G20

G20 Summit

G20
विषय :- G20 summit दि. १९ ते २२ जून २०२३ दरम्यान पुणे येथे आयोजित होत असून त्याअनुषंगाने ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ या विषयावर लोकसहभागातून करावयाचे उपक्रम.
संदर्भ :- मा. सचिव, अतुल कुमार तिवारी, भा.प्र.से. भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्रमांक D.O./No.IC / 3 / 2023 0/0 DD (SNP) Date – 25th May 2023
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भारतीय तत्वज्ञानावर आधारित G20 summit दि. १९ ते २२ जून, २०२३ या दरम्यान पुणे येथे होणार आहे. त्यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हा विषय केंद्रस्थानी आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मिशन मोडमध्ये २०२६-२७ पर्यंत प्रत्येक बालकाला साध्य करणे, याची सुनिश्चिती करावयाची आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयात वाडी, वस्ती, तांडा, पाडया वरील प्रत्येक बालकास पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विहीत मुदतीत साध्य करुन द्यावयाचे असल्याने गुणवत्तापूर्ण पायाभूत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. त्यासाठी एक जनचळवळ होण्याची गरज आहे.
G20 summit जून २०२३ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या विविध विभागातंर्गत कार्यरत असणाया शाळांनी, शिक्षकांनी लोकप्रनिधींनी व समाजातील सर्व नागरिकांनी दि. १ जून २०२३ ते १५ जून २०२३ या कालावधीत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान केंद्रस्थानी ठेवून लोकसहभागातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे आहे. त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावयाचा आहे व उदयाची पिढी घडविण्यासाठीचे आपआपले कर्तव्य निभवावयाचे आहे.
G20 Summit
जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथ / माध्य / योजना ), शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी (मनपा/नपा) यांनी समन्वयाने दर दिवशी घ्यावयाचे तपशिलवार नियोजन व
सूचना सर्व सहभागी पर्यंत पोहचविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. विभागीय शिक्षण उपसंचालकांनी व संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांनी याबाबत सनियंत्रण करावे.
सोबत दिलेल्या नियोजनानुसार दर दिवशी जिल्हयातील प्रत्येक शाळा व गाव पातळीवर उत्स्फूर्त व सकारात्मकतेने कार्यक्रम राबवावे तसेच समाजमाध्यमांवरती योग्य ती प्रसिध्दी दयावी आणि ट्रॅकर मध्ये दर दिवशी घेतलेल्या उपक्रमांपैकी काही निवडक कार्यक्रमांचा तपशील सामायिक करावा. यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथ) जि. प. सर्व यांनी एक नोडल अधिकारी नियुक्त करुन त्यांना ही जबाबदारी दयावी.
ट्रॅकर लिंक
 
https://docs.google.com/spreadsheets/d/1J4-
RbEDm4wiG0fVzU3JGowmTFqDLoWa2sACMARFYdo8/edit?usp=sharing egl m&sharingactio
n=ownershiptransfer&ts=64771c8c
तद्वतच दिलेल्या सोबतच्या यु-टयूब लिंकचा वापर करुन
https://youtu.be/8OzerRQJmXg
 
https://youtu.be/kAcBtY7s2NM
 
https://youtu.be/1HhhPPhQJdA
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान च्या फिल्मस् जनचळवळ कालावधी दरम्यान सहभागींना दाखविण्यात याव्यात, तसेच PPT सादरीकरणामध्ये दिलेल्या विहीत नमुन्यामध्ये मिडीया टेप्लेटस नुसार स्थानिक वर्तमान पत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या बातम्या शेअर कराव्यात. समाजमाध्यमांवर फोटो, व्हिडीओ पोस्ट करतांना पुढील ठिकाणी टॅग करावे. @eduminofindia @SamagraShiksha @ncertindia @kesarkar_deepak @mahadgipr @scertmaha @nipunmaharashtra @nipunbharatmission @PIBMumbai @MahaSamagra
समाजमाध्यमांवर # चा वापर करुन प्रसिध्दी दयावी. 1. #G20janbhagidari
2.#G20Edu4all हे मान्य # आहेत.
G20 Summit
TARS प्रकल्पातंर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाकडून प्रस्तुत कामी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
 
 (शरद गोसावी)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

Leave a Comment

error: Content is protected !!