Swachhata Pakhwada स्वच्छता पंधरवडा २०२५

Swachhata Pakhwada

Swachhata Pakhwada

Swachhata Pandarvada 2025

Swachhta Fortnight 2025

swachhata shapath

Regarding the celebration of Swachhta Fortnight in schools and educational institutions from 16th to 30th September, 2025.

महाराष्ट्र शासन झालेय शिक्षण व क्रीडा विभाग
समग्र शिक्षा
निपुण भारत
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र.मप्राशिप/सशि/स्वच्छता पं./११/२०२५-२६/२४३१

दिनांक:- 6 AUG 2025

प्रति,
१. आयुक्त, महानगरपालिका सर्व.
२. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व.
३. मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपरिषद (सर्व)

विषय:- शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दि.१६ ते ३० सप्टेंबर, २०२५ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करणेबाबत.

संदर्भ:- केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.No.F.२७-२/२०२५-९-९, दि.३०/०७/२०२५

शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत सन २०१६ पासून दरवर्षी देशातील सर्व शाळांमध्ये स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत असते हे आपणांस ज्ञातच आहे. यासाठी शिक्षा मंत्रालयाच्या सबंधित स्वायत्त संस्थांच्या सहकार्याने आणि राज्यातील, जिल्हा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांच्या सहकार्यामुळे स्वच्छता पंधरवडा ही एक यशस्वी जन चळवळ निर्माण झाली आहे. यामध्ये प्रत्येक वर्षी लाखो मुले, इतर संस्था आणि इतर पदाधिकाऱ्यांचा सहभाग प्रामुख्याने दिसून येतो. त्यामुळे स्वच्छ भारत घडविण्यात शाळांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल शासनाच्या सर्वोच्च स्तरावर घेण्यात आली आहे.

२ सन २०२५ हे स्वच्छता पंधरवडा अंमलबजावणीचे सलग १० वे वर्ष आहे. मंत्रिमंडळ सचिवालय व आणि जलशक्ती मंत्रालय, (पेयजल व स्वच्छता विभाग), भारत सरकार यांनी उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये निर्गमित केलेल्या सन २०२५ च्या स्वच्छता पंधरवड्याच्या दिनदर्शिकेनुसार, स्वच्छता पंधरवडा दि.१६ ते ३० सप्टेंबर, २०२५ या कालावधीत नियोजन करण्यात आले आहे.

३ विद्यार्थी, शिक्षक व समाजाच्या सक्रिय सहभागाने शाळांमध्ये स्वच्छता अभियान व इतर संबंधित उपक्रम राबविण्यात यावेत, यासाठी शाळा/संस्थांनी दि.१६ ते ३० सप्टेंबर, २०२५ या कालावधीत खालीलप्रमाणे नमूद उपक्रम राबविणे.

I सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छतेबाबत शपथ घेणे, ज्यामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक/कर्मचारी यांना सहभागी करून घेणे,
I.शिक्षकांनी शाळा/संस्थेतील पाणी व स्वच्छता सुविधांची पाहणी करणे, पाणी, स्वच्छता व स्वच्छता सुविधांचे त्यरित मूल्यमापन करणे तसेच गरज भासल्यास सुविधांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी प्रस्ताय/आराखडा तयार करणे,
पालक-शिक्षक बैठकांमध्ये (PIMs) स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्त्व, हात धुण्याचे महत्त्य, जलसंधारण/रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात SMCs/SMDCS/PTAS किंवा पालक आणि शिक्षकांसोबत बैठकी घेणे आणि शाळेत तसेच घरात स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी चांगल्या पद्धती सुरू ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे.
IV. सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छ व सुव्यवस्थित परिसर व स्वच्छतागृहांच्या स्पर्धा आयोजित करणे,
V. निबंध घोषवाक्य/कविता लेखन, चित्रकला, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, मॉडेल मेकिंग शाळेतील स्वच्छता व स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करणे.
VI. स्वच्छता जनजागृती संदेश संस्था/शाळा/जिल्हा महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर दर्शविणे. शाळांमध्ये स्वच्छतेची छायाचित्रे लावणे.
शाळांमध्ये शाळा प्रशासनाकडून व शिक्षकांनी खालील नमूद उपक्रम राबविणे,
स्वच्छतेच्या अनुषंगाने टाकाऊ साहीत्यांची विल्हेवाट लावणे, वापरलेले मास्कची विल्हेवाट लावणे, तुटलेले फर्निचर, वापरात नसलेली उपकरणे, नादुरुस्त वाहने इत्यादी सर्व प्रकारचे टाकाऊ साहित्य शाळा/संस्थांच्या आवारातून पूर्णपणे काढून योग्य प्रक्रियेनुसार विल्हेवाट लावणे.
शाळेच्या आवारामध्ये प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालणे,

