Samruddhi Program For Teachers
Samruddhi Program For Teachers
Shikshak Samruddhi Karyakram
Regarding organizing Samruddhi Program (Year 2025-26) for secondary level teachers
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व कीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ,पुणे
दि. १४/०८/२०२५
जा.क्र.रारीसंप्रपम/कला व क्रीडा/समृद्धी कार्यक्रम/२०२५-२६/
प्रति,
१. उपसंचालक, प्रादेशिकविद्याप्राधिकरण, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, नाशिक, नागपूर.
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जि. प. (सर्व)
४. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई.
विषयः- माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम (सन २०२५-२६) आयोजन करणे बाबत…
संदर्भ:
१. NCERT नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त मार्गदर्शक सूचना (कला उत्सव) व ऑनलाईन बैठक दि.१८/०६/२०२५.
२. NCERT नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त मार्गदर्शक सूचना (समृद्धी कार्यक्रम) व ऑनलाईन बैठक दि.२५/०७/२०२५.
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार, माध्यमिक स्तरावर समृद्धी स्पर्धा हा राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सव कार्यक्रमाचाच विस्तारीत कार्यक्रम आहे. सदर कार्यक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने सन २०२५-२६ मध्ये आयोजित (दुसरे वर्ष) केला आहे. या अंतर्गत शिक्षकांना माध्यमिक स्तरावरील (इयत्ता नववी ते बारावी) अभ्यासक्रमाच्या क्षेत्रांवर सर्वोत्तम कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धती (best art integrated pedagogical practices) यावर आधारित सर्वोत्तम अध्ययन अध्यापन कृतींच्या सादरीकरणाची संधी मिळते. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP- २०२०) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-२०२३) या नुसार अभ्यासक्रमीय अध्ययनामध्ये कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धर्तीचा अवलंब करणान्या शिक्षकांचे योगदान ओळखणे आणि प्रोत्साहित करणे हा हेतू आहे. सदर समृद्धी कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येत असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ९वी ते इयत्ता १२वी च्या शाळांसाठी खुला आहे.
कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये –
१. वर्गातील उपक्रम, कृती यांचा थेट संबंध अध्ययनाशी असला पाहिजे.
२. अध्ययन अनुभवांमध्ये आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन असावा ज्याद्वारे एका अध्ययन अनुभवाचा सहसंबंध दुसऱ्या अध्ययन अनुभवाशी सहज जोडता येईल.
३. अध्ययन अनुभवांमध्ये चिकित्सक विचार व २१ व्या शतकातील कौशल्ये याचाही विचार असावा.
४. अभ्यासक्रमीय ध्येये साध्य करण्यासाठी अध्यापनात स्वदेशी हस्तकला, कला, खेळणी आणि स्थानिक संसाधने यांचे एकात्मिकरण करून अध्ययन अनुभव दिले पाहिजे.
५. सुलभक विविध सर्जनशील अध्यापनशास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यासाठी विविध वर्ग एकत्र करून व वर्गात्त विविध संघ तयार करून विविध अध्ययन अनुभवांची योजना करू शकतात.
६. सुलभक आनंददायी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रवृत्त करू शकतात.
७. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये कलेचा उत्पादन म्हणून नव्हे तर अध्ययनाची एक प्रक्रिया म्हणून विचार केला जावा.
८. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये सर्वसमावेशक शिक्षणासाठी वातावरण तयार करणे अपेक्षित आहे.
९. वर्गातील विविध अध्ययन अनुभव, कृती व उपक्रमांमध्ये स्थानिक संसाधनांच्या वापरास प्रोत्साहन दिले पाहिजे.
१०. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीनुसार विद्यार्थ्यांमध्ये एकात्मिक कला प्रकार आणि शिकवले जाणारे विषय किंवा संकल्पना या दोन्हीमध्ये अध्ययन उद्दिष्टांची संपादणूक झाली असली पाहिजे.
