Filling Information About School SQAAF In Link

Filling Information About School SQAAF In Link

IMG 20250318 105229
Filling Information About School SQAAF In Link

Filling Information About School SQAAF In Link

शासन निर्णय – SQAAFLINK
शाशासन निर्णय २ – SQAAFLINK
शासन निर्णय – SSSALINK
मार्गदर्शन पुस्तिकाLINK
मार्गदर्शन पुस्तिका इंग्रजीLINK
आपल्या प्रतिक्रिया email id वर नोंदविण्यात याव्यातLINK
SQAAF- मार्गदर्शन व्हिडिओLINK
SQAAF- स्वयं- मूल्यांकनासाठी लिंकLINK
SQAAF – संदर्भ साहित्यLINK
SQAAF- आपला प्रतिसादLINK

मानक 1- मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो

मानक 2- पालक सभा फोटो

मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय

मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही
माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर

मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो

मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग

मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो

मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो

मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो

मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही
माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो

मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो

मानक 12- प्राथमिक शाळा लागू नाही
माध्यमिक शाळा स्थानिक कामगार क्षेत्रभेट फोटो

मानक 13- प्राथमिक शाळा लागू नाही
माध्यमिक शाळा किशोरवयीन विद्यार्थ्यांची कार्यशाळा फोटो

मानक 14- लागू नाही

मानक 15- लागू नाही

मानक 16- सर्व वर्गांची वेळापत्रक फोटो ज्यात कला संगीत नृत्य नाटक इत्यादी समावेश

मानक 17- मैदानी खेळ बैठे खेळ योगासने इत्यादींचा फोटो

मानक18- आरोग्य तपासणी फोटो

मानक 19 – दिव्यांग विद्यार्थी सोयीसुविधा दिलेले पुरावे जसे उपस्थितीबद्दल वेगवेगळे साहित्य दिलेले रिपोर्ट फोटो स्तर एक निवडावा

मानक 20- वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचे फोटो

मानक 21- सामाजिक उपक्रमाचे फोटो तसेच संस्कृती जोपासणे उपक्रम फोटो

मानक 22- स्तर चार निवडावा
नमुना प्रगती पत्रक किंवा प्रश्नपेढी फोटो नमुना

मानक 23 – अनुक्रमांक 22 प्रमाणे फोटो

मानक 24- कोडींग हैक्याथोन विज्ञान गणित मंडळी फोटो

मानक 25- अनुक्रमांक 24 प्रमाणे

मानक 26- SLAS,PAT,NAS,SEAS नुसार लागू असल्यास तसाच तर निवडावा तसेच एक स्क्रीन शॉट टाका प्रमाणपत्र फोटो

मानक27- पालक सभा फोटो व पालक भट रजिस्टर फोटो

मानक 28- PAT भरलेले मार्क स्क्रीन शॉट फोटो

मानक 29- बहुतेक शाळेला लागू नये असल्यास वर्गाचा फोटो किंवा निष्ठा प्राथमिक मॉडेल प्रमाणपत्र फोटो टाका

मानक 30- TLM अध्ययन अध्यापन साहित्य फोटो

मानक 31- वाचन विभाग मंडळ गणित साक्षरता मंडळ यांचा फोटो

मानक 32- कृती आधारित अध्यापन फोटो

मानक 33 – कृती आराखडा एखादा विद्यार्थी निवडून कृती आराखडाचा तयार केलेला फोटो

मानक 34 – शिक्षक निष्ठा प्रशिक्षण प्रमाणपत्र फोटो

मानक 35- केंद्रांतर्गत इतर शाळा भेट फोटो किंवा शिक्षण परिषद फोटो

मानक 36- पालक सभा फोटो

मानक 37- गुणवत्ता सुधारण्याकरिता नाविन्यपूर्ण प्रकल्प / उपक्रम यांचे फोटो

मानक 38- विद्यार्थी कौशल्य वर आधारित प्रकल्प फोटो

मानक 39 – मानक 38 प्रमाणे फोटो

मानक 40 – ग्रंथालय किंवा वाचन कोपरा फोटो

मानक 41 – विद्यार्थी प्रकल्प फोटो संस्कृती संवर्धन

मानक 42 – विद्यार्थी व पालक यांचा सहभाग तसेच उपक्रमाचे फोटो

मानक 43 – शिक्षक लेखन वर्तमानपत्र किंवा शिक्षण परिषदेमधील शिक्षकांचा सहभाग याचा फोटो

मानक 44 – शैक्षणिक साहित्य फोटो तर एक निवडावा

मानक 45 – वर्गनिहाय शिक्षक निहाय वर्ग खोल्यांचे फोटो

मानक 46 – मुतारी आणि हँडवॉश स्टेशन फोटो

मानक 47 – फर्निचर डिजिटल मटेरियल ग्रंथालय फोटो

मानक 48 – भाषा गणित विज्ञान प्रयोगशाळा फोटो तसेच भाषा पेटी विज्ञान पेटी गणित पेटी फोटो तसेच भाषा विज्ञान गणित कोपरा यांचे फोटो

मानक 49 -आयसीटी संगणक उपलब्धता फोटो

मानक 50 – कलागुणानुसार वर्गखोलेची रचना खुल्या जगाचा वापर विविध सहशालेय उपक्रमासाठी उपयोग होतो त्याचा फोटो