  1. शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने पंधरवडयाची संकल्पना कुटुंबातील सदस्यांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये त्याचा प्रसार व प्रचार करणे,
    IV. 3R (Reduce, Reuse and Recycling of waste) तत्त्वांचे पालन करून सिंगल युज प्लास्टिकचा वापर थांबविणे आणि प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याबाबत जनजागृती करणे.
    V. वारंवार वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची दैनंदिन साफसफाई व निर्जंतुकीकरण करणे.
    ५ स्वच्छता अभियानाला चालना देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी जिल्हा, तालुका, केंद्र व शाळा स्तरावर खालील उपक्रम हाती घेण्यात यावे.
    स्वच्छता व जलसंधारणाविषयी विद्यार्थी/ कर्मचारी व इतरांना प्रेरित करण्यासाठी दृकश्राव्य कार्यक्रम/जनजागृती साहित्य तयार करणे.
    स्वच्छता पंधरवडा प्रसिद्धी करण्यासाठी विभागीय/जिल्हा वेब पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक बॅनर तयार करून अपलोड करणे आणि सोशल मीडिया, तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचा वापर करून जनजागृती करणे.
    ६ सन २०२५ चा स्वच्छता पंधरवडा (दि.१६ ते ३० सप्टेंबर २०२५) साठी सुचविलेला कृती आराखडा हा परिशिष्ट ‘अ’ मध्ये दिलेला आहे. त्यानुसार दि.१६ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत स्वच्छता पंधरवड्यात विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्थानिक नागरिक व प्रतिनिधी इत्यादींचा सहभाग घेण्यात यावा व स्वच्छता पंधरवडा यशस्वी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून जिल्हा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा/शैक्षणिक संस्थांना आवश्यक त्या सूचना आपल्या स्तरावरून निर्गमित करणे.
    ०७ उपरोक्त स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची यशस्विता बघण्यासाठी आपणास विनंती करण्यात येते की, आपल्या जिल्हा/महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये उपक्रनिहाय स्वच्छता पंधरवडयात सहभागी झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या या कार्यालयास कळविणे. स्वच्छता पंधरवडयातील प्रत्येक दिवसाची छायाचित्रे, व्हिडिओ, चित्रपट इत्यादी गुगल ट्रॅकर (बेटा) आणि गुगल ड्राइव्ह (फोटो, व्हिडिओ आणि चित्रे) वर दररोज अपलोड करणे.
    ८ गुगल ट्रॅकर आणि ड्राइव्हचा तपशील सोबत दिला आहे.
    स्वच्छता पंधरवडा गुगल ट्रकर लिंक-
    स्वच्छता पंधरवडा गुगल ड्राइव्ह लिंक- आपणांस ई-मेलवर व What’s up वर कळविण्यात येईल.
    ९ गुगल ट्रॅकर दिनांक १४ सप्टेंबर, २०२५ ते दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत राबविण्यात आलेले विविध उपक्रमांसाठी दररोज रात्री ७.०० वाजेपर्यंत अद्ययावत केले जावे जेणेकरून जिल्हा महानगरपालिका शाळांची माहिती केंद्रशासनास एकत्रितपणे जलशक्ती मंत्रालयाला (पेयजल आणि स्वच्छता विभागास) कळविणे सुलभ होईल.
    १० जिल्हा/महानगरपालिकांच्या शाळांनी स्वच्छता पंधरवड्यामध्ये त्यांच्या सहभागाबाबत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल.
    ११ स्वच्छता पंधरवडा कालावधीमध्ये शाळांनी राबविण्यात आलेले स्वच्छता आणि स्वच्छतेशी संबंधित उपक्रम वर्षभर नियमित दिनचर्येशी जोडून सातत्यपूर्णपणे शाश्वत तत्त्वांनुसार शुरू ठेवण्यास प्रोत्साहित करण्यात यावे.
    उपरोक्त स्वच्छता पंधरवडयाच्या दि.१६ ते ३० सप्टेंबर, २०२५ या कालावधीत वेळापत्रकाप्रमाणे राबवावयाचे उपक्रम परिशिष्ट ‘अ’ मध्ये नमूद आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी.

राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प., मुंबई.

परिशिष्ट अ
शिक्षा मंत्रालय शालेय शिक्षण व साक्षरता विभाग

image 21
Swachhata Pakhwada

स्वच्छता पंधरवड्यासाठी सूचविलेल्या उपक्रमांचा कृती आराखडा (दिनांक १६-३० सप्टेंबर, २०२५)

१. दि.१६.९.२०२५ (मंगळवार) स्वच्छता शपथ दिवस
स्वच्छता शपथ कार्यक्रम आयोजित करणे ज्यामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी सहभागी होतील, विद्यार्थ्यांना स्वच्छतेबद्दल बोलणे आणि शपथ घेणे.
स्वच्छता जनजागृतीबाबतचे संदेश संस्था/ शाळांच्या संकेतस्थळावर पोस्ट करणे,
स्वच्छता पंधरवडा प्रसिद्धी करण्यासाठी विभागीय/जिल्हा वेब पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक बॅनर तयार करून अपलोड करणे आणि सोशल मीडिया, तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचा वापर करून जनजागृती करणे.
स्वच्छता शपथ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकरवर अपलोड करणे आणि गुगल ड्राइव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे.

२. दि.१७.९.२०२५ आणि दि.१८.९.२०२५ (बुधवार आणि गुरूवार)- स्वच्छता जनजागृती दिन
स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्त्व आणि हात धुण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती/शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती/पालक-शिक्षक समिती (SMCs/ SMDCS/PTAS) थी बैठक आयोजित करणे, पालक-शिक्षक बैठका (PTMs), पालक आणि शिक्षक दरम्यान जलसंधारण/रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि शाळा तसेच घरातील स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी प्रेरित करून त्यांना प्रोत्साहित करणे,
शिक्षकांनी शाळा / संस्थेच्या प्रत्येक भागातील स्वच्छतागृहांची पाहणी करून त्वरित मूल्यमापन करणे व सुविधांच्या देखभालीसाठी प्रस्ताव/आराखडा तयार करणे,
स्वच्छता सुविधांसाठी अनुकूलन (हात धुण्याची सुविधा, दैनंदिन स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, शौचालय वापर, पाणी सुविधेचा वापर, व्हेंटिलेशन, कचरा व्यवस्थापन इ.) स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा करणे यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी पुरेशी, स्वच्छ आणि स्वतंत्र स्वच्छतागृहे, साबण, हात धुणे आणि सुरक्षित पाणी, जंतुनाशक, सफाई कर्मचारी इत्यादींचा समावेश करणे,
जलजीवन मिशनच्या अनुषंगाने शाळेतील नळपाणी पुरवठ्याच्या जोडणीसाठी स्थिती तपासणी करणे,
सध्याचे जलशक्ती अभियान केंच द रेन, २०२५ मोहिमेच्या अनुषंगाने शाळेतील जलसंधारण यंत्रणेसंदर्भात स्थिती तपासणे आणि आराखडा तयार करून अंमलबजावणी करणे.
शाळेच्या आवारामधील स्वच्छतागृहे, MDM किचन, वर्गखोल्या, पंखे, दरवाजे, खिडक्या, झुडपे साफ करणे याची व्यापक स्वच्छता/निर्जंतुकीकरण करणे. शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक शिक्षण समिती (SMCS/PTAS) आणि स्थानिक प्रतिनिधींच्या सहभागाने स्थानिक समुदायास या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे.
जुन्या नस्त्या, कार्यपद्धतीनुसार नोंदी काढून टाकणे/नोंदविणे तुटलेले फर्निचर, निरूपयोगी उपकरणे, नादुरुस्त वाहने इत्यादी सर्व प्रकारचे टाकाऊ साहित्य शाळा/संस्थांच्या आवारातून पूर्णपण
गुगल ट्रॅकरवर सहभागी झालेल्या शाळांची संख्या आणि गुगल ड्राइव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी साहित्य अपलोड करणे.
३ दि.१९.९.२०२५ (शुक्रवार)- ग्रीन स्कूल दिन Green School Day
शालेय विद्यार्थ्यांना जलसंधारण, प्लॅस्टिक वापर टाळणे इत्यादी विविध विषयांवर कल्पक दृष्टीकोनातून घोषणा, पोस्टर्स आणि पत्रके आणण्यास सांगणे, तद्नंतर
शाळेच्या प्रदर्शनात आणि गाव/शहराच्या नितींवर/शाळेच्या आवारात प्रदर्शित करणे.
शालेय विद्यार्थ्यांना जलसंधारणाची माहिती देणे. पाणीटंचाईच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करणे. पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे रक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे, प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज किमान एक लिटर पाण्याची बचत करण्यासाठी प्रोत्साहीत करणे, विद्यार्थ्यांना घर आणि शाळेत पाण्याचा काटकसरीने वापर आणि कमीत कमी पाण्याचा अपव्यय करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकरवर अपलोड करणे आणि गुगल ड्राइव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे.
४ दि. २०.९.२०२५ आणि दि.२१.९.२०२५ (शनिवार आणि रविवार)- समुदाय परिसरातील भेट दिवस
सर्व शिक्षकांनी आजूबाजूच्या गावांना भेट देऊन स्वच्छतेबाबत स्थानिक समुदायांना संबोधित करणे, शौचालयाचा वापराबाबत विशेष लक्ष केंद्रित करणे आणि त्यांच्या भागात कचरा व्यवस्थापनाचे काम हाती घेणे, जलस्रोतांचा अपव्यय रोखण्यासाठी आणि जलसंधारण सुरू असलेल्या जलशक्ती अभियानाविषयी जागरूकतता करण्यासाठी ते स्थानिक समुदायास जागरूक करणे.
प्रत्येक शाळांमध्ये शिक्षक दिन योग्य पद्धतीने साजरा करणे.
शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने स्वच्छता पंधरवडयाची संकल्पना स्थानिक भागातील जनतेपर्यंत पोहोचविणे.
गुगल ट्रॅकरवर समुदाय परिसरातील उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांची संख्या आणि गुगल ड्राइव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी साहित्य अपलोड करणे.

