Std 5th 8th Scholarship Exam final results merit list Link

Std 5th 8th Scholarship Exam final results merit list Link

IMG 20250710 061559
Std 5th 8th Scholarship Exam final results merit list Link

Std 5th 8th Scholarship Exam final results merit list Link

Pre-Upper Primary (5th standard) and Pre-Secondary Scholarship Examination (8th standard), Dated 09th February, 2025 Brief information regarding final results and merit list

महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

     प्रसिध्दीपत्रक

पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी), दि. 09 फेब्रुवारी, 2025
अंतिम निकाल व गुणवत्ता यादीबाबतची संक्षिप्त माहिती

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8. वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या बुधवार दि. ०१ जुलै, 2025 रोजी सायं 06.00 वाजता परिषदेच्या
Website:

www.mscepune.in

https://puppssmsce.in

या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षेची सांख्यिकीय माहिती खालीलप्रमाणे आहे.

IMG 20250710 063640
Std 5th 8th Scholarship Exam final results merit list Link

दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक 25/04/2025 रोजी जाहीर करण्यात आला होता. दि. 25/04/2025 ते 04/05/2025 या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

IMG 20250710 063759
Std 5th 8th Scholarship Exam final results merit list Link

अंतिम निकाल प्राप्त करणे –

सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या

www.mscepune.in

https://puppssmsce.in

या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक व आईचे नाव टाकून पाहता येईल तसेच शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्याध्यर्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल. तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र त्याच्या बैंक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता / डाऊनलोड करता येणार नाही. परंतु संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) पाहता येईल.

संकेतस्थळावरील प्रसिध्द करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक

माहितीच्या Links खालीलप्रमाणे-

  1. अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी)
  2. गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय)
  3. शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय / तालुकानिहाय)
  4. संचनिहाय कटऑफ (जिल्हानिहाय / तालुकानिहाय)

विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रिय अधिकाऱ्यांना वरीलपैकी कोणत्याही हव्या असलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती प्राप्त (DOWNLOAD) करून घेता येईल.

गुणवत्ता यादीत कोणाचा समावेश नाही

  1. शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडा गुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्यार्थी
  2. मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून (अनधिकृत शाळांमधून) परीक्षेस प्रविष्ठ झालेले विद्यार्थी.
  3. विहीत कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक क्याचे विद्याथी,
  4. परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थी,
  5. आवेदनपत्र न भरता परीक्षेस ऐनवेळी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांपैकी शुल्क न भरलेले विद्याथी.

गुणपत्रक / प्रमाणपत्रावावत –

परिषदेने संकेतस्थळावर अंतरिम (तात्पुरते) गुणपत्रक दि. 25 एप्रिल, 2025 रोजी व अंतिम गुणपत्रक

व प्रमाणपत्र दि. ०१ जुलै, 2025 रोजी उपलब्ध करून दिलेली आहे.

  1. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून गुणपत्रक व प्रमाणपत्राची डिजिटल प्रत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शाळेने त्याची उत्तम प्रतीच्या कागदावर रंगीत प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरीत करावी तसेच डिजिटल प्रतीची सॉफ्ट कॉपी मागणीनुसार उपलब्ध करून द्यावी.
  2. गुणपत्रकाची डिजिटल प्रत देण्यात आलेली असल्याने छापील गुणपत्रक वितरीत केले जाणार नाही.
  3. शाळेने सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या डिजिटल प्रती कायम स्वरूपी जतन करुन ठेवाव्यात व विद्यार्थी / पालकांच्या मागणीनुसार उपलब्ध करून द्याव्यात. केवळ शिष्यवृत्तीधारक व राज्य गुणवत्ता यादीतील विद्याथ्यांची रंगीत छापील प्रमाणपत्रे यथावकाश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई यांचेमार्फत संबंधित शाळांना उपलब्ध करुन दिले जातील.

महत्त्वाचे

  1. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या एकूण प्राप्त गुर्णावरून शेकडा गुण काढण्यात येतात. सदर एकूण शेकडा गुणांवरून गुणवत्ता याद्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
  2. ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीची खोटी माहिती भरून शिष्यवृत्ती अर्हता प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळा मुख्याध्यापकांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल. तसेच अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अहंता रद्द केली जाईल.
  3. शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत मा. शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती रकमेबाबतचा यापुढील पत्रव्यवहार सदर कार्यालयाकडेच करण्यात यावा. सुलभ संदर्भासाठी पत्ता खालीलप्रमाणे

मा. शिक्षण संचालक (योजना)
शिक्षण संचालनालय योजना,
17 डॉ. आंबेडकर रोड, पुणे – 411 001.

फोन 020-26126726

ईमेल – directorscheme.mh@gmail.com

सदर प्रसिध्दीपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

दिनांक ०१ जुलै, 2025

(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र

Leave a Comment

error: Content is protected !!