महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ अंतिम उत्तरसूची TET ANSWER KEY

TET ANSWER KEY

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

MAHATET RESULT LINK शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी अंतिम निकाल घोषित
MAHATET RESULT LINK शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी अंतिम निकाल घोषित

महाटिइटी अंतिम निकाल लिंक

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५

  शुद्धीपत्रक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ पेगर । (इ. १ ली ते ५ वी) पेपर 1 (इ. ६ वी ते ८ वी) चा अंतरिम निकाल परिषदेच्या

http://mahatet.in

या संकेतस्थळावर दिनांक १६/०१/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला होता व सदर अंतरिग निकालावर दिनांक १६/०१/२०२६ ते दिनांक २१/०१/२०२६ पर्यंत गुणपडताळणी व आक्षेप मागविलेले होते.

त्यानुसार दिनांक १६/०१/२०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतरिम निकालावरील प्राप्त हरकतीनुसार पेपर १ मधील परिसर अभ्यास विषयातील प्रश्न क्रमांक संच १४७, संच १४२, संच १३७, संच १३२ बाबत आक्षेप प्राप्त झाल्याने तज्ज्ञ/समिक्षकांच्या अभिप्रायानुसार सदर प्रश्न रद्द करण्यात येत आहे. व त्यानूसार अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. याची संबंधित सर्व उमेदवार/परीक्षार्थींनी नोंद घ्यावी,

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे

स्थळ : पुणे
दिनांक : ०२/०२/२०२६

        शुध्दीपत्रक

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025

परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025
अंतिम उत्तरसूची

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि.19/12/2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक। व पेपर क्रमांक 2 च्यां प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि.27/12/2025 अखेरपर्यंत पाठविणेबाबत दि.19/12/2025 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून दि. 12/01/2026 रोजी अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली होती. तथापि अंतिम उत्तरसूचीमध्ये मुद्रण दोष (Printing Mistake) मुळे पेपर क्र.2 मधील वैकल्पिक विषय गणित व विज्ञान (सर्व माध्यम) संच D मधील, प्रश्न क्र. 107 चे । ऐवजी 2 हे उत्तर वाचण्यात यावे. याची सर्व संबंधित परीक्षाथीनी नोंद घ्यावी.

परिपत्रक पीडीफ लिंक

दि.14/01/2026
ठिकाण :- पुणे

(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०४

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 अंतिम उत्तरसूची शुध्दीपत्रक
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 अंतिम उत्तरसूची शुध्दीपत्रक

TET ANSWER KEY

MAHA TET EXAM 2025 Answer Key All Paper Set Code

MAHATET PARISHA 2025 UTTARSUCHHI

Exam Conducting BodyMaharashtra State Council of Examination, Pune (MSCE)
Exam NameMaharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET 20225)
Difficulty level for Paper 1Up to 8th Class
Difficulty level for Paper 2Up to 10th Class
Medium of ExamMarathi and English
Exam Helpdesk Number9028472681/82/83
Mode of ApplicationOnline
Official Websitehttp://www.mscepune.in
Answer Key Release Statushttps://mahatet.in
Maha TET Final Answer KeyNot Released
Release Date 19 December 2025
MAHA TET Answer Key Notice 19 December 2025
MAHA TET Final Answer Key Notice12th January 2026
MAHA TET Final Answer Key LINK
        प्रसिध्दीपत्रक

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025
परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि.19/12/2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक । व पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि. 27/12/2025 अखेरपर्यंत पाठविणेबाबत दि.19/12/2025 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
या अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET 2025 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याचीही संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.

दि. 12/01/2026
ठिकाण : पुणे
(अनुराधी ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०४

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५

    प्रसिद्धी निवेदन

शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३/११/२०२५ रोजी करण्यात आले होते.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२५ पेपर क्र. १ व पेपर क्र. २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या

या अधिकृत संकेतस्थळावर दि. १९/१२/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.

परीक्षेसाठी पेपर क्र. १ व पेपर क्र. २ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तरावाचत त्रुटी आक्षेप असल्यास परिषदेकडे दि. १९/१२/२०२५ ते दि. २७/१२/२०२५ अखेरपर्यंत पाठवता येतील, सदर आक्षेप त्रुटी बाबतचे निवेदन पुराव्यासह

या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील, आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

(विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४
स्थळ : पुणे
दिनांक : १९/१२/२०२५

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक २३ नोव्हेंबर २०२५

image 60
image 62

PAPER 2 (6th To 8th ) / पेपर १ ( पहिले ते पाचवी )

image 61
image 63

संच क्रमांक / SET CODE

संस्थेसाठी शिक्षकांच्या पगारातून ०५ % वेतन कपातीस मंजुरी द्यावी शिक्षण संस्था महामंडळाच्या बैठकीत ठराव संस्थेच्या विकासासाठी शिक्षकांच्या वेतनातून पाच टक्के कपात संस्थाचालकांनी शिक्षकांच्या कमाईवर डल्ला मारू नये नक्की वाचाल या ओळीला स्पर्श करून

1 thought on “महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ अंतिम उत्तरसूची TET ANSWER KEY”

  1. संस्थापक यांनी त्यांच्या महामंडळ मार्फत आंदोलन करून वेतनेत्तर अनुदान प्राप्त करावे. शिक्षक यांनी भरघोस दान दिले आहे काही ठिकाणी. झाकली मुठ सव्वा लखची.

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!