मानक 51-आणि मग प्राचार्य कार्यालयांचा फोटो तसेच विविध समिती फलक फोटो व व्यतिरिक्त सर्व कर्मचाऱ्यांसाठी स्टाफ रूम असेल तर फोटो

मानक 52-प्रथमोपचार पेटी फोटो तंबाखूमुक्त परिसर फोटो आरोग्य तपासणी फोटो

मानक 53 – स्वच्छ शालेय परिसराचा फोटो

मानक 54 – पिण्याचे पाणी सुविधा फोटो

मानक 55 – उपलब्ध फर्निचर विद्यार्थ्याकरिता त्याचा फोटो

मानक 56 – प्रकाश व हवा व्यवस्थेचा वर्ग खोल्यांचा फोटो

मानक 57- अग्निशामक यंत्र फोटो

मानक 58- आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण फोटो योजनेचे फोटो

मानक 59- शाळेतील झाडांचा फोटो सुका कचरा ओला कचरा फोटो कंपोस्ट खत फोटो इको क्लब यापैकी जे उपलब्ध असेल त्याचा फोटो

मानक 60- विद्युत उपकरणांचा फोटो सोलार बल्प सोलार पॅनल प्लास्टिक मुक्त किंवा पुनर्वापर सांडपाण्याची विल्हेवाट यापैकी उपलब्ध असेल ते फोटो

मानक 61- स्वयंपाक खोली किचन गार्डन फोटो असल्यास

मानक 62- क्रीडांगणाचा फोटो

मानक 63- लागू नाही
बोर्डिंग निवासी असल्यास इमारत व सुख सुविधा चे फोटो

मानक 64-प्राथमिक शाळा लागू नाही
माध्यमिक शाळा सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन फोटो

मानक 65-लागू नाही
निवासी असल्यास गेट रजिस्टर सीसीटीव्ही सुरक्षा साधने यांचा फोटो

मानक 66- लागू नाही
निवासी शाळा असल्यास दिनचर्या वेळापत्रक खेळ यांचे फोटो

मानक 67- लागू नाही

मानक 68- स्मार्ट क्लास फोटो आयसीटी लॅब फोटो

मानक 69- इंटरनेट फोटो वायफाय राऊटर फोटो किंवा मोडेम फोटो

मानक 70- पट नोंदणी सर्वेक्षण फोटो

मानक 71- विद्यार्थी गळती थांबवण्यासाठी शाळा व इमारत यांचा आकर्षक फोटो

मानक ७२- शाळा प्रवेश फोटो प्रवेशोत्सव फोटो

मानक 73-प्राथमिक शाळा लागू नाही
माध्यमिक शाळा सेमिनार चर्चासत्रे पालक सभा फोटो

मानक 74- लागू नाही

मानक 75- शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचा फोटो

मानक 76 – मु.अ. व शिक्षक यांची सभा फोटो

मानक 77- वरील प्रमाणे फोटो

मानक 78- शिक्षण परिषदेतील फोटो

मानक 79- परिपाठ किंवा शाळा समारंभामध्ये कर्मचाऱ्यांचा सन्मान केलेला फोटो किंवा वेगवेगळ्या स्तरावर झालेला कर्मचाऱ्यांचा सन्मान फोटो

मानक 80-मुख्याध्यापक व शिक्षक यांची सभा फोटो

मानक 81- वरील प्रमाणे फोटो

मानक 82- शिक्षक पालक सभा फोटो

मानक 83 – विभाग वाटप फोटो शिक्षकांना दिलेले जबाबदारी विभाग यांचे फोटो

मानक 84- शिक्षकाने घेतलेले वेगवेगळे प्रशिक्षण यांचे प्रमाणपत्र फोटो

मानक 85- शाळेचे वेळापत्रक फोटो

मानक 86- शाळेतील सूचनापेटी तसेच अभिप्राय बोर्ड यांची नोंदवही फोटो

मानक 87- विद्यार्थी बैठक व्यवस्था साहित्य उपलब्धता यांचे फोटो तसेच विद्यार्थ्याकरता पायाभूत सुविधा यांचे सर्वसाधारण फोटो

मानक 88- दिव्यांग विद्यार्थी यांचा अध्ययन अध्यापानात प्रक्रियेमध्ये सहभाग याचा फोटो

मानक 89- विशेष शिक्षक व दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक सभा यांचा फोटो

मानक ९०- दिव्यांग विद्यार्थ्याकरिता विविध योजनेचे फोटो प्रमाणपत्र तसेच सुविधेचे फोटो

मानक 91- दिव्यांग प्रमाणपत्र फोटो किंवा सुविधांचे फोटो

मानक 92 – लागू नाही

मानक 93- मुख्याध्यापक , शिक्षक व पालक यांचे सभेचे फोटो

मानक ९४- शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण फोटो

मानक 95- विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवताना फोटो

मानख ९६- ऑनलाइन माध्यमातून अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो ऑनलाईन अभ्यास दिलेल्या चा फोटो

मानक 97 – मातृभाषेतून किंवा बोली भाषेतून शिकण्यासाठी उपलब्ध श्रेष्ठ साहित्य यांचा फोटो

