Std 5th 8th Scholarship Exam 2024 Answer Key
Std 5th 8th Scholarship Exam 2024 Final Answer Key
Shishayvrytti Pariksha Pachvi Aathvi Uttarsuchi
Purv Uccha Prathamik Shishyvrutti Pariksha Purv Madhymik Shishyvrutti Pariksha Uttarsuchi
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
रविवार दि. १८ फेब्रुवारी, २०२४ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची
प्रसिध्दीपत्रक
रविवार दि. १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळाला वेबसाईटला ओडले जाण्यासाठी या ओळीला स्पर्श करा व या ओळीला स्पर्श करा या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.
अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-
१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन
ऑनलाईन स्वरूपात करता येईल.
२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक ०६/०३/२०२४ ते १३/०३/२०२४ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.
४) दि. १३/०३/२०२४ नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :-
१) विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्याथ्यांचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक ०६/०३/२०२४ ते १३/०३/२०२४ रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
२) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाटविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची पाहण्यासाठी किंवा डाऊनलोडसाठी उपलब्ध |
अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची पाहण्यासाठी किंवा डाऊनलोडसाठी उपलब्ध
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची पाहण्यासाठी किंवा डाऊनलोडसाठी उपलब्ध |
ठिकाण – पुणे
दिनांक – ०६/०३/२०२४
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४