Difference Between OPS And Revised NPS

Difference between OPS and Revised NPS

Old Pension Scheme Versus National Pension Scheme

जुनी पेन्शन (OPS) व सुधारीत राष्ट्रीय पेन्शन योजना (Revised NPS) यामधील लाभांचा तुलनात्मक तक्ता

जुनी पेन्शन (OPS) व सुधारीत राष्ट्रीय पेन्शन योजना (Revised NPS) यामधील लाभांचा तुलनात्मक तक्ता

👇

01 मार्च 2024 रोजी मा.मुख्यमंत्री यांचे सुधारीत पेन्शन योजनेच्या घोषणेनुसार मिळणारे लाभ

Revised National Pension Scheme Difference between OPS and Revised NPS

Old Pension Scheme versus National Pension Scheme

अ.क्र.लाभजुन्या पेन्शन योजनेमध्ये (OPS) मिळणारा लाभनविन अंशदायी पेन्शन योजनेतील (NPS) लाभसुधारीत राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये मिळणारा लाभशेरा
1निवृत्तीवेतन (पेन्शन)शेवटच्या मूळ वेतनाच्या 50%गुंतवणूकीवरील परताव्यानुसार (0% हमी)शेवटच्या मूळ वेतनाच्या 50%सुधारीत राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्याचे 10% अंशदान + शासनाचे 14% अंशदान असे एकत्रित 24% अंशदानाच्या गुंतवणूकीवर मिळणाऱ्या परताव्यामधून शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्तीवेतन व महागाई भत्ता देणेकामी कमी पडणारी रक्कम शासन पुन्हा नव्याने जमा (Top Up) करणार.  
2महागाई भत्ता (DA)वेळोवेळी वाढणाऱ्या महागाईनुसार0%वेळोवेळी वाढणाऱ्या महागाईनुसार14%
3निवृत्तीवेतनाचे (पेन्शन) नियत वयोमान व सेवा प्रमाणात मिळणारे प्रमाणमहाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील तरतुदींनुसारअनिश्चितमहाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील तरतुदींनुसार निश्चित 
4वेतन आयोगानुसार पेन्शन निश्चितीलागू आहे.लागू नाही.लागू आहे. 
5कुटुंब / रुग्णता निवृत्ती वेतननिवृत्तीवेतनाच्या 60%गुंतवणूकीवर मिळणाऱ्या परताव्यानुसार (0% हमी)निवृत्तीवेतनाच्या 60% 
6सेवा, मृत्यू व रुग्णता उपदान (ग्रॅच्युईटी)महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील तरतुदींनुसार0%महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील तरतुदींनुसार निश्चित 
7रजा रोखीकरण300 दिवस (बेसिक डी.ए.)300 दिवस (बेसिक+डी.ए.)  300 दिवस (बेसिक+डी.ए.) 
8विमा (GIS) 360000/- अपवात झालेस विना अपघात – जमा हप्ता + व्याज360000/- अपघात झालेस विना अपघात जमा हप्ता + व्याज360000/- अपघात झालेस विना अपघात – जमा हप्ता + व्याज
 भविष्य निर्वाह निधी (GPF)    
जुन्या पेन्शन योजनेची तुलना करता अद्याप न मिळालेले लाभ
1भविष्य निर्वाह निधी (GPF)कर्मचारी जमा रक्कम व त्यावर ४% व्याज तसेच गरजेनुसार परतावा व विनापरताव्याच्या अटीवर सेवा कालावधीमध्ये रक्कम वापरेणस मुभाही सुविधा नाही  ही सुविधा नाही, परंतु कर्मचारी अंशदान + त्यावरील व्याज अशी एकत्रित रक्कम सेवानिवृत्तोवेळी कर्मचा-याला परत द्यावी अशी मागणी केली आहे.मागणीवर अद्याप निर्णय नाही, मात्र मागणीसाठी लढा चालू राहणार, ही मागणी पूर्ण झाल्यास पेन्शनसाठी आपले अंशदान नाममात्र किंवा शुन्य राहणार
2निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण (Commutationh)40% पेन्शन रक्कमेचे नोकरीतील एकूण महिण्यांच्या / कमाल 66 महिण्यांच्या 2 पटही सुविधा नाही  अशी सुविधा नाही. 