मानक ९८- दिव्यांग विद्यार्थ्याकरता तपासणी शिबिर फोटो

मानक 99- विविध उपक्रमात तसेच शौचालय कार्यक्रमात मुलींचा सहभाग असलेले विशेष फोटो

मानक 100- शाळेच्या दर्शनी भागात किंवा वर्ग निहाय दर्शनी भागात लावलेले अध्ययन निष्पत्ती दर्शवलेले फोटो

मानक 101- शिक्षण परिषदेचा फोटो

मानक 102- शाळेची दीर्घकालीन नियोजित नियोजनाचा फोटो

मानक 103 – मुख्याध्यापक व शिक्षक सभा यांचा फोटो

मानत 104- शाळा व्यवस्थापन समिती सभेचा फोटो

मानके 105 – शाळा व्यवस्थापन समिती सभेचा फोटो

मानक 106-पालक सभा फोटो

मानक 107- शाळा व्यवस्थापन समिती सभेचा फोटो

मानक 108 – शैक्षणिक दिनदर्शिका उपक्रम नोंदवही फोटो

मानक 109- शाळेतील दस्तऐवजाचा सामीलिके यांची देखभाल कशी केली आहे दस्तऐवज कसे ठेवलेत याचा फोटो

मानक 110- पालक सभा फोटो किंवा पालक ऑनलाईन ग्रुप असतील तर व्हाट्सअप चा स्क्रीन शॉट फोटो

मानक 111 -ऑडिट झाले असल्यास ऑडिट रिपोर्ट फोटो

मानक 112 – सर्वसमावेशक प्रवेश त्याकरिता प्रवेशोत्सवाचा फोटो

मानक 113- वरील प्रमाणे फोटो

मानक 114- शाळा संकुल योजना असल्यास फोटो अहवाल किंवा एसएमसी सभेचा फोटो

मानक 115 – शाळा विकासाचा आराखडा सादर केले असल्यास त्याच्या प्रमाणपत्राचा फोटो

मानक 116-शाळा व्यवस्थापन समितीचा सभेचा फोटो

मानक 117-यु-डायस प्लस रिपोर्ट फोटो

मानक 118-विद्यार्थी सभा किंवा बैठका यांचे फोटो

मानक 119-आनंददायी शिक्षण फोटो

मानक 120-पर्यावरण संवर्धन शालेय स्वच्छता तसेच पिण्याच्या पाण्याची फोटो

मानक 121-वर्गातील भौतिक सुविधाचा फोटो

मानक 122-शिक्षण परिषदेत फोटो किंवा शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेचा फोटो

मानक 123-वरील प्रमाणे फोटो

मानक 124-मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या बैठकीचा फोटो

मानक 125- शाळा व्यवस्थापन समिती बैठकीचा फोटो

मानक 126-शाळेतील पालक मेळावा फोटो

मानक १२७-शाळेत घेतलेले सामाजिक उपक्रम तसेच संस्कृती संवर्धनासाठी घेतलेले उपक्रम यांचा फोटो

मानक 128-शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालक शिक्षक समिती यांच्या बैठकीचा फोटो.

संदर्भ : १. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र. क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५.०३.२०२४ (SQAAF)
२. मा. आयुक्त यांच्या दि. ११.०३.२०२५ रोजीच्या VC मधील सूचना
उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) बाबत राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती स्थापन करण्याच्या सूचना मा. आयुक्त यांच्या दि. ११.०३.२०२५ रोजीच्या VC मध्ये देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) बाबत राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती खालीलप्रमाणे स्थापन करण्यात आली आहे.

दि. ११/०३/२०२५

जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/SQAAF/२०२४-२५/०१४१६

संदर्भ:
१. जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/SQAAF/२०२४-२५/००५८२ दि. ०३/०२/२०२५
२. जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/SQAAF/२०२४-२५/०१०९७ दि. २७/०२/२०२५
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.) यांचे प्राप्त दूरध्वनी संदेश व प्रस्तुत कार्यालयास विविध संघटनांचे प्राप्त निवेदने

उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या वेबसाईट वरील SQAAF टॅबवर नावाने स्वयं-मूल्यांकनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये दि. २८.०२.२०२५ पर्यंत माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याविषयी कळवले होते व संदर्भ क्र. २ नुसार स्वयं-मूल्यांकनासाठीची माहिती भरण्यासाठी १५.०३.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, आजतागायत १००% शाळांची माहिती पूर्ण झालेली दिसून येत नाही. त्यामुळे, स्वयं-मूल्यांकनाबाबत माहिती भरण्यासाठी दि. ३१.०३.२०२५ रोजी सायं. ०५:०० वाजेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही.

तरी, आपल्या विभागातील/जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती विहित कालावधीत १००% पूर्ण करून घेण्यात यावी.

IMG 20250318 105239
Filling Information About School SQAAF In Link

संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

IMG 20250227 143444
Filling Information About School SQAAF In Link

Filling Information About School SQAAF In Link

विषयः शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती भरण्यास मुदतवाढ देणेबाबत…

संदर्भ: १. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र. क्र.०९/ एसडी-६ मंत्रालय मुंबई दि.१५ मार्च, २०२४ (SQAAF)
२. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४ (SSSA)
३. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती लिंक मध्ये भरण्याबाबत पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/SQAAF/२०२५/००५८२ दि. ०३.०२.२०२५
४. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथ., माध्य) यांचे प्राप्त दूरध्वनी संदेश.