समृद्धी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची पात्रताः-
१. शासकीय, शासकीय अनुदानित किंवा केंद्रीय अथवा राज्य बोर्डाची संलग्न अशा कोणत्याही खाजगी शाळेतील इयत्ता नववी ते इयत्ता बारावी या इयत्ताना अध्यापन करणारे शिक्षक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
अन्य शासकीय संस्थांचे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उदाहरणार्थ (Tibetan School
२. Administration (CTSA), Demonstration, Multipurpose Schools (DMS). National Council of Educational Research& Training (NCERT), Railways, Border Security Force (BSF), Central Reserve Police Force (CRPF), Atomic Energy Commission, Army, Air Force, Cantonment Boards, Kasturba Gandhi Balika Vidyalaya (KGBV), etc., located in the State will participate at the district and state level competitions, along with the other schools of the States) सदर शाळा समृद्धी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
३. समृद्धी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शिक्षकांना किमान दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे.
४. सन २०२४ मध्ये राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या शिक्षकांना २०२५ मध्ये सहभाग घेता येणार नाही. माध्यमिक स्तरावर समृद्धी कार्यक्रमासाठी कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये शिक्षण
आधारित अध्ययन-अध्यापन करतांनाचे विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओ साधारणतः २० मिनिटे कालावधीचे असावेत च या व्हिडीओची ड्राईव लिंक व आवश्यक माहिती
https://forms.gle/ZAZUQ696XCGWGN5U6
या लिंकमध्ये भरून पाठविणे आवश्यक आहे. तसेच तयार केलेल्या व्हिडीओची लिंक दिलेल्या गुगल फॉर्मवर
https://forms. qle/ZAZUQ696XCGWGN5U6
पेस्ट करावयाचे आहे
समृद्धी कार्यक्रमासंदर्भात करावयाची कार्यवाही :-
सदर समृद्धी कार्यक्रमाच्या सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांनी आपले कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना निर्गमित करावेत. समृद्धी कार्यक्रमासाठी २० मिनिटांचा व्हिडीओ व पाठाचा ५०० शब्दांच्या मर्यादेत प्रकल्प आराखडा
https://forms.ale/ZAZUQ696XCGWGN5U6
या गुगल लिंक वर अपलोड करावा. तसेच समृद्धी कार्यक्रमाची माहिती ही या
https://forms.gie/ZAZUQ696XCGWGN5U6
लिंकवर भरावी, असेही आपल्या कार्य क्षेत्रातील शाळा व शिक्षक यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांनी सूचित करावे.
सदर प्रकल्प आराखडा NCERT, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये अपलोड करायचा आहे. समृद्धी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याचा कालावधी दि. १४ ऑगस्ट २०२५ ते दि. ०३/०९/२०२५ आहे. समृद्धी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम मुदत दि.०३ सप्टेंबर, २०२५ सायंकाळी ठीक ६.०० वाजे पर्यंत असेल, हे सुद्धा सूचित करण्यात यावे. तथापि सदर कार्यक्रमांत सहभाग घेणाऱ्या शिक्षकांनी सादर केलेल्या व्हिडीओला अक्सेस देणे आवश्यक आहे, असेही आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांचे मार्फत समृद्धी कार्यक्रमाच्या सूचना शालेय स्तरावर निर्गमित होत असल्याची खातरजमा करावी. तसेच उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्राचार्य डायट यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई व गट साधन केंद्र यांचा आढावा समृद्धी कार्यक्रम संदर्भात घ्यावा.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना राज्यस्तरावरून समृद्धी उपक्रमाचे प्राप्त व्हिडीओ जिल्हानिहाय वर्गीकरण करून पाठविण्यात येतील. जिल्हास्तरावर, जिल्हानिहाय प्राप्त व्हिडीओचे, आपले अधिकारी अथवा अन्य शिक्षणतज्ज्ञ परीक्षक यांचे मार्फत परीक्षण करून समृद्धी कार्यक्रमाच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्कृष्ट अध्ययन अध्यापन कृतींचा समावेश असलेल्या व्हिडीओं ची लिंक आपल्या विभागातील प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA) / जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना पाठवावेत.
तद्नंतर राज्यातील प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर, लातूर, नाशिक, पुणे यांना सदर समृद्धी कार्यक्रमांतर्गत प्राप्त व्हिडीओचे विभागस्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्यात यांचे मार्फत किंवा आवश्यक असल्यास परीक्षक नियुक्त करून परीक्षण करावयाचे आहे. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी समृद्धी कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागातून दोन उत्कृष्ट संघ अशी नामनिर्देशने परिषदेतील कला व क्रीडा विभागाच्या arts.sportsdept@maa.ac.in या ई-मेल, आय. डी. वर दि. ०९/०९/२०२५ पर्यंत पाठवावयाचे आहेत.
राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे (SCERTM) येथे समृद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावर आठ विभागाकडून प्राप्त १६ उत्तम अध्ययन अध्यापन कृर्तीच्या शिक्षक संघांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल.
जिल्हास्तरावर व विभागस्तरावर व्हिडीओचे परीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या परीक्षक यांचे मानधन, प्रवास भत्ता व अल्पोपहार सेवापूर्व विभाग, प्रस्तुत कार्यालय मार्फत Teacher Education Annual Grant मधून वितरीत केलेल्या आर्थिक तरतुदीमधून करण्यात यावा. या बाबत मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार,
समृद्धी राज्यस्तरावरील कार्यक्रमचे आयोजन दि.०१/१०/२०२५ (अंदाजे) या कालावधीत करण्यात येईल. समृद्धी कार्यक्रमांतर्गत राज्य स्तरावरील सादरीकरण करणाऱ्या उत्कृष्ट पाच संघास राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नामनिर्देशित केले जाईल. NCERT, नवी दिल्ली राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा माहे डिसेंबर, २०२५ मध्ये ०३ दिवसांकरीता आयोजित करणार आहे.
राज्यस्तरावर समृद्धी कार्यक्रमांतर्गत सादरीकरणासाठी उपस्थित राहणाऱ्या संघांना व शिक्षक यांना प्रवासभत्ता, निवास व भोजन याची व्यवस्था परिषदेतर्फे करण्यात येईल.
उपरोक्त सविस्तर माहिती आपल्या अधिनस्त सर्व कार्यालये व शाळांना देण्यात यावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील याची दक्षता घेण्यात यावी.
समृद्धी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व्हिडीओ राज्यस्तरावरून दिलेल्या लिंकवर पेस्ट करणे संबंधित मार्गदर्शक सूचना व अनुषंगिक प्रपत्रे सोबत जोडले आहेत त्याचे अवलोकन करून, त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी या संदर्भात सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचे सनियंत्रण करावे, पाठपुरावा करावा. या संदर्भात अधिक माहितीसाठी समृद्धी कार्यक्रमाच्या सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करण्यात यावे.
सोबत :- १. समृद्धी कार्यक्रम मार्गदर्शक सूचना (मराठी, हिंदी, इंग्रजी) व जिल्हास्तर, विभागस्तर
मूल्यमापन तक्ता.
२. समृद्धी कार्यक्रमासाठी सादर करावयाचा पाठचा प्रकल्प आराखडा नमुना (इंग्रजी, हिंदी)
(मा. संचालकांच्या मान्यतेनुसार)
उपसंचालक
सामाजिकशास्त्र, कला व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे-३०
प्रत माहितीस्तव सविनय सादर:-
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे- १
मा. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक) शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे- १
“समृद्धी-२०२५ ची संकल्पना”: “कलेद्वारे समावेशित शिक्षण”
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP२०२०) च्या दृष्टीकोनात समावेश व समानता यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
समृद्धी २०२५ मधील थीम म्हणजे: “Inclusive Education Through the Arts” है SEDG (Socio-Economically Disadvantaged Groups) साठी शैक्षणिक अडथळे दूर करण्यावर भर देते उदाहरणार्थ: मुली व महिला, SC/ST/OBC व अल्पसंख्यांक, दिव्यांग विद्यार्थी, दुर्गम भागातील विद्यार्थी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गातील मुले या दृष्टिकोनातून कला-एकात्मिक अध्यापन यामुळे शिक्षण अधिक अर्थपूर्ण, सर्वसमावेशक आणि प्रभावी बनवते
समृद्धी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सूचना
१. समृद्धी कार्यक्रमात दोन शिक्षक सहभागी होऊ शकतो. या मध्ये एक शिक्षक माध्यमिक स्तरावर इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी या इयत्तांना अध्यापन करणारे असावेत आणि दुसरे शिक्षक दृश्य कला संगीत, नृत्य, नाट्य या विषया बाबतचे अध्यापन करणारे असावेत.