५ दि.२२.९.२०२५ आणि दि.२३.९.२०२५ (सोमवार आणि मंगळवार)- हात धुणे दिवस
दैनंदिन जीवनात योग्य प्रकारे हात धुण्याच्या गरजेबद्दल जनजागृती निर्माण करणे.
विद्यार्थ्यांना साबणाने हात धुण्याची वेळ खाण्याआधी आणि नंतर हाल घुण्यांबाबतच्या योग्य पद्धती, त्यांची टप्पे, हातांच्या हालचाली इत्यादिबाबत शिकविणे,
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अडथळा विरहीत पिण्याचे पाण्याची आणि स्वच्छतागृहाच्या सुविधांचा आढावा घेऊन खात्री करणे.
विद्यार्थ्यांना पाण्याचा अपव्यय रोखण्याविषयी तपासणीच्या पध्दती शिकविणे,
हात धुण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग शाळेच्या बागेत वळविणे.
विद्यार्थ्यांना जलजन्य आजार/पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी याविषयी शिकविणे जेणेकरून ते योग्यरितीने हात आणि तोंड स्वच्छतेने धुण्याचा सराव करतील.
सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकरवर अपलोड करणे आणि गुगल ड्राइव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे.
६ दि.२४.९.२०२५ आणि दि.२५.९.२०२५ (बुधवार आणि गुरुवार) स्वच्छता सहभाग दिन
शाळांमधील परिसर स्वच्छ आणि स्वच्छतागृह सुव्यवस्थित ठेवणेबाबत जिल्हा/गटसाधन केंद्र आणि केंद्रस्तरावर स्पर्धा आयोजित करणे.
निबंध, घोषणा, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, चित्रकला, नाटक, कविता, घोषवाक्य लेखन स्पर्धा आणि स्वच्छताविषयक मॉडेल मेकिंग स्पर्धांचे आयोजन करणे,
स्वच्छतेवर चर्चासत्राचे आयोजन करणे,
सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकरवर अपलोड करणे आणि गुगल ड्राइव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे, ७. दि.२६.९.२०२५ (शुक्रवार) वैयक्तिक स्वच्छता दिन
शालेय विद्यार्थी/कर्मचारी व इतरांना स्वच्छता राखण्यासाठी प्रेरित करण्यासाठी दृकश्राव्य स्वरूपात उपक्रम दाखविण्यात यावे.
विद्यार्थ्यांना योग्य पध्दतीने नखे कापण्याची आणि स्वच्छ ठेवण्याची पध्दत शिकविणे, दररोज स्वच्छ पाण्याने आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, उघड्यावर भुंकू नये, बूट/चप्पल घालणे इत्यादी (तसेच मास्क योग्य प्रकारे लावणे, हात न मिळविणे, श्वसनाची स्वच्छता, वैयक्तिक वस्तू इतरांशी सामायिक न करणे) याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देणे.
विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य प्रकारे स्वच्छतागृहे वापरण्याची आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचा स्वच्छ वापर करण्याची पध्दत शिकविणे.