महोदय,
उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, SQAAF स्वयं-मूल्यांकनासाठी लिंकमध्ये माहिती भरण्याची अंतिम दिनांक संदर्भ क्र. ३ मे दि.२८.०२.२०२५ पर्यंत कळविण्यात आली होती. या पत्राद्वारे संदर्भ क्र. ४ नुसार SQAAF स्वयं मूल्यांकनासाठी लिंकमध्ये माहिती भरण्यासाठी दि.१५.०३.२०२५ सायं ०५:०० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

तरी, आपल्या विभागातील/जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांची माहिती दिलेल्या कालावधीत/मुदतीत १००% पूर्ण करून घेण्यात यावी.

या ओळीला स्पर्श करून परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा

IMG 20250227 143500
Filling Information About School SQAAF In Link

संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे.
प्रति.
संचालक, शिक्षण संचालनालय, पुणे
सहसंचालक/उपसंचालक, शिक्षण विभाग (सर्व) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
शिक्षणाधिकारी (प्राथ., माध्य.), जि. प. (सर्व)…

image 18
Filling Information About School SQAAF In Link

Filling Information About School SQAAF In Link

Along with information about the School Quality Assessment and Assurance Framework (SQAAF) filling in given link

प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)सर्व,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)सर्व

विषय: शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी तयार करण्यात आलेल्या व SCERT च्या LINK या वेबसाईटवरील SQAAF टॅबमध्ये देण्यात आलेले व्हिडिओ शाळास्तरापर्यंत ऑनलाइन पोहोच करणेबाबत….

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) बाबत, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी SQAAF वर आधारित १८ व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. सदरील सर्व व्हिडिओ SCERT च्या LINK या वेबसाईटवर SQAAF या सबटॅबवर देण्यात आलेले आहेत. सदरील व्हिडिओ आपल्या जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांच्या मुख्याध्यापक यांना ऑनलाइन देऊन SQAAF ची लिंक दिनांक – २८/२/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत भरणेबाबत कळविण्यात यावे.

राहूल रेखावार(भा.प्र.से.),
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

School Quality Assessment and Assurance Framework (SQAAF)

विषयः शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती सोबत दिलेल्या लिकमध्ये भरणे बाबत…

संदर्भ: १ . शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४ (SQAAF)
२. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४ (SSSA)
३. मा. संचालक सो. SCERT PUNE याचेकडील मान्य टिपण्णी दि. ०८/०१/२०२५
उपरोक्त सदर्भ क्र.१ नुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक सशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र.३ नुसार सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या LINK या वेबसाईटवरील SQAAF टॅबवर

या नावाने स्वयं-मूल्यांकनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी. सदरील ऑनलाईन लिंकवर माहिती भरणे बाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. तसेच, सदरील लिंक ही दि.२८ फेब्रुवारी. २०२५ रोजी सायं. ०५:०० पर्यत भरण्याची कार्यवाही करावी. सदरील लिंकमध्ये माहिती भरण्याची कार्यवाही खाली दिलेल्या सूचनानुसार विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावी.
१. सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी विकसित करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मुल्याकन आणि आश्वासन आराखड्याची (SQAAF) प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी
प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची असेल.
२. संकेतस्थळावर सर्व शाळांची नोंदणी व स्वयं-मुल्यांकन करून घेण्याची जबाबदारी प्राथमिक शाळांच्या व माध्यमिक शाळांच्या संदर्भात अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची राहील.
३. शाळांना मुल्यांकनासंदर्भात तसेच शाळा विकास आराखडा निर्मिती संदर्भात गरजेनुसार मार्गदर्शन करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था यांची असेल.
४. माहिती भरणे बाबत सर्व मुख्याध्यापक यांना सोबत दिलेल्या सूचना पत्राचे अवलोकन करून माहिती भरणे बाबत कळविण्यात यावे.
५. SQAAF बाबत मार्गदर्शनपर व्हिडीओ SCERT, PUNE यांच्या SQAAF टॅबमधील SQAAF व्हिडीओ या सबटॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. माहिती भरण्यापूर्वी सर्व मार्गदर्शनपर व्हिडीओ पाहण्यासाठी सूचित करावे.
६. SQAAF बाबत शासन निर्णय SCERT, PUNE यांच्या SQAAF टॅबमधील SQAAF- शासन निर्णय या सबटॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. माहिती भरण्यापूर्वी सर्व शासन निर्णयवाचे अवलोकन करणेविषयी सूचित करावे.
७. मुल्यांकनासंदर्भात काही तक्रार असल्यास किंवा SQAAF लिंक भरणे बाबत काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास sqaafmh@maa.ac.in या ई-मेल आयडीवर शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचे मार्फत कळविण्यात यावे.

८. जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्वयं-मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर बाह्य-मूल्यांकने व त्रयस्थ सस्थेद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे. तरी, सर्व शाळांना स्वयं-मूल्यांकन करताना वस्तुस्थितीदर्शक माहिती भरणेबाबत कळविण्यात यावे. अवास्तव स्वयं-मूल्यांकन होणार नाही याची खबरदारी संबधित मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती/ शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांना घेणेविषयी कळविण्यात यावे.