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील तरतुदी प्रकरण निहाय बदलतात त्यामुळे 20 पेक्षा कमी सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या नियत वयोमानानुसार मिळणाऱ्या लाभाबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 वा आपल्या नजिकच्या पेन्शन माहितगाराशी संपर्क साधून आपणांस मिळणाऱ्या रक्कम प्रमाणांचे कॅलक्यूलेशन करुन घ्यावे.

राज्यातील तमाम NPS / DCPS धारक बांधवांनो

सरसकट जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीला बगल देऊन तुमच्या माथी पुन्हा एक बेभरवशाची पेन्शन योजना माथी मारत आहेत..  त्याच गोंडस नामकरण त्यांनी GPS ( ग्यारंटेड पेन्शन स्कीम ) असं केलेले आहे आणि त्यात 50% पेन्शन मिळेल असा गाजावाजा करून ही योजना ते आपल्या माथी मारत आहेत अंतिम वेतनाच्या 50% पेन्शन च्या बाता मारणारे आपली निव्वळ फसवणूक करत आहेत..

जुनी पेन्शन योजना आणि ही GPS नावाची हायब्रीड पेन्शन योजना यातील फरक खालील मुद्द्यांवरन समजून घ्या.

१)जुनी पेन्शन योजनेत पेन्शन मिळण्यासाठी कोणतीही कपात होत नाही तर GPS योजनेत NPS प्रमाणे 10% कपात सुरू राहील

२) नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1982 च्या जुनी पेन्शन योजनेत(OPS) शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन मिळण्यासाठी केवळ 10 वर्ष सेवा पुरेशी आहे तर या हायब्रीड पेन्शन योजनेत 30 वर्षं सेवेची अट असणार आहे.

३) नियतवयोमानापूर्वी स्वेच्छा सेवानिवृत्ती(VRS) घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत 20 वर्ष सेवा पुरेशी आहे, ज्यात शेवटच्या 3 वर्षाच्या  सरासरी वेतनाच्या 50 % एवढी पेन्शन दरमाह मिळते तर या हायब्रीड GPS योजनेत तसा कोणताही नियम नाही.

४)1982 च्या जुन्या पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होतात, दर 10 वर्षात नवीन वेतन अयोगानुसार पेन्शन पुनर्रचना करण्यात येते, ज्यात पेन्शन बेसिक जवळपास दुप्पट वाढत असते तर या हायब्रीड GPS योजनेत नवीन वेतन आयोगानुसार पेन्शन पुनर्रचना होण्याचा काही संबंध नसणार त्यामुळे ज्या पेन्शन बेसिकवर कर्मचारी निवृत्त झाला असेल तो आजीवन त्याच बेसिक वर पेन्शन घेईल यामुळे ops धारकांच्या पेन्शन च्या तुलनेत 4/5 पट मागे असेल

५)जुन्या पेन्शन योजनेत दर 6 महिन्याला पेन्शन वर महागाई 5 ते 6% भत्ता वाढत असतो तर या GPS योजनेत DA वाढ नसणार आहे.

६) जुन्या पेन्शन योजनेत वयाच्या 85 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना   सरसकट पेन्शन बेसिक मध्ये 15% पेन्शन वृद्धी होते, 90 व्या वर्षी 30% वाढ तर 100 व्या वर्षी 50% पेन्शन वाढ मिळते तसा लाभ या GPS रुपी हायब्रीड पेन्शन योजनेत मिळू शकत नाही.

७) जुन्या पेन्शन योजनेत पेन्शन चे अंशराशिकरण नियम आहे, ज्यात पेन्शन विक्री करता येते, ज्यामुळे एका विशिष्ट कालावधी नंतर पेन्शन विक्रीकरून एकरकमी 5 ते 6 लाख रु सेवानिवृत्त कर्मचारी घेऊ शकतो, तसा कोणताही लाभ या नवीन GPS मध्ये नसेल.

एकंदरीत GPS योजना ही जुनी पेन्शन योजना नाहीच ती NPS चे च दुसरे रूप आहे, GPS म्हणजे NPS 2.0 आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!