Std 10th 12th Exam Remuneration Increase
Std 10th 12th Exam Remuneration Increase
Regarding the increase in the remuneration of the components associated with the Secondary and Higher Secondary Certificate Examination (10th and 12th) examination
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
क्र.रा.मं/लेखा-६/२५-२६ / /237
पुणे-४११००४
दि. 16/03/2026
प्रति,
विभागीय सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळ,
सर्व विभागीय मंडळे
विषय – माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी व इ.१२ वी) परीक्षेशी निगडीत घटकांचे मानधन वाढीबाबत……
उपरोक्त अनुसरून आपणास कळविण्यात येते की, या पत्रासोबत परीक्षेशी निगडीत घटकांचे मानधन वाढीबाबत कार्यकारी परिषद दि. १२/०२/२०२६ ठराव क्र. ८१ नुसार मान्यता देण्यात आलेली आहे. त्यातील मानधन वाढीबाबतचे परिशिष्ठ अ एकूण पाने ०१ ते ०६ जोडण्यात येत आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी व इ. १२ वी) फेब्रु-मार्च २०२६ पासून सदर प्रमाणे मानधन अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
सचिव, राज्यमंडळ, पुणे
कार्यकारी परिषद (तदर्थ) सभा, दि.१२/०२/२०२६
विषय क. ८१
केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परिरक्षक, उपपरिरक्षक व परीक्षेशी निगडीत इतर घटकांचे मानधन वाढीबाबत… (लेखा-०६)
उराव क. ८१
सदर विषयावर सभेमध्ये सांगोपांग चर्चा झाली. चर्चेअंती माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु/मार्च-२०२६ च्या परीक्षेपासून केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परिरक्षक, उपपरिरक्षक व परीक्षेशी निगडीत इतर घटकांच्या मानधनातील वाढ खालीलप्रमाणे.
परिशिष्ट-अ
अ. तपशिल इ. १० वी प्रचलित मानधन दर मानधन दर सुधारीत वाढीव प्रचलित मानधन दर




माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी व इ.१२ वी) परीक्षेशी निगडीत घटकांचे मानधन वाढीबाबत
ALSO READ 👇

Std 10th 12th Exam Remuneration Increase
Regarding increase in remuneration of Examiners, Senior Examiners, Regulators and Chief Regulators from 10th and 12th February/March 2025 examination.
iyatta dahavi baravi Pariksha Mandan wadh
क.रा.रां/ लेखा-६/२४-२५/४९४
पुणे
दिनांक:- ०५/०२/२०२५
प्रति,
विभागीय सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे/नागपूर/छ. संभाजीनगर/मुंबई/कोल्हापूर/अमरावती नाशिक/लातूर/कोकण विभागीय मंडळे
विषय –
- इ.१०वी व १२वी फेब्रुवारी/मार्च २०२५ च्या परीक्षेपासून परीक्षक, वरिष्ठ परिक्षक, नियामक व मुख्य नियामक यांचे मानधनात वाढ करणेबाबत..
उपरोक्त विषयाबाबत आपणांस कळविण्यात येते की, इ.१०वी व १२वी फेब्रुवारी/मार्च २०२५ च्या परीक्षांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यमंडळ व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ, शिक्षकेत संघटनांचे महामंडळ, मुख्याध्यापक संघ व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पदाधिकारी यांच्याशी झालेल्या दि. १०/०१/२०२५ व दि.२४/०१/२०२५ रोजीच्या सहविचार सभेमध्ये इ. १२ वी व इ. १० वी परीक्षक, वरिष्ठ परिक्षक, नियामक व मुख्य नियामक यांच्या उत्तरपत्रिका तपासणी मानधनात फेब्रुवारी/मार्च २०२५ च्या परीक्षांपासून वाढ करण्याबाबतचा निर्णय झालेला आहे. यासोबत मानधन वाढ परिशिष्ट ‘अ’ व ‘ब’ सोबत जोडले असून त्यानुसार फेब्रुवारी/मार्च २०२५ इ. १२ वी व इ. १० वी परीक्षेची देयके सुधारित दराने अदा करण्यात यावीत.
(डॉ. माधुरी सावरकर) सचिव राज्यमंडळ, पुणे.