  • ९. स्वयं-मूल्यांकनानंतर यथास्थिती बाह्य-मूल्यांकन व त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे.
    १०. स्वय-मूल्यांकनानंतर यथास्थिती बाह्य-मूल्यांकनात व त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मुल्याकनात १५% हून अधिक तफावत आढळल्यास संबंधित मुख्याध्यापकावर याबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
    ११. बाह्य- मुल्यांकनानंतर ज्या मानकामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. अशा मानकांचा विकास आराखडा तयार करणे शाळांना बंधनकारक राहील व SQAAF पोर्टलवर अपलोड करणेबाबत सूचना प्राप्त होताच अपलोड करणे बंधनकारक राहील.
    १२. बाह्य- मुल्यांकनानंतर/त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणारे मुल्यांकनानतर मिळालेल्या श्रेणीचा शाळेच्या दर्शनी भागात व शाळेच्या लेटरहेडवर उल्लेख करावा.

१३.स्वयं-मूल्यांकन/बाह्य-मूल्यांकन/त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मूल्यांकन करताना खालीलप्रमाणे स्तरनिहाय गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल.
अ.क्र. प्राप्त गुण श्रेणी
१ ९१ ते १०० टक्के अ+
२ ८१ ते ९० टक्के अ
३ ७१ ते ८० टक्के ब+
४ ६१ ते ७० टक्के ब
५ ५१ ते ६० टक्के क+
६ ५० टक्के पेक्षा कमी क

सोबत – SQAAF लिंक बाबत मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना पत्र.

(राहूल रेखाबार/ भा.प्र.से.)
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

SQAAF बाबत मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना

  • वेबसाईटवर (Website) माहिती भरण्यापूर्वी करावयाच्या बाबीः
    अ) माहिती भरण्यापूर्वी आपणाला देण्यात आलेल्या SQAAF मार्गदर्शक पुस्तिकेचा अभ्यास करावा. ही मार्गदर्शक पुस्तिका आपणाला SCERT च्या maa.ac.in या वेबसाईटवर SQAAF टॅबमधील SQAAF-मार्गदर्शक पुस्तिका या सब-टॅबवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
    आ) SQAAF बाबत SCERT च्या maa.ac.in या वेबसाईटवर SQAAF या टॅबमधील SQAAF-व्हिडिओ या सब-टॅबवर उपलब्ध असणारे सर्व व्हीडीओ पाहावेत.
    इ) वेबसाईटवर देण्यात आलेल्या शासन निर्णयांचे वाचन करावे.
    ई) आपल्या शाळेतील सर्व घटकांशी म्हणजेच शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, विद्यार्थी यांच्याशी SQAAF मुल्यांकनाबाबत चर्चा करावी.
    उ) पुस्तिकेत दिलेल्या मानकनिहाय शाळेत उपलब्ध असणारे कागदपत्र किंवा दस्तऐवज एकत्रित करावेत.
    ऊ) प्रत्येक मानकासाठी निर्धारित केलेले पुरावे गुगल ड्राईव्हला सर्वप्रथम सेव्ह करावे व गुगल ड्राईव्हला सेव्ह करताना मानक क्रमांक नमूद करून फाईल सेव्ह करावी.
  • वेबसाईटवर माहिती भरताना लक्षात घ्यावयाच्या बाबीः
    १) SCERT च्या maa.ac.in या वेबसाईटवर SQAAF टॅब मधील SQAAF-मार्गदर्शक पुस्तिका या सबटॅबवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर या वेबसाईटवर SQAAF-मुल्यांकन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपणाला लॉगीन हे पेज ओपन होईल. लॉगीन पेजवर आपणाला दोन टॅब देण्यात आले
    आहेत. अ) खाते तयार करा ब) लॉगीन
    २) वेबसाईटवर आपण नवीन असाल तर “खाते तयार करा” या टॅबवर क्लिक करावे. यापूर्वी या लिंकवर आपले खाते तयार केले असेल तर लॉगीन या टॅबवर क्लिक करावे.
    ३) “खाते तयार करा” या टॅबवर क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम वरील बाजूस मुख्याध्यापक यांनी आपला/शाळेचा अधिकृत ई-मेल आयडी नमूद करावा (या संकेतस्थळासाठी बनवण्यात आलेला आठ अंकी किंवा अक्षरी पासवर्ड विसरल्यास (फरगॉट पासवर्ड) दिलेल्या अधिकृत ई-मेल आयडीवर त्याचा नवीन पासवर्ड रिसेट करून मिळणार आहे.)
    ४) त्याखाली दिलेल्या टॅबवर मुख्याध्यापक यांनी क्लिक करावे व या संकेतस्थळासाठीचा आठ अंकी/अक्षरी पासवर्ड तयार करावा.
    ५) त्यानंतर या संकेतस्थळासाठी तयार केलेला पासवर्ड पुन्हा नमूद करून त्या पासवर्डची पुष्टी/खात्री करावी. वरील बाबींची पूर्तता केल्यानंतर “खाते तयार करा” हा टॅब दिसेल त्यावर क्लिक करावे. (आता या संकेतस्थळासाठीचे आपले खाते तयार झालेले असेल) त्यानंतर पुढील पेज ओपन होईल.
    ६) पुढील पेज ओपन झाल्यानंतर त्या पेजवर आपल्या शाळेचा यू-डायस क्रमांक (अकरा अंकी) नोंदवावा (आपल्या शाळेचा यू-डायस क्रमांक हाच आपला युझर नेम असणार आहे). त्यानंतर त्याखालील टॅबमध्ये मुख्याध्यापक यांनी यू-डायस पोर्टलवर नोंदवलेला मोबाईल क्रमांक नमूद करावा (मुख्याध्यापक यांचा मोबाईल क्रमांक हा या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड असेल). वरील दोन्ही बाबी पूर्ण केल्यानंतर आपल्या शाळेची माहिती मिळवा हा टॅब ओपन होईल त्यावर क्लिक करावे. पुढील पेज ओपन होईल.
    ७) पुढील पेज ओपन झाल्यानंतर आपल्या शाळेचा तपशील दिसेल. दिसत असलेला तपशील आपल्याच शाळेचा आहे का? याची खात्री करावी. तपशिलात दुरुस्ती असल्यास आपल्या केंद्रप्रमुखांशी संपर्क साधावा/मागे जा या टॅबवर क्लिक करावे व मागे गेल्यानंतर ओपन झालेल्या टॅबवर योग्य माहिती भरावी. याच पेजवर शाळेच्या तपशिलाच्या खाली शाळा बदला हा टॅब देण्यात आला आहे. आपणाला शाळा बदलावयाची असल्यास या टॅबवर क्लिक करावे व आपली शाळा बदलून घ्यावी मात्र शाळा बदलल्यास यापूर्वी या संकेत स्थळावर पूर्वीच्या शाळेची भरलेली संपूर्ण माहिती डिलीट होईल.
  • केंद्रप्रमुखांशी संपर्क साधल्यानंतर मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख तसेच गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी करावयाची कार्यवाहीः
  • या संकेत स्थळासाठी शाळेचा यू-डायस क्रमांक व यू-डायसशी संलग्न मुख्याध्यापक यांचा मोबाईल क्रमांक पोर्टलवर नोंदणी करण्यात आला आहे. यू-डायस क्रमांक व मुख्याध्यापक यांचा यू-डायसशी संलग्न मोबाईल क्रमांक जुळत नसेल तर पोर्टलवर माहिती भारता येणार नाही.
    उदा. शाळेचे मुख्याध्यापक बदलीने अथवा अन्य कारणाने बदलले असतील तर सध्याचे कार्यरत मुख्याध्यापक यांनी आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्याशी संपर्क साधून लेखी अर्जासह खालील नमुन्यात माहिती सादर करावी जेणेकरून संकेतस्थळावर आवश्यक बदल करणे शक्य होईल (सदरील माहिती इंग्रजीमध्येच सादर करावी अन्यथा बदल केला जाणार नाही).
image 19
Filling Information About School SQAAF In Link

केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील ज्या शाळांचे असे प्रस्ताव आलेले असतील अशा शाळांची यादी खालील नमुन्यात गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावी (सदरील माहिती इंग्रजीमध्ये एक्सेल फाईल फॉरमॅट मध्येच सादर करावी अन्यथा बदल स्वीकारला जाणार नाही).

image 20
Filling Information About School SQAAF In Link

गटशिक्षणाधिकारी याना आपल्या गटातील / तालुक्यातील ज्या शाळाच अस प्रस्ताव आलेले असतील त्या शाळांची यादी खालील नमुन्यात शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावी. (सदरील माहिती इंग्रजीमध्ये एक्सेल फाईल फॉरमॅट मध्येच सादर करावी अन्यथा बदल स्वीकारला जाणार नाही.)

image 21
Filling Information About School SQAAF In Link

शिक्षणाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील ज्या शाळांचे असे प्रस्ताव आलेले असतील त्या शाळांची यादी खालील नमुन्यात SCERT, पुणे यांच्या कार्यालयातील sqaafmh@maa.ac.in या ई-मेल आयडीवर तात्काळ सादर करावी (सदरील माहिती इंग्रजीमध्ये एक्सेल फाईल फॉरमॅट मध्येच सादर करावी अन्यथा बदल स्वीकारला जाणार नाही).

image 22
Filling Information About School SQAAF In Link

८) तपशिलातील माहिती बरोबर असल्यास दिसत असलेल्या माहितीखालील “माहिती बरोबर असल्यास हे बटन दाबा / पुष्टी करा” या टॅबवर क्लिक करावे. पुढील पेज ओपन होईल.
९) पुढील पेज ओपन झाले असल्यास त्याच पेजवर ०१ ते १२८ मानके क्रमाने दिसतील.
१०) शाळेसाठी लागू असलेल्या मानकांची निवड करून त्यावर क्लिक करा. क्लिक केले असता पुढील पेज ओपन होईल. त्या पेजवर आपणाला सर्वात वर निश्चित केलेले मानक दिसेल. त्याखाली ०१ ते ०४ स्तर दिसतील. प्रत्येक स्तर निश्चित करण्यासाठी त्या स्तराला लागू होणारी वर्णन विधाने देण्यात आली आहेत. शाळेची वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्या शाळेसाठी लागू होणाऱ्या वर्णन विधानाचा स्तर निश्चित करावा. निवडलेल्या वर्णन विधानाच्या स्तरावर क्लिक करावे. स्तर निश्चित केल्यानंतर स्तरासाठीचे वस्तुस्थितीदर्शक पुराव्याची गुगल ड्राईव्हची लिंक त्याखालील टॅबमध्ये पेस्ट करावी. या दोन्ही बाबींची पूर्तता केल्यानंतरच “सबमिट करा” हा टॅब ओपन होईल.

गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याबाबतची कार्यवाही-
१. आपल्या शाळेस लागू होणाऱ्या वर्णन विधानाची सर्वप्रथम माहिती घ्यावी.
२. माहिती घेतल्यानंतर आपल्या शाळेस लागू असणारा स्तर लक्षात घ्यावा.
३. स्तर लक्षात आल्यानंतर त्याची वस्तुस्थिती दर्शविणारी माहितीची पीडीएफ तयार करा. (उदा. फोटो/अहवाल/व्हिडीओ स्वरुपात असेल तर.) ४. प्रत्येक मानकासाठी निश्चित करण्यात आलेल्या व शाळेची वस्तुस्थिती दर्शविणारे कागदपत्र / दस्तऐवज याची एकच स्वतंत्र पीडीएफ फाईल किंवा फोल्डर तयार करण्यात यावा व त्यास मानक क्रमांकाचे नाव देण्यात यावे.
उदा. मानक क्र. ५१ मुख्याध्यापक कक्ष
५. पीडीएफ तयार केल्यानंतर ती पीडीएफ आपल्या शाळेच्या ई-मेलशी संबंधित गुगल ड्राईव्हवर अपलोड करा व आवश्यकतेनुसार लिंक तयार करा. आपल्या ई-मेल आयडीच्या ड्राईव्हवर संपादित करण्याची क्षमता (Capacity) संपूष्टात आली असल्यास नवीन ई-मेल आयडी तयार करून नवीन ई-मेल आयडीच्या ड्राईव्हचा वापर माहिती संपादित करण्यासाठी करावा.
६. गुगल ड्राईव्ह मधून त्या मानकासाठी तयार करण्यात आलेल्या पीडीएफ फाईलची लिंक कॉपी करून घ्यावी. गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेली पीडीएफ फाईलची लिंक कॉपी करताना त्याच मानकासाठी बनवलेली लिंक कॉपी केली आहे का? याची खात्री करावी.
गुगल ड्राईव्हची लिंक तयार करण्याची प्रक्रियाः
गुगल ड्राईव्ह उघडाः आपल्या गुगल अकाउंटने लॉगिन करा आणि गुगल ड्राईव्ह (Google Drive) उघडा.

फाईल किंवा फोल्डर निवडाः ज्या फाईल किंवा फोल्डरची लिंक तयार करायची आहे, ती निवडा.
शेअर पर्याय निवडा: निवडलेल्या फाईलवर किंवा फोल्डरवर राईट क्लिक करा किंवा वरच्या मेनू बारमध्ये “शेअर” (Share) बटनावर क्लिक करा.
लिंक सेटिंग्ज बदलणे: एक पॉप-अप विंडो उघडेल. येथे “Get link” किंवा “लिंक मिळवा” या पर्यायावर क्लिक करा. तुमच्याकडे काही पर्याय असतीलः
✓ Restricted (मर्यादित): फक्त तुम्ही ज्या व्यक्तींना परवानगी दिली आहे त्यांनाच लिंक बघता येईल.
✓ Anyone with the link (लिंक असलेल्या कोणालाही): ही सेटिंग निवडल्यास, ज्या कोणाकडे लिंक असेल त्याला ती फाईल बघता येईल.
✓ लिंक कॉपी करा: “Copy link” किंवा “लिंक कॉपी करा” या बटनावर क्लिक करा.

लिंक पेस्ट करण्याची प्रक्रियाः
जिथे लिंक पेस्ट करायची आहे ती जागा निवडाः मानकाखाली दिलेल्या टॅबमध्ये तुमच्या फाईलची कॉपी केलेली लिंक पेस्ट करा.
लिंक पेस्ट कराः कर्सर ठेवून राईट क्लिक करा आणि “Paste” (पेस्ट) पर्याय निवडा किंवा कीबोर्डवरील “Ctrl + V” (विंडोज) किंवा “Cmd + V” (मॅक) हे शॉर्टकट वापरून लिंक पेस्ट करा.
आता तुमची गुगल ड्राईव्हची लिंक तयार होऊन पेस्ट केली जाईल.
(आपली माहिती फायनल सबमिट केल्यानंतर गुगल ड्राईव्हवर मानकासंबंधित तयार केलेली फाईल अथवा फोल्डर यामध्ये कुठलाही बदल करू नये किंवा ती फाईल डिलीट करू नये. बदल अथवा डिलीट केल्यास SQAAF कार्यालय/बाह्य मुल्यांकन/त्रयस्थ संस्थेकडून केल्या जाणाऱ्या मुल्यांकनासाठी ती फाईल उपलब्ध होणार नाही त्यामुळे मुल्यांकनात अडथळा येवू शकतो.)
११) सर्व मानंकाचे वस्तुस्थितीदर्शक पुरावे दर्शविणारी एकच पीडीएफ फाईल तयार करू नये. प्रत्येक मानकनिहाय स्वतंत्र पीडीएफ फाईल तयार करावी.
१२) पेस्ट लिंक केल्यानंतर त्याखाली असणारा “सबमिट करा” हा टॅब ओपन होईल त्यावर क्लिक करावे. अशाप्रकारे आपल्या शाळेसाठी लागू असणाऱ्या सर्व मानकांची निश्चित्ती करून माहिती पूर्ण करावी.
१३) एखाद्या मानकासाठी प्रतिसाद नोंदवून सबमिट केल्यानंतर आपणाला नोंदविण्यात आलेल्या प्रतिसादात बदल करावयाचा असल्यास अथवा गुगल ड्राईव्हची लिंक बदलावयाची असल्यास आपण केव्हाही / कितीही वेळा बदल करू शकतो.