२. समृद्धी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही शाखेतील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी त्तील विज्ञान, भाषा, गणित, मानव्यविद्या किंवा अन्य अभ्यास्क्रमातील अन्य कोणत्याही विषयावर
पाठाचा प्रकल्प आराखडा अगोदर सादर करावा लागेल. सदर पाठाचा प्रकल्प आराखडा तयार करतांना कोणत्याही ललित कला प्रकाराचा एकात्मिक वापर केला जावा. तसेच सदर प्रकल्प आराखडा कलात्मक अभिव्यक्तीच्या सौंदर्यशास्त्राशीही एकात्म असावा. प्रकल्प आराखडा संदर्भात सोबत जोडलेल्या व NCERT, नवी दिल्ली यांच्यावतीने निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करण्यात यावे.
३. सदर प्रकल्प आराखडा हा वर्गातील अध्ययन अध्यापन कृती (class room practice ) यांच्याशी संबंधित असावा. सदर प्रकल्प आराखडा सादर करतांना शाळेचा शिक्का व मुख्याध्यापाकांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र ही सोबत जोडावे.
४. दृश्यकला, संगीत, नृत्य, नाट्य या कलांचाही सादरीकरणांमध्ये एकात्मिक वापर केला जावा,
५. सादरीकरणात माहिती व तंत्रज्ञानाचा (ICT) वापर करता येईल.
६. सदर प्रकल्प आराखड्याचा write up किमान ५०० शब्दांच्या मर्यादेत असावा. सदर आराखड्यामध्ये अध्ययन अध्यापन कृतींची संपूर्ण प्रक्रिया व सदर सादरीकरणातील ठळक बाबी अधोरेखित केलेले असाव्यात. तसेच सदर आराखड्यामध्ये अध्ययन अध्यापनातील कृतींची छायाचित्रे व व्हिडीओच्या
ड्राईव्ह लिक्स सुधा नमूद करता येतील. सदर आराखडा सादर करताना इंग्रजी भाषेतील Times New
Roman या फॉन्टचा वापर केला जावा. फॉन्ट साईझ १२ असावी.
७. सदर प्रकल्प आराखड्याचे व सादरीकरणाचे माध्यम हिंदी किवा इंग्रजी भाषा असेल.
८. सादरीकरणांमध्ये जे अध्ययन अध्यापन साहित्य वापरले जाणार आहे त्याचा उल्लेख सदर प्रकल्प आराखड्यामध्ये असला पाहिजे, राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेसाठी प्रत्येक संघाकडे किमान तीन आणि जास्तीत जास्त सहा साहित्य (प्रॉप्स) असावेत. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त साहित्य (प्रॉप्स) वापरल्याने प्रतिकूल गुण देण्यात येतील.
९. विद्यार्थी सहभागाचा स्तर सुधा स्पष्टपणे नमूद करण्यात यावा.
१०. राष्ट्रीय स्तरावर सादरीकरणासाठी २० मिनिटांचा कालावधी व परीक्षकांशी प्रश्नोत्तरासाठी ०५ मिनिटांचा कालावधी असेल असा एकूण २५ मिनिटाचा कालावधी असेल.
११. समृद्धी कार्यक्रमाची संबंधित सर्व मार्गदर्शक सूचना, परिपत्रके, विविध फॉर्मस कला उत्सव च्या kalautsav.ncert.gov.in या कार्यालयीन संकेतस्थळावर नियमितपणे अद्यावत केले जातील. त्याचे वेळोवेळी अवलोकन व्हावे.
१२. पारितोषिक : राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघास २५,०००/-, द्वितीय क्रमांकाच्या संघास २०,०००/-, तृतीय क्रमांकाच्या संघास १५,०००/- रुपये पुरस्कार स्वरुपात देऊन सन्मानित करण्यात येईल. या शिवाय ५,०००/- रुपये अशी दोन विशेष बक्षीसे देखील दिली जातील. प्रत्येक पदासाठी बक्षीस रक्कम थेट पद धारण करणाऱ्या शिक्षकांच्या खात्यावर हस्तांतरित केले जाईल. सादर पुरस्कार रक्कम विजेत्या संघातील दोन्ही सदस्यास विभागून देण्यात येईल.
१३. राज्य नोडल अधिकरी यांनी राष्ट्रीय स्तरावरील समृद्धी स्पर्धेच्या पूर्वी किमान पंधरा दिवस आधी प्रमाणित केलेले प्रकल्प आराखडे, राष्ट्रीय स्तरावर सादर करणे आवश्यक असल्याने सर्व जिल्हा नोडल अधिकरी व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी वेळेत कार्यवाही करावी.