सन 2025-26 मधील विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) करिता शिक्षकांची यादी पाठविणेबाबत. विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन Teachers Training For Math science

Teachers Training For Math science

Teachers Training For Math science

Teachers Training For Math And science Teachers from Agastya International Foundation

Regarding sending the list of teachers for the Science and Mathematics Teacher Training Program (Agastya International Foundation for the year 2025-26.

Agastya International Foundation Kuppam, Bengaluru

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर, नागपूर

क्रमांकः राविनिसं / AFK/ 194/2026
दिनांक: 7/05/2026

प्रति,
मा. प्राचार्य,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व जिल्हे)
महाराष्ट्र राज्य

विषय :- सन 2025-26 मधील विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) करिता शिक्षकांची यादी पाठविणेबाबत.

संदर्भ
:- 1. सह. व्यवस्थापक, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन, कुप्पम), बंगलोर यांचे पत्र दि. 27/04/2026

  1. प्रकल्प समन्वयक, (महाराष्ट्र प्रमुख), अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन. यांचे सोबत दूरध्वनीवरून झालेली चर्चा
  2. अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन व शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमध्ये झालेला सामंजस्य करार, दि. 20/01/2026

उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने, अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन व शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमध्ये शिक्षक व शिक्षक प्रशिक्षक यांचे करिता विज्ञान व गणित विषयाच्या प्रशिक्षणाबाबत 5 वर्षांचा सामंजस्य करार पूर्ण झालेला आहे, त्या अनुषंगाने संदर्भ क्र.। नुसार सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात जुलै ते नोव्हेंबर 2026 या कालावधीत चार टप्प्यात व एकूण 8 batches मध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रातील एकूण 300 विज्ञान/ गणित शिक्षकांचे प्रशिक्षण घेणेबाबत कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, व खाजगी अनुदानित शाळांतील उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरातील इयत्ता 8,9,10 वी ला विज्ञान / गणित विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांकरिता व शिक्षक प्रशिक्षक यांचे करिता सन 2026-27 मध्ये चार दिवसीय निवासी स्वरूपाचा, प्रत्यक्ष अनुभव व ज्ञानरचनावादावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांचे अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन, कुप्पम, आंध्रप्रदेश येथे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षणाकरिता आपल्या प्रत्येक जिल्ह्यातून एकूण 10 शिक्षकांची नावे अपेक्षित आहेत. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे विभागनिहाय व जिल्हानिहाय नियोजन व वेळापत्रक या पत्रासोबत जोडले आहे. या वेळापत्रकात नमूद कालावधीसाठी आपल्या जिल्ह्यातील पुढील निकषात बसणाऱ्या व प्रशिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्या विज्ञान किंवा गणित विषयाच्या एकूण 10 शिक्षकांची यादी व माहिती खाली दिलेल्या विहित प्रपत्रात इंग्रजीमध्ये भरून दिनांक दि. 15.05.2026 पर्यंत या कार्यालयाच्या directorsise@gmail.com किंवा raanagpur@maa.ac.in या इ-मेल वर PDF व Excel sheet स्वरूपात पाठवावी.

Sr. No. Name of the Teacher Name of School Class /Grade Subject (Sci/Math) Qualification whatsapp No. Mob. No E.mail.

    प्रशिक्षणार्थी निवडीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत -
  1. अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन, कुप्पम, आंध्रप्रदेश येथे यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकाला पुन्हा निवडू नये
  2. इ. 8,9,10 वी ला विज्ञान किंवा गणित विषयाचे अध्यापन करणाय शिक्षक असणे अनिवार्य आहे. तसेच शिक्षकाची शैक्षणिक पात्रता एम.एस.सी/बी.एस.सी., बी.एड. असावी. उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त शिक्षकाची प्राधान्यक्रमाने निवड करावी.
  3. शासकीय, जि.प./न.प. / म.न.पा, खाजगी अनुदानित या शाळांतील शिक्षकांचीच निवड करावी.
  4. शिक्षक विज्ञान/गणित विषयाचे उत्कृष्ट काम करणारा असावा.
  5. शिक्षणातील नवीन संकल्पना स्वयंप्रेरणेने जाणून घेण्याची आवड असलेला तसेच अध्यापनात आधुनिक तंत्रांचा व शैक्षणिक साधनांचा वापर करणारा तंत्रस्नेही शिक्षक असावा.
  6. शिक्षकाचे वय साधारणतः 50 वर्षाच्या आत असावे.
  7. शिक्षकाची निवड करताना इन्स्पायर अवार्ड / विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मेळावे, विज्ञान नाट्‌योत्सव, विज्ञान व गणित विषयक विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये सहभागी असलेला तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेल्या शिक्षकाला प्राधान्य दयावे.
  8. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील एक विज्ञान किंवा गणित विषयाचे कार्य करणाऱ्या जेष्ठ अधिव्याख्याता किंवा अधिव्याख्याता यांची सदर प्रशिक्षणाकरिता निवड करावी. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या पुढील कार्याची जबाबदारी पूर्ण करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन, कुप्पम, आंध्रप्रदेश येथे प्रशिक्षण घेतलेल्या जेष्ठ अधिव्याख्याता किंवा अधिव्याख्याता यांना पुन्हा निवडू नये.

या प्रशिक्षणाकरिता दैनिक व प्रवास भत्ता (रू.3050/-) अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन यांचे कडून अदा करण्यात येणार असून त्याची प्रतिपूर्ती प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणाच्या ठिकाणी अदा केली जाणार आहे. एकदा निवड झालेल्या शिक्षकाची निवड रह केली जाणार नाही. याबाबत संबंधित शिक्षकाची लेखी संमती घेण्यात येऊन आपले स्तरावरून वरील प्रपत्रात माहिती सादर करावी.
अधिक माहिती करिता डॉ. नितु गावंडे, वरिष्ठ अधिव्याख्याता (मो.क्र. 9881018439) यांचेशी संपर्क साधावा.
संलग्न : वेळापत्रक व विभागनिहाय नियोजन

(डॉ. राज राजकुमार अवसरे)

संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था, (प्रादेशिक विद्या प्राधिकरण), नागपूर.
प्रतिलिपी,

  1. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर
  2. प्रकल्प समन्वयक, (महाराष्ट्र प्रमुख), अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन. यांना पुढील कार्यवाहीस्तव
  3. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व) म.रा. यांना उचित कार्यवाहीस्तव अग्रेषित.
सन 2025-26 मधील विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) करिता शिक्षकांची यादी पाठविणेबाबत. विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन Teachers Training For Math science
सन 2025-26 मधील विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) करिता शिक्षकांची यादी पाठविणेबाबत. विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन Teachers Training For Math science

Batchwise planning of training at Kuppam
कुप्पम येथील प्रशिक्षणाचे गट निहाय batchwise नियोजन
Proposed training dates (35-40 per batch) for the year 2026-27 (8 batches)
Proposed Dates for 4-day Training Program.
Sr. No. Batch No. Start Date End Date No.of Teachers Division Included Districts Included

Kuppam Training 79434 Kuppam Traini1
सन 2025-26 मधील विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) करिता शिक्षकांची यादी पाठविणेबाबत. विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन Teachers Training For Math science

Leave a Comment

error: Content is protected !!