Strict Implementation Of Tribhasha Sutra राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे व इतर कार्यालये यांमध्ये त्रिभाषा सूत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत

Strict Implementation Of Tribhasha Sutra

IMG 20250526 175200
Strict Implementation Of Tribhasha Sutra

Strict Implementation Of Tribhasha Sutra

implementation of the three-language formula

Marathi Language Department
Regarding strict implementation of the three-language formula in central government offices, banks, insurance companies, railways and other offices in the state.

राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे व इतर कार्यालये यांमध्ये त्रिभाषा सूत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत.

दिनांक : २६ मे, २०२५

वाचा :-
१. शासन परिपत्रक, मराठी भाषा विभाग क्र. मभावा-२०१६/प्र.क्र.८२/भाषा-२, दि. ०५.१२.२०१७
२. विभागाचे अर्धशासकीय पत्र क्र. मभावा-२०१८/प्र.क्र.१०९/२०१८/भाषा-२, दि. १०.०६.२०१९
३. शासन परिपत्रक, मराठी भाषा विभाग क्र. मभावा-२०१९/प्र.क्र.६६/भाषा-२, दि. ०६.११.२०२०

प्रस्तावना :-
महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ मधील तरतुदींनुसार “मराठी” ही राज्याची राजभाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे इत्यादींमध्ये इंग्रजी व हिंदीसोबत मराठी भाषेचा वापर करणेबाबत वाचा येथील दि. ०५.१२.२०१७ रोजीच्या परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर कार्यालयांमध्ये इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठी भाषेच्या वापराबाबत पाठपुराव्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्याबाबत दि. १९.०६.२०१९ रोजीच्या मा. मुख्य सचिव यांच्या स्तरावरील पत्रान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

तसेच, त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या इ. कार्यालयांमध्ये मराठी भाषेच्या वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कशा प्रकारे कार्यवाही करावयाची याबाबत देखील सर्वसमावेशक अशा सूचना वाचा येथील दि. ०६.११.२०२० रोजीच्या शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आहेत.

तथापि, राज्यातील बँकिंग, दूरध्वनी, टपाल, विमा, रेल्वे, मेट्रो, मोनो रेल, विमान प्रवास, गॅस, पेट्रोलियम, कराधान इ. सेवा पुरविणारी कार्यालये, केंद्र शासनाची अन्य कार्यालये इ. मध्ये त्रिभाषा सूत्रानुसार कार्यवाही होत नसलेबाबत अनेकदा शासनास विविध माध्यमांतून तक्रारी प्राप्त

होत असतात. याबाबत मा. लोकप्रतिनिधी यांचेमार्फत देखील वेळोवेळी सूचना करण्यात येतात. तसेच, याबाबत लेखा आक्षेप देखील उपस्थित करण्यात आलेला आहे. सबब, त्रिभाषा सूत्राच्या काटेकोर अंमलबजावणीच्या अनुषंगाने पुनःश्च एकदा सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक :-

त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने वाचा येथील शासनपत्र व परिपत्रके यांद्वारे देण्यात आलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्ह्यातील केंद्र शासनाची सर्व कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे व अन्य कार्यालये यांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर करण्यात येतो किंवा कसे, याबाबत पडताळणी करावी. सदर कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात येतो किंवा कसे, याबाबतचे स्वयंघोषणापत्र संबंधित कार्यालयाकडून विहित नमुन्यात घ्यावे. सदर स्वयंघोषणापत्र उपरोक्त नमूद कार्यालयांनी दर्शनी ठिकाणी सूचनाफलकावर प्रदर्शित केले आहे किंवा कसे, याबाबत देखील या कामासाठी जिल्हा व तालुका स्तरावर नेमलेल्या समन्वय अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेण्यात यावा.

जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की, वाचा येथील दि. ०६.११.२०२० रोजीच्या परिपत्रकासोबतच्या तपासणी सूचीनुसार सदर स्वयंघोषणापत्र नसल्यास तपासणीसूचीनुसार स्वयंघोषणापत्र सादर करणेबाबत संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करावा. तसेच, पी.जी पोर्टल व आपले सरकार प्रणाली व इतर माध्यमांतून मराठी भाषेचा वापर होत नसलेबाबत प्राप्त तक्रारींचे वेळीच निराकरण होण्याच्या अनुषंगाने देखील संबंधितांकडे पाठपुरावा करावा.

तपासणी सूचीतील सर्व मुद्दयांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हा स्तरावरील पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकांना संबंधित केंद्र शासनाच्या कार्यालयांमधील कार्यालय प्रमुखांना आमंत्रित करुन त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेच्या वापराबाबत त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करावी.

भाषा संचालक यांनी देखील वाचा येथील दि. ०६.११.२०२० रोजीच्या परिपत्रकासोबतच्या तपासणी सूचीनुसार सर्व मुद्दयांबाबतचा अहवाल सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त होतो किंवा कसे, याबाबत आढावा घेऊन, ज्या जिल्हाधिकारी यांचेकडून तपासणीसूचीनुसार अहवाल प्राप्त होत नाही, त्यांचेकडे पाठपुरावा करुन सदर अहवाल प्राप्त करुन घ्यावा व विहित कालावधीमध्ये शासनास सादर करावा.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharara.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२५०५२६१३१२४२७१३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

(सह सचिव, महाराष्ट्र शासन)

महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग शासन परिपत्रक क्र. मभावा-२०२५/प्र.क्र.९५/भाषा-२
नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई

IMG 20250526 174300
Strict Implementation Of Tribhasha Sutra

Leave a Comment

error: Content is protected !!