Summer Camp Organized Under Eco Clubs for Mission Life

Summer Camp Organized Under Eco Clubs for Mission Life

image 2
Summer Camp Organized Under Eco Clubs for Mission Life

महाराष्ट्र शासन

sciencedepta maa.ac.in

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे

व्य.क.रारीसंप्रपम/वि.वि/ECO club/२०२४/०२४६९

२७/०५/२०२४

प्रति, विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग), शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.), (सर्व जिल्हे), शिक्षण निरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) मुंबई, शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी (सर्व म.न.पा./न.पा.)

विषय :- Eco clubs for Mission Life अंतर्गत आयोजित करावयाच्या उन्हाळी शिबिराबाबत….

Regarding the Summer Camp to be Organized Under Eco Clubs for Mission Life

संदर्भ :- १. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.०१/०५/२०२४.

२. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी ऑनलाईन बैठकीमध्ये दिलेल्या सूचना दि.२२/०५/२०२४.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार भविष्यात चांगले यशस्वी आणि नवोपक्रमशील नागरिक बनण्यासाठी सर्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कौशल्ये आणि क्षमता विकसित होणे गरजेचे आहे. या कोशल्यामध्ये पाणी व नैसर्गिक संसाधने यांचे जतन, स्वच्छता इ.च्या अनुषंगाने पर्यावरण जाणीवजागृती विकसित करणे ही महत्वाची क्षमता आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत शाळेतील इको क्लब ही एक योजना असून या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित करणे, सद्यस्थितीतील पर्यावरणीय समस्या जाणून घेणे. सकारात्मक दृष्टीकोन आणि पर्यावरण संरक्षणाकरिता अभिवृत्ती विकसित करणे या उद्देशाने पर्यावरण पूरक शैक्षणिक कृर्तीचे आयोजन करण्यात येते. सन २०२१ मध्ये COP२६ या हवामान बदल या विषयावर झालेल्या परिषदेमध्ये LIFE (Lifestyle for Environment) ही संकल्पना मांडण्यात आली आहे. मिशन लाईफ ही शाश्वत जीवनशैली पर्यावरण जतन करण्यासाठी उपलब्ध संसाधनाचा योग्य वापर या बाबींना प्रोत्साहन देणारी जागतिक स्तरावरील चळवळ आहे.

उपरोक्त संदर्भिय विषयांन्वये इको क्लब अंतर्गत Eco clubs for Mission Life या थीम वर आधारित शाळेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक पर्यावरण दिन दि.५ जून २०२४ रोजी उन्हाळी शिबीर सुरु होईल या दृष्टीने नियोजन करून एकूण सात दिवसांचे उन्हाळी शिबिर आयोजित करावे, एक आठवड्याचे उन्हाळी शिबीर आयोजित करत असताना जागतिक पर्यावरण दिन २०२४ थीम Land restoration, desertification and drought resilience आणि मिशन लाईफ अंतर्गत आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, शाश्वत अन्नप्रणाली स्वीकारणे, ई-कचरा कमी करणे, कचरा कमी करणे, उर्जा बचत करणे, पाणी बचत करणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या सात थीमवर आधारित शैक्षणिक कृती /उपक्रमांचे नियोजन करावे.

उन्हाळी शिबिरामध्ये घ्यावयाच्या काही मार्गदर्शक ठरतील अशा शैक्षणिक कृती/उपक्रम सोबत जोडलेल्या आहेत. उन्हाळी शिबिराचे आयोजन करताना या शैक्षणिक कृती/उपक्रम सोबतच सौर उर्जासारख्या नवीकरणीय उर्जा स्रोत, स्थानिक परिसंस्थेमधील पाण्याचे स्रोत, पाण्याची शुद्धता तपासणे, पाण्याचे जतन आणि वृक्ष लागवड इ. विषयांना अधिक महत्त्व देण्यात यावे. या शिबिरांना प्रसिद्धी देण्यासाठी शाळेमध्ये पोस्टर, वादविवाद आणि पेंटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या पर्यावरणतज्ञ, आणि अशासकीय संस्था यांचे आवश्यकतेनुसार या शिबिरासाठी सहकार्य घेण्यात यावे.

राज्य स्तरावरून विभागीय शिक्षण उपसंचालक यांची विभागीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील जास्तीत जास्त शाळापर्यंत उन्हाळी शिबीर आयोजित करणेसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच सदर उपक्रमाचा आढावा केंद्र शासन स्तरावरून घेण्यात येणार असल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या विभागातील उन्हाळी शिबीर आयोजित करणाऱ्या जिल्ह्यानिहाय शाळा आणि विद्यार्थ्यांची सांख्यिकीय माहिती/अहवाल प्रस्तुत कार्यालयास पाठवावा.

राहूल रेखावार/भा.प्र.से) ( संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे- ३०

उन्हाळी शिबिर मार्गदर्शक सूचना

शाळेमध्ये उन्हाळी शिबीर आयोजित करण्यासाठी काही सुचविलेल्या कृती

शाळेमध्ये उन्हाळी शिबीर आयोजित करण्यासाठी विद्यार्थ्याचा स्तर विचारात घेवून शाळांनी पुढील कृती घ्याव्यात.

आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे

संपूर्ण मार्गदर्शक सूचना वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

सदर परिपत्रक पीडीएफ मध्ये डाउनलोड करण्यासाठी फक्त आवडीला स्पर्श करा

1 thought on “Summer Camp Organized Under Eco Clubs for Mission Life”

Leave a Comment

error: Content is protected !!