विद्यार्थ्यांना दिवसातून दोन वेळा नियमित दात घासण्याचे महत्त्व समजून सांगून त्यांना दैनंदिन सवयीचा नियमित भाग बनविणे,
सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकरवर अपलोड करणे आणि गुगल ड्राइव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे,
८ २७.९.२०२५ (शनिवार)- स्वच्छता शाळा प्रदर्शन दिन
विद्यार्थ्यांनी स्वच्छता उपक्रमांवर केलेले निबंध घोषवाक्य/कविता लेखन, चित्रकला, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, मॉडेल मेकिंग फोटो, व्यंगचित्रे इत्यादि शाळा आणि जिल्हा व महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करणे,
जिल्हा व महानगरपालिकांनी प्रदर्शनांचे दस्ताऐवजीकरण करणे.
स्थानिक स्तरावरील साहित्य वापरून स्थानिक कौशल्यांचा वापर करून कलात्मक कचरा पेटी तयार करून कचरा स्वच्छता साठवणुकीसाठी वापर करणे.सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकरवर अपलोड करणे आणि गुगल ड्राइव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे,
९ दि.२८.९.२०२५ आणि दि.२९.९.२०२५ (रविवार आणि सोमवार)- स्वच्छता कृती आराखडा दिवस
समग्र शिक्षा व पीएमश्री योजनेअंतर्गत शाळेच्या स्वच्छता कृती आराखड्याबद्दल विद्यार्थी, पालक आणि स्थानिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती (SMCs) आणि शालेय विकास समिती (SDMs) बैठकीचे आयोजन करणे.
बालसंसद/शालेय मंत्रिमंडळाच्या छोटया गटांच्या बैठकीचे आयोजन करणे व शाळेतील स्वच्छता पंधरवडा उपक्रमांवर चर्चा करणे.
स्वच्छता पंधरवड्यातंर्गत कोणते नवीन उपक्रम समाविष्ट केले जाऊ शकतात याबद्दल समाजबांधव आणि विद्यार्थ्यांना सूचना करण्यास प्रोत्साहित करणे आणि अशा सूचना राज्य व केंद्र शालेय शिक्षण व साक्षरता विभाग (DOSEL) व शिक्षा मंत्रालय (MoE) यांचेकडे पाठविणे.
सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकरवर अपलोड करणे आणि गुगल ड्राइव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे.
१० दि.३०.९.२०२५ (मंगळवार)- पारितोषिक वितरण दिन
स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला, निबंध, वादविवाद, प्रश्नमंजुषा, घोषणा, आंतरशालेय व शिल्पकला, मॉडेल मेकिंग इत्यादी स्पर्धामध्ये सहभागासाठी मुले, शिक्षक व पालकांकरिता पारितोषिक वितरण करणे.स्वच्छता पंधरवड्याकालावधीत राबविण्यात आलेले उपक्रम आणि उपक्रमाचा अहवाल सर्व शाळा/शैक्षणिक संस्थांनी जिल्हा व महानगरपालिकांच्या संकेतस्थळावर म्हणजेच सार्वजनिक डोमेनमध्ये अपलोड करण्यात यावा.
सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकरवर अपलोड करणे आणि गुगल ड्राइव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे,