१४) आपल्या शाळेसाठी लागू नसणाऱ्या मानकासाठी वर्णन विधानाच्या खाली दर्शविण्यात आलेल्या “लागू नाही” या पर्यायावर क्लिक करावे. “लागू नाही” हा पर्याय निवडल्यास फाईलची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही. सबमिट टॅब ओपन होईल.
१५) आपल्या शाळेसाठी कोणती मानके लागू नाहीत ते खालील तक्त्यात दिले आहेत. त्यानुसार आपला प्रतिसाद नोंदविण्यात यावा.

image 23
Filling Information About School SQAAF In Link

अ.क्र घटक / बाब लागू नसणारे मानक क्रमांक
१ वाहतूक सुविधा न पुरविणाऱ्या शाळांच्या बाबतीत ९२
२ शाळा केवळ मुलांची असल्याने ९९

अशाप्रकारे आपल्या शाळेसाठी निश्चित करण्यात आलेल्या मानकांची व लागू नाही हे पर्याय निवडलेल्या मानकांसह १२८ मानकांसाठी प्रतीसाद नोंदवल्यानंतर “पूर्ण सबमिशन/आपला प्रतिसाद पूर्ण करा” या टॅबवर क्लिक करावे.
१६) “पूर्ण सबमिशन/आपला प्रतिसाद पूर्ण करा” या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढील पेजवर हमीपत्र येईल. हमीपत्रातील सर्व मजकुराचे काळजीपूर्वक वाचन करून त्या समोरील चेक बॉक्समध्ये क्लिक करावे. हमीपत्राच्या खाली आपण नोंदविलेल्या व न नोंदविलेल्या मानकांची यादी येते. आपल्या शाळेसाठी निश्चित करण्यात आलेल्या सर्व मानकांसाठी प्रतिसाद नोंदविलेला असल्यास व प्रतिसाद नोंदविलेल्या मानकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या स्तरामध्ये बदल करावयाचा नसल्यास “पूर्ण सबमिशन/आपला प्रतिसाद पुर्ण करा” या टॅबवर क्लिक करावे.
१७) याच पेजवर उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस “सर्व मानके” हा टॅब देण्यात आला आहे. या टॅबवर क्लिक केल्यास आपणाला दोन टॅब दिसतील. १. सर्व मानके २. प्रतिसाद न नोंदवलेली मानके. यापैकी सर्व मानके हा पर्याय निवडल्यास आपणाला प्रतिसाद नोंदवलेली मानके व प्रतिसाद न नोंदवलेली मानके अशी एकत्रित यादी दिसेल. तर प्रतिसाद न नोंदवलेल्या टॅबवर क्लिक केल्यास आपणाला प्रतिसाद न नोंदवलेली तेवढीच मानके दिसतील. त्या सर्व मानकांचा प्रतिसाद आपण नोंदवणे आवश्यक आहे.
१८) पुढील पेजवर आपणाला आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदविला आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन अस संदेश सर्वात वर दिसेल. त्याखाली आपल्या शाळेची संपूर्ण माहिती दिसेल.
१९) सर्वात खाली डाव्या बाजूच्या कोपरयात बदल करू इच्छितो हा टॅब देण्यात आला आहे. यावर आपण क्लिक केल्यास आपल्या प्रतिसादात अजूनही बदल करावयाचा असल्यास आपण आपल्या प्रतिसादात बदल करू शकता. बदल केलेली माहिती अॅटो सेव्ह होईल.
२०) याच पेजवर आपणाला आपला प्रतिसाद यामध्ये आपले प्राप्त गुण तसेच प्रतिसाद नोंदविलेल्या मानकांची संख्या, प्रतिसाद न नोंदविलेल्या मानकांची संख्या, लागू नाही हा पर्याय निवडलेल्या मानकांची संख्या इत्यादी माहिती दिसेल.

२१) आपला प्रतिसाद पूर्ण नोंदविल्यानंतर आपल्या शाळेला प्राप्त झालेले गुण मुख्याध्यापक मार्गदर्शिकेत दर्शविल्यानुसार आपल्या शाळेला कोणती श्रेणी मिळाली याची खात्री करून घ्यावी व ती शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात यावी.
२२) स्वयं-मुल्यांकन/बाह्य मुल्यांकन/त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मुल्यांकन करताना खालीलप्रमाणे स्तरनिहाय गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल.
(एकूण गुणांपैकी प्राप्त गुणावर आधारित श्रेणी निश्चित करता येईल)

अ.क्र. प्राप्त गुण श्रेणी
१ ९१ ते १०० टक्के अ+
२ ८१ ते ९० टक्के अ
३ ७१ ते ८० टक्के ब+
४ ६१ ते ७० टक्के ब
५ ५१ ते ६० टक्के क+
६ ५० टक्के पेक्षा कमी क

iii आपल्या शाळेची माहिती नोंदवण्यासाठी शुभेच्छा…iii

CIRCULAR PDF COPY LINK

1 thought on “Filling Information About School SQAAF In Link”

  1. सर्व मानकांची सविस्तरपणे यादी देण्यात आली धन्यवाद सर !

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!