-अ.
मंत्रालय, मुंबई

दिनांक: २२ ऑक्टोबर, २००१,

    शासन निर्णय :-

राज्यात गतवर्षी प्रथमच दि. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर, २००० या कालावधीत “दक्षता जागरुकता सप्ताह” (Vigilance Awareness Week) आयोजित करण्यात आला होता. जनतेमध्ये भ्रष्टाचाराबाबत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने सदर उपक्रम अत्यंत उपयुक्त सिध्द झाल्याने आता, प्रतिवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दि.३१ ऑक्टोबर या जन्मदिवसापासून एक आठवडा (दि. ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर) या कालावधीत “दक्षता जनजागृती सप्ताहाचे” (Vigilance Awareness Week) आयोजन करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करताना पुढे नमूद केलेल्या मार्गाचा अवलंब करण्यात यावा.

अ) गज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थामार्फत सप्ताहाचे आयोजन करण्यात यावे.

दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. विभाग/ कार्यालय प्रमुख किंवा उपस्थितांपैकी ज्येष्ठतम अधिकारी सर्वांना शपथ देतील. (शपथेचा नमुना सोबत जांडला आहे.)

क) शपथ घेतल्यानंतर मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येईन.

ड) या सप्ताहाच्या निमित्ताने मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांचा संदेश राज्यातील जनतेसाठी प्रमृत करण्यात यावा.

ड) या सप्ताहाच्या निमित्तानं पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

१. कार्यालयाच्या दर्शनी भागात व मोक्याच्या ठिकाणी भित्तीपत्रक, कापडी फलक लावणं.

२ कार्यालये/शाळा/महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चचर्चासत्र वादविवाद स्पर्धा/व्याख्याने/निबंध स्पर्धा/कार्यशाळा यांचे आयोजन करणे.

३.विशेष पुस्तिकांचे (Special Journal) प्रकाशन करणे.

  1. गज्यातील अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था, सामान्य नागरीक यांना दक्षता जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करणे.

५. केंद्रीय दक्षता आयोगाच्या

http://www.cvc.nic.in

या संकेतस्थळावर (Web-site) उपलब्ध साहित्याचा जनतेमध्ये वितरणासाठी उपयोग करणे.

याव्यतिरिक्त कार्यालयीन इमारतीच्या दर्शनी भागावर “भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधावा अशी सूचना व लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या स्थानिक कार्यालयाचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक लिहिलेला कायमस्वरुपी फलक लावण्यात यावा.

या सप्ताहाच्या आयोजनासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करुन देता येणार नसल्याने प्रत्येक कार्यालयाने त्यांच्याकडील उपलब्ध निधीतूनच खर्च करावा.

दक्षता जनजागृती सप्ताहाच्या आयोजनासंबंधीची जवाबदारी महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांच्यावर सोपविण्यात येत आहे. त्यांनी याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक

शासनाचे अपर मुख्य सचिव.

Vigilance Awareness Week
Vigilance Awareness Week

Leave a Comment

error: Content is protected !!