image 20
Swachhata Pakhwada

GOVERNMENT OF INDIA
MIMETRY OF EDUCATION
DEPARTMENT OF SCHOOL EDUCATION & LITERACY
SHASTRI BHAVAN
भारत सरकार शिक्षा मंत्रालय स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शास्त्री भवने नई दिल्ली 110 115
Archana Sharma Awasthi
Joint Secretary
Tel. No. 011-23386232
Email: js-ss1.ae@gov.in
D.O.No. F.27-2/2025-15-9
Dated: 30 July, 2025
Dear Sir/Madam,
As you are aware, this Department has been observing Swachhata Pakhwada every year since 2016 in all the schools of the country. With the exemplary support of the States & UTs and Autonomous organizations of Ministry of Education (MoE), Swachhata Pakhwada of this Department has become a successful mass movement with the annual participation of millions of children and other functionaries besides members of the community. Role of the schools in ushering in a Clean India has been recognized at the top most levels of the Government.
2 The year 2025 would be the 10th consecutive year of Swachhata Pakhwada implementation. As per the Calendar of Swachhata Pakhwada for the year 2025 circulated by Cabinet Secretariat and Ministry of Jal Shakti, (Department of Drinking Water & Sanitation), Government of India, the Swachhata Pakhwada for this Department is scheduled from 16-30 September, 2025.
3 For observing the Swachhata Pakhwada in a befitting manner for focused participation resulting in cleanliness, sanitation and hygiene drive and other related activities in schools with active involvement of students, teachers and community, the schools/ institutions may be instructed to undertake the following suggestive participatory activities during 16h-30th September, 2025.
Swachhata Shapath may be organised in all schools and educational institutions, wherein all students and teachers/staff may participate and take pledge.
ii. Teachers to inspect water and sanitary facilities in school institutions do a quick assessment of water, sanitation and hygiene facilities and make proposal plan for repair and upkeep of the facilities, if required
Holding meeting of SMCs/ SMDCs/ PTAs or between parents and teachers in the first week of the Pakhwada to highlight the importance of cleanliness & sanitation, importance of Hand-washing, promote water conservation/ Rain Water Harvesting practices during the Parent-Teacher Meetings (PTMs); and to encourage and inspire them to continue with the good practices for hygiene and sanitation in school as well as home.
iv. Competitions for clean and well-maintained premises and toilets in schools.

संपूर्ण परिपत्रक पीडीएफ मध्ये वाचा या ओळीला स्पर्श करून

Swachhata Pakhwada
Swachhata Pakhwada

Leave a Comment

error: Content is protected !!