शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य असल्याबाबत TET Mandatory For Promotion

TET Mandatory For Promotion

TET Mandatory For Promotion

TET Mandatory For Promotion Teacher

Teacher Promotion TET is Mandatory

Regarding the Teacher Eligibility Test (TET) being mandatory for promotion from the teaching cadre.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

क्रमांक : संकीर्ण २०२५/प्र.क्र. ७९१/टीएनटी-१

दिनांक : १९ जानेवारी, २०२६.

विषय : शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असल्याबाबत.

संदर्भ:

१. सिव्हील अपील क्र. १३८५/२०२५ या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने पारीत केलेला दि. ०१.०९.२०२५ रोजीचा न्यायनिर्णय.

२. आपले पत्र क्र. प्राशिसं/निवेदन/टे-३०१/२०२५, दि. ०४.११.२०२५

महोदय,

संदर्भ क्र. १ येथील न्यायनिर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) व विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत शासन स्तरावरुन योग्य ते मार्गदर्शन मिळावे अशी विनंती संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये आपण केली आहे. सदर न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या पुढील कार्यवाही संदर्भात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा करण्यात आली आहे. याबाबतचे अभिप्राय अप्राप्त आहेत.

२. संदर्भ क्र. १ येथील न्यायनिर्णय पारीत झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षे कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) व विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर तुर्तास पदोन्नती देता येणार नाही. ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे, केवळ असेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत.

३. सदर पत्र विधि व न्याय विभागाचा अनौपचारीक संदर्भ क्र. २४५/२०२५/अ-शाखा, दि. ०६.०१.२०२६ अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या अभिप्रायानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

आपला

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

TET Mandatory For Promotion
शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य असल्याबाबत.
शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असल्याबाबत.

अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
दालन क्र. ४३९, चौथा मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,
मुंबई

प्रति,
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

Leave a Comment

error: Content is protected !!