SSC HSC Board EXAM Students APAAR ID Registration Link
SSC HSC Board EXAM Students APAAR ID Registration Link
SSC HSC Board EXAM FEB/ MAR 2026 Students APAAR ID Registration Link
क्र.रा.म./गणकयंत्र/ 112/4320-पुणे-४११००४
दिनांक-२७.११.२०२५
विषय :- फेब्रुवारी-मार्च २०२६ माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) विद्यार्थ्यांचा APAAR ID नोंदवून घेणेबाबत.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ ला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेळी Digilocker मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका उपलब्ध करून द्यावयच्या आहेत. त्याकरीता विद्याथ्यांच्या APAAR ID ची नोंद आवश्यक आहे. APAAR ID द्वारे प्राप्त Digital गुणपत्रिकांचे विद्यार्थ्यांना होणारे लाभ पुढील प्रमाणे आहेत.
१. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेचे कायमस्वरूपी Digital Record तयार होऊन सर्व शैक्षणिक गुणपत्रिका एकत्रित उपलब्ध होतात
२. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुलभ होते. शैक्षणिक सस्था / नियोचे त्वरीत पात्रता पडताळणी करू शकतात. भौतिक कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाहीशी होते.
३. सरकारी शिष्यवृत्ती व योजनांमध्ये लाभ मिळणे सुलभ होते.
४. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी कोठूनही उपलब्ध होतात.
५. केंद्रीकृत आणि सुरक्षित प्रणालीमुळे कागदपत्रे हरवण्याचा धोका नाही
त्यामुळे आपल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यायातील जास्तीतजास्त विद्यार्थ्यांचा APAAR ID उपलब्ध करून त्याची नोंद मंडळाचे संकेतस्थळ
वर करणेबाबत आपल्या कार्यकक्षेतील सर्व मान्यताप्राप्त शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात यावे व केलेल्या कार्यवाही करण्याबाबत अहवाल राज्य मंडळ कार्यालयास सादर करावा.
राज्य मंडळ, पुणे-